संजय राऊत प्रकरणात कोर्टाने ‘या’ मुद्द्यावर ईडीला झापलं, राऊतांना जेलमधून बाहेर काढणारे वकिल कोण ? वाचा सविस्तर
जामखेड टाइम्स वृत्तसेवा : गेल्या 100 दिवसांपासून ईडी कोठडीत असलेले शिवसेनेचे फायर ब्रँड नेते संजय राऊत यांना आज जामीन मिळाला आहे. राऊत यांना जामीन मिळताच शिवसैनिकांसह महाविकास आघाडीच्या समर्थकांनी जल्लोष केला. राऊत यांना जामीन देताना कोर्टाने ईडीला चांगलचं फटकारलं, राऊत यांची अटकच बेकायदेशीर असल्याच परखड निरिक्षण कोर्टाने नोंदवलं, राऊत यांचा जामीन होताच सोशल मिडीयावर संजय राऊत ट्रेडिंग वर आले आहेत.
पत्राचाळ गैरव्यवहारांच्या आरोपांवरून अटक झालेल्या संजय राऊत यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. पीएमएलए कोर्टाने राऊत यांचा जामीन मंजूर केला.ईडीने आपल्या अधिकारांचा गैरवापर केला. कोर्टानं ईडीचा अर्ज रद्द केला. शिवाय सुनावणीवेळी ईडीला चांगलीच चपराकही लगावली. संजय राऊत यांची अटक बेकायदेशीर आहे. असे प्रश्न उपस्थित करत कोर्टानं थेट ईडीच्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित केला. जामीन देताना 122 पानांचा आदेश पीएमएलए कोर्टानं काढला. 9 मुद्द्यांवरून कोर्टानं ईडीचे कान टोचले.
संजय राऊत यांना कुठलंही कारण नसताना अटक झाली. राऊतांबरोबर प्रवीण राऊत यांचीही अटक बेकायदेशीर आहे. पत्राचाळ प्रकरणात साक्षीदारांच्या जबाबातून मुख्य आरोपी समोर आलेत. प्रमुख आरोपी राकेश वाधवान आणि सारंग वाधवान यांना ईडीकडून अटक झाली नाही. प्रवीण राऊत यांना दिवाणी वादासाठी अटक करण्यात आली. पत्राचाळ प्रकरणात म्हाडाची भूमिका संशयास्पद दिसते. तरीही म्हाडाचा कुठलाही कर्मचारी आरोपी करण्यात आला नाही, अशा काही मुद्यांवरून कोर्टानं ईडीला चांगलंच झापलं.
आज नाट्यमय घडामोडी घडल्या. दुपारी दीड वाजता संजय राऊत यांना जामीन मंजूर झाला. ईडीनं दुपारी तीन वाजता जामिनाविरोधात सेशन कोर्टात धाव घेतली. पीएमएलए कोर्टानं राऊत यांचा जामीन रद्द करण्यास नकार दिला. त्यानंतर साडेचार वाजता ईडीनं हायकोर्टाचा दरवाजा ठोठावला. हायकोर्टानंही राऊतांचा जामीन रद्द करण्यास नकार दिला.
कोर्टानं संजय राऊत यांना जामीन मंजूर केला. ईडीनं आधी सेशन कार्टात त्यानंतर हायकोर्टात धाव घेतली. दोन्ही ठिकाणी ईडीचा अर्ज नाकारण्यात आला. सेशन कोर्टानं अर्ज नाकारताना ईडीला झापलं.
संजय राऊतांना जामीन देताना स्पेशल पीएमएलए कोर्टाने नोंदवलेले महत्त्वाचे मुद्दे खालील प्रमाणे
- ईडी अटक करताना माणसांना मुद्दाम टार्गेट करायचा हेतू ठेवून काम करते आहे.
- अगदी जामीनाच्या पातळीवरदेखील, संजय राऊतांना ईडीने निष्कारण अटक केली हे सत्य मांडणे कोर्टाला भाग आहे.
- या प्रकरणातील मुख्य आरोपी असलेले वाधवान यांना मोकाट सोडत, ईडीने राऊतांना काहीही कारण नसताना पकडण्याचे काम केले आहे.
