Abhishek Ghosalkar : आणखी एका राजकीय नेत्यावर अंदाधुंद गोळीबार, उध्दव ठाकरे गटाच्या माजी नगरसेवकावर गोळीबार, राजकीय वर्तुळात उडाली खळबळ!

जामखेड टाइम्स वृत्तसेवा : Abhishek Ghosalkar : महाराष्ट्राच्या राजकारणात रोज काही ना काही धक्कादायक घटना घडत आहेत. आमदार गणपत गायकवाड यांनी शिवसेनेच्या शहर प्रमुखावर गोळीबार केल्याची घटना ताजी असतानाच चाळीसगावमध्ये भाजपच्या माजी नगरसेवकावर गोळीबार करण्यात आला. ही घटना घडून 24 तास उलटत नाही तोच मुंबईतून गोळीबाराची एक घटना उघडकीस आली आहे. ठाकरे गटाच्या एका माजी नगरसेवकावर यांच्यावर गोळीबार करण्यात आल्याची घटना घडली आहे. राजकीय नेत्यांवर गोळीबार करण्यात येण्याच्या घटना वाढू लागल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

Indiscriminate firing on another political leader, firing on Abhishek Ghosalkar, former corporator of Uddhav Thackeray group, excitement in political circles,

मुंबईतील दहिसर भागातील माॅरिस नरोना (Maurice Narona) या व्यक्तीने उध्दव ठाकरे गटाचे नेते तथा माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर (Abhishek Ghosalkar) यांच्यावर गोळीबार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेत नरोना याने अभिषेक घोसाळकर यांच्यावर तीन गोळ्या झाडल्या आहेत. या घटनेत घोसाळकर गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर खाजगी रूग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. घोसाळकर यांच्यावर माॅरिसने कोणत्या कारणांवरून प्राणघातक हल्ला केला हे अद्याप समोर आलेले नाही.

गोळीबारात जखमी झालेले अभिषेक घोसाळकर (Abhishek Ghosalkar) हे ठाकरे गटाचे नेते विनोद घोसाळकर यांचे सुपुत्र आहेत. माॅरिस नरोना याने घोसाळकर यांच्या कार्यालयात घुसून गोळीबार केला. या गोळीबार अभिषेक घोसाळकर हे गंभीर जखमी झाले आहेत. दरम्यान घोसाळकर यांच्यावर गोळीबार केल्यानंतर माॅरिस नरोना याने स्वता:वरही गोळीबार केला. माॅरिस याने स्वता:वर 4 गोळ्या झाडून घेत आत्महत्येचा प्रयत्न केला, अशी प्राथमिक माहिती समोर येत आहे.

पहा गोळीबाराचा थरारक व्हिडीओ