10 हजाराच्या लाच मागणी प्रकरणी महसुल विभागातील महिला कर्मचारी अडकली एसीबीच्या जाळ्यात | Osmanabad ACB Trap News
जामखेड टाइम्स वृत्तसेवा : महाराष्ट्रात लाचखोरीच्या प्रकरणात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. रोज राज्याच्या वेगवेगळ्या भागात लाचखोरांविरोधात कारवाया होत आहेत. लाचखोरीत महिला कर्मचारी मागे नसल्याचे समोर येत असलेल्या लाचखोरीच्या प्रकरणांवरून स्पष्ट होत आहे. काल सोलापुर जिल्ह्यातील ग्रामसेविका लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकल्यानंतर आता आज 18 रोजी उस्मानाबाद महसूल विभागातील एक महिला कर्मचारी एसीबीच्या जाळ्यात अडकली आहे.
उस्मानाबाद लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने 18 रोजी उस्मानाबाद येथे केलेल्या सापळा कारवाईत 10 हजार रूपयांच्या लाच मागणी प्रकरणात स्वाती ज्योतीराम खताळ, (Swati Jyotiram Khatal) महसुल सहाय्यक (वर्ग 3), जिल्हाधिकारी कार्यालय, उस्मानाबाद या महिला कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु केली आहे. या कारवाईने उस्मानाबाद जिल्हा प्रशासनात मोठी खळबळ उडाली आहे.मागील तीन चार दिवसांपुर्वी संपादकासह दोघांवर 2 लाखांच्या लाचखोरीची कारवाई झाली होती. त्यानंतर आता ही दुसरी कारवाई झाल्याने अनेकांचे धाबे दणाणले आहे.
उस्मानाबाद जिल्ह्यातील एका 55 वर्षीय शेतकऱ्याच्या गट क्रमांक 292 मधील क्षेत्रासाठी शेतरस्ता मिळणे कामी तहसील कार्यालय उस्मानाबाद येथे दाखल केलेल्या अर्जाचे अंतिम निकालावर तहसीलदार यांची स्वाक्षरी घेऊन निकाल देणे कामी स्वाती ज्योतीराम खताळ या महिला कर्मचाऱ्याने शेतकऱ्याकडे दहा हजार रुपये लाचेची मागणी केली होती. याबाबतची तक्रार उस्मानाबाद लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे आली होती. या तक्रारीची खातरजमा करण्यासाठी एसीबीने 21 जून 2023, 26 जून 2023 व 17 जूलै 2023 अश्या तीन दिवशी लाच पडताळणी केली होती.
त्यानंतर उस्मानाबाद लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आज 18 जूलै 2023 रोजी सापळा लावला.यावेळी स्वाती ज्योतीराम खताळ या महिला कर्मचाऱ्याने शेतकऱ्याकडे दहा हजार रुपये लाचेची मागणी करून स्वीकारण्याचे मान्य केले होते. मात्र खताळ यांना आपल्यावर कारवाई होणार याचा संशय येताच त्यांनी तक्रारदार यांच्याकडून लाच रक्कम घेण्यास नकार दिला. एसीबीने स्वाती ज्योतीराम खताळ यांच्या विरुद्ध लाच मागणीचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया हाती घेतली आहे.
सदरची कारवाई उस्मानाबाद लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस निरीक्षक संदिप आटोळे यांच्या पथकाने केली. सापळा कारवाईच्या पथकात पोलीस अंमलदार, मधुकर जाधव, विशाल डोके,विष्णु बेळे,सचिन शेवाळे यांचा समावेश होता.
लाच मागणी अहवाल
दिनांक -18/07/2023
▶️ युनिट – उस्मानाबाद
▶️ तक्रारदार – पुरुष, वय- 55 वर्षे
▶️ आरोपी लोकसेवक – स्वाती ज्योतीराम खताळ, महसुल सहाय्यक (वर्ग 3), जिल्हाधिकारी कार्यालय, उस्मानाबाद
➡️ लाचमागणी पडताळणी दिनांक – 21/06/2023, 26/06/2023, 17/07/2023
➡️ लाच मागणी रक्कम – 10,000/- रुपये
▶️ थोडक्यात हकीगत – यातील तक्रारदार यांचे मालकीचे शेत गट क्रमांक 292 मधील क्षेत्रासाठी शेतरस्ता मिळणे कामी तहसील कार्यालय उस्मानाबाद येथे दाखल केलेल्या अर्जाचे अंतिम निकालावर तहसीलदार यांची स्वाक्षरी घेऊन निकाल देणे कामी यातील आलोसे यांनी 10,000/- रुपये लाचेची मागणी करून स्वीकारण्याचे मान्य केले होते. त्यानंतर यातील आलोसे यांना संशय आल्याने त्यांनी तक्रारदार यांचे कडून लाच रक्कम घेण्यास नकार दिल्याने आज रोजी आलोसे विरुद्ध लाच मागणीचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालु आहे.
▶️ हॅश व्हॅल्यू घेण्यात आली आहे.
▶️ सापळा अधिकारी – विकास राठोड, पोलीस निरीक्षक, ला.प्र. वि. उस्मानाबाद
7719058567
▶️ मार्गदर्शक – मा.श्री. संदीप आटोळे, पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि.औरंगाबाद
9923023361
मा.श्री. विशाल खांबे, अपर पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि.औरंगाबाद
8788644994
मा. श्री. सिद्धाराम म्हेत्रे, पोलीस उपअधीक्षक, ला. प्र. वि.उस्मानाबाद
9594658686
➡️ सापळा पथक – पोलीस अंमलदार, मधुकर जाधव, विशाल डोके, विष्णु बेळे,सचिन शेवाळे ला.प्र.वि. उस्मानाबाद
आ.लो.से यांचे सक्षम अधिकारी – मा. जिल्हाधिकारी, उस्मानाबाद
भ्रष्टाचारा संबंधित काही तक्रार असल्यास
टोल फ्री क्र:- 1064
मा.पोलीस अधीक्षक, लाप्रवि औरंगाबाद:- 9923023361,यावर संपर्क साधावा.