- साधे दिवाणी स्वरूपाचे प्रकरण हे मनी लौंडरिंग असल्याची बतावणी करून निर्दोष व्यक्तीला कोठडीत डांबून ठेवण्याचे प्रकार कोर्ट सहन करणार नाही.
- या प्रकरणी मुळात प्रवीण राऊत यांनाच साध्या दिवाणी स्वरूपाच्या वादामध्ये पीएमएलए लावून अटक केली गेली, तर संजय राऊत यांनी तर काहीही कारण नसताना यात ओढले आहे.
- जर आम्ही याठिकाणी ईडीची म्हणणे ऐकून प्रवीण राऊत आणि संजय राऊत यांना टार्गेट करण्याचे षडयंत्र चालू दिले तर लोकांचा न्यायव्यवस्थेवर विश्वास उडण्याची आम्हाला भीती असल्याने दोघांनाही याठिकाणी बेकायदेशीर अटक केल्याचे नोंदवत, जामीन मंजूर करत आहोत.
संजय राऊतांना जेलमधून बाहेर काढणारे वकील कोण ?
संजय राऊतांना तुरुंगाबाहेर काढणाऱ्या वकीलांच नावं अशोक मुंदर्गी (Ashok P. Mundargi) आहे. (Sanjay Raut Lawyer) त्यांचं बालपण आणि पदवी पर्यंतचं शिक्षण कोल्हापूरमध्ये झालं. त्यानंतर पुढील शिक्षणासाठी ते गव्हर्नमेंट लॉ कॉलेज मुंबई येथे आले. 1976 मध्ये मुंबई विद्यापीठातून त्यांनी एल एल बी चं शिक्षण पूर्ण केलं. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी कोल्हापूरमध्येच वकिलीची सुरुवात केली. 1978 मध्ये मुंबई येथील प्रसिद्ध वकील भीमराव नाईक यांच्या सोबत त्यांनी कामाला सुरुवात केली.
1997 पासून त्यांनी गुन्हेगारी संबंधातील केस लढायला सुरुवात केली. 2004 मध्ये त्यांना मुंबई हायकोर्टमध्ये वरिष्ठ वकील म्हणून मान्यता मिळाली. त्यांना 40 वर्षाहून अधिक काळ वकिलीचा अनुभव आहे. त्यांनी विविध उद्योगपती, राजकीय नेते आणि चित्रपटातील सेलिब्रिटी यांच्या केसेस लढवल्या आहेत. संजय राऊत यांना तुरुंगातून बाहेर काढण्यामागे त्यांचा खूप मोठा हात आहे.
जेलमधून बाहेर येताच संजय राऊत काय म्हणाले ?
शिवसेना खासदार संजय राऊत यांची जेलमधून सुटका होताच त्यांनी माध्यमांशी संवाद साधला, राऊत म्हणाले की, न्यायदेवतेवर पुर्ण विश्वास होता. न्यायदेवतेचे आभार मानतो. आता मी पुन्हा लढेन. आता मी कामाला पुन्हा मी सुरुवात करेन असा आत्मविश्वास राऊत यांनी जामीन मिळाल्या नंतर व्यक्त केला आहे.
100 दिवसांपेक्षा जास्त काळ तुरुंगात होतो. तुरुंगात अशी परिस्थिती असते, बाहेर काय चाललंय कळत नाही. साधनं नसतात. आता पाहतोय की बाळासाहेब ठाकरे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा कणा तुटलेला नाही. ती चालतेय धावतेय हे मी पाहतोय. शिवसैनिक लढणारा माणूस आहे. माझं अख्खं आयुष्य बाळासाहेब, उद्धव ठाकरेंसोबत गेलं आहे. एकच शिवसेना खरी आहे, ती म्हणजे बाळासाहेब ठाकरेंनी निर्माण केलेली, उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालची. बाकी सगळ्या धोतऱ्याच्या बिया आहेत, कडू’, असा टोला संजय राऊत यांनी लगावला, ते एबीपी माझासोबत बोलत होते.