Guarantee scheme |हमीभाव योजनेचा लाभ घेण्यासाठी जिल्ह्यातील खरेदी केंद्रे निश्चित, ऑनलाईन नोंदणीचे अवाहन
जामखेड टाईम्स वृत्तसेवा । guarantee scheme | हंगाम 2021-22 मध्ये आधारभुत किंमत खरेदी योजने अंतर्गत मुग, उडीद, सोयाबीन, तुर व हरभरा या शेतमालाची शासन हमीभावाने खरेदी करण्यासाठी पणन महासंघामार्फत जिल्ह्यामध्ये शेतमाल खरेदी विक्री सुरू करण्यात आली आहेत. हमी भाव योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन नोंदणी करण्याचे अवाहन करण्यात आले आहे.
हमी भाव योजनेचा लाभ घेण्यासाठी neml ऑनलाईन पोर्टलवर शेतमालाची नोंदणी करणे आवश्यक आहे. जे कि खरेदी केंद्रावर केली जाते. परंतु सदर नोंदाणी करीता 7/12 उता-यावर चालु हंगामातील शेतमालाची ऑनलाईन पीक पेरा नोंद असणे आवश्यक आहे. अन्यथा नोंदणी होत नाही.
हंगाम 2021-22 पासुन राज्य शासनाने शेतातील पीकपेरा नोंदणी हे ऑनलाईन ॲपवर करण्याबाबत आदेशित केले आहे. परंतु काही कारणास्तव ब-याच शेतक-यांकडुन सदरची ऑनलाईन नोंदणी करण्यात आलेली नाही. त्यामुळे राज्य शासनाने ऑनलाईन पिकपेरा नोंदणी करण्याकरीता 15 फेब्रुवारी 2022 पर्यंत मुदतवाढ दिलेली आहे.
तरी सर्व शेतक-यांनी तुर खरेदीकरीता ऑनलाईन पोर्टलवर शेतमालाची नोंदणी करून हमीभाव योजनेचा लाभ घ्यावा, असे अवाहन जिल्हा मार्केटिंग अधिकारी पवार यांनी केले आहे.
अहमदनगर जिल्ह्यात खालील ठिकाणी हमीभाव केंद्र कार्यान्वित
1) कर्जत कर्जतकर फार्मर प्रोडुसर कंपनी
2) जामखेड – शिवरत्न मल्टीपर्पज को ऑप सोसायटी खर्डा,
3) पारनेर – कृषी उत्पन्न बाजार समिती पारनेर,
4) नगर – नगर तालुका खरेदी विक्री संघ (नगर मार्केट कमिटी)
5) साकत – श्रीराम बी-बीयाणे उप्ता. सह.संस्था साकत,
6) श्रीगोंदा – खरेदी विक्री संघ, श्रीगोंदा,
7) मांडवगण – जय किसान बहुउद्देशीय सह. संस्था,
8) शेवगांव – खरेदी विक्री संघ,
9) बोधेगाव – सुखायु फार्मर प्रोडुसर कंपनी,
10) राहुरी – राहुरी तालुका खरेदी विक्री संघ,
11) पाथर्डी – जय भगवान स्वयंरोजगार सह. संस्था,