Mohammed Siraj : मोहम्मद सिराजच्या दणक्याने वेस्ट इंडीज बॅकफूटवर, भारत विरुद्ध वेस्ट इंडीज दुसर्या कसोटीत नेमकं काय घडलं? पहा
IND vs WI 2nd Test Match latest update : भारत विरूध्द वेस्ट इंडीज या दोन संघात खेळवल्या जात असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यामध्ये भारतीय गोलंदाज मोहम्मद सिराज (Mohammed Siraj) याने भेदक गोलंदाजी करत वेस्टइंडीज (West Indies) संघाला अक्षरशः बॅक फुटवर ढकलले आहे. या सामन्यात भारतीय (India) गोलंदाज मोहम्मद सिराज याने पाच विकेट पटकावल्या. (Mohammad Siraj took five wickets) कपिलदेव नंतर पोर्ट ऑफ स्पेनमध्ये 5 विकेट घेणारा मोहम्मद सिराज हा दुसरा भारतीय गोलंदाज ठरला आहे. भारतीय संघाने दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या डावात 183 धावांची मोठी आघाडी घेतली आहे.
भारत विरुद्ध वेस्ट इंडीज या दोन संघांमध्ये होत असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाने पहिल्या डावांमध्ये 438 धावांचा डोंगर उभारला. याला प्रतिउत्तर देताना वेस्टइंडीज ने चांगली सुरुवात केली होती. परंतु चौथ्या दिवसाच्या खेळामध्ये भारतीय गोलंदाजांनी भेदक मारा करत पहिल्या चार षटकामध्ये तीन बळी घेतले आणि भारतीय संघाने सामन्यावर आपली पकड मिळवली.
भारतीय संघाच्या 438 धावांचा पाठलाग करताना वेस्ट इंडिज संघाच्या पहिल्या डावाची चांगली सुरुवात झाली होती. वेस्टइंडीजचा कर्णधार क्रेग ब्रेथवेट यांने 75 धावांची खेळी केली. त्याचबरोबर तेजनारायण चंद्रपॉल (33), किर्म मॅकेंझी (32), जेर्मेन ब्लॅकवूड (20) आणि जोशुआ डा सिल्व्हा (10) बाद झाल्याने तिसऱ्या दिवसअखेर वेस्ट इंडिजच्या ५ बाद २२९ धावा झाल्या होत्या.
चौथ्या दिवसाच्या पहिल्याच षटकात मुकेश कुमारने भारताला यश मिळवून दिले.एलिक अथानाझे (37) पायचीत झाला अन् भारत पुन्हा फ्रंटसीटवर बसला. दुसऱ्या षटकात मोहम्मद सिराजने आणखी एक विकेट घेताना जेसन होल्डरला (15) झेलबाद केले. अल्झारी जोसेफही (4) सिराजच्या गोलंदाजीवर पायचीत LBW झाला.
भारतीय गोलंदाज मोहम्मद सिराज याने तिसरी विकेट घेताना वेस्ट इंडीजचा नववा फलंदाज बाद केला. वेस्टइंडीज ने चौथ्या दिवशी अवघ्या 26 धावांमध्ये पाच विकेट गमावल्या. यामुळे भारतीय संघाने पहिल्या डावात 183 धावांची निर्णायक आघाडी घेतली आहे. मोहम्मद सिराजने घेतलेल्या 4 झटपट विकेटमुळे वेस्टइंडीजचा पहिला डाव 255 धावांवर आटोपला.
कपिलदेव नंतर पोर्ट ऑफ स्पेनमध्ये 5 विकेट घेणारा मोहम्मद सिराज हा दुसरा भारतीय गोलंदाज ठरला आहे. कपिल देव यांनी 1989 मध्ये पाच विकेट घेण्याची कामगिरी या मैदानावर केली होती. अशीच कामगिरी मोहम्मद सिराज याने केली.
भारतीय संघाने दुसर्या डावाची सुरूवात केली आहे. रोहित शर्मा आणि यशस्वी जयस्वाल या दोघा सलामीवीरांनी 4 षटकांत 41 धावा वसूल केल्या.