महिला डॉक्टरच्या हत्येचे जामखेडमध्ये पडसाद, जामखेड तालुका मेडिकल प्रॅक्टीशनर्स असोशिएशन व आयएमएने नोंदवला निषेध !

जामखेड टाइम्स वृत्तसेवा : पश्चिम बंगाल राज्यातील कोलकाता येथील आरजी कार मेडिकल कॉलेजमधील प्रशिक्षणार्थी महिला डॉक्टरवर क्रूर बलात्कार करत हत्या करण्यात आल्याचे पडसाद संपुर्ण देशभर उमटू लागले आहेत. या घटनेतील आरोपींविरोधात देशभरातील डॉक्टर्स आक्रमक झाले आहेत. या घटनेचे पडसाद शनिवारी जामखेडमध्ये उमटले.जामखेड तालुका मेडिकल प्रॅक्टीशनर्स असोशिएशन व इंडियन मेडिकल असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी सदर घटनेचा निषेध नोंदवला. मानवतेला काळिमा फासणार्‍या कोलकाता येथील घटनेतील दोषींवर कठोर कारवाई करण्यात मागणी यावेळी करण्यात आली. याबाबतचे निवेदन जामखेडचे तहसीलदार गणेश माळी यांना देण्यात आले.

Jamkhed Taluka Medical Practitioners Association and IMA registered protest against the killing of lady doctor

तहसीलदार गणेश माळी यांना दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे की, कलकत्ता येथे आरजी कार मेडिकल कॉलेज व हॉस्पिटल मध्ये दिनांक 9 ऑगस्ट 2024 रोजी पहाटे सरकारी कर्तव्यावर रात्रपाळी करत असताना महिला डॉक्टर वरती अत्यंत अमानूष बलात्कार करण्यात आल व त्यानंतर या महिला डाॅक्टरची हत्या करून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न करण्यात आला. दिल्ली येथे घडलेल्या निर्भया प्रकरणारची ही पुनरावृत्ती झाली आहे. जे इतरांच्या जीवाचे रक्षण करतात त्यांच्या जीवाचे रक्षण कोण करणार ? त्यांना न्याय कोण देणार ? असा सवाल देखील या निवेदनात व्यक्त करण्यात आला आहे.

आम्ही असोसिएशन तर्फे तुमच्या मार्फत आरोग्य विभाग भारत सरकार व महाराष्ट्र सरकार यांच्याकडे अशी मागणी करतो की प्रॅक्टिस करणाऱ्या सर्वच डॉक्टर्सना शासनाकडून सुरक्षा पूरवावी व कामाचा ताण कमी करावा आणि घडलेल्या घटनेची संपूर्ण चौकशी करून गुन्हेगारांना कठोरात कठोर शासन करावे असे या निवेदनात म्हटले आहे.

Jamkhed Taluka Medical Practitioners Association and IMA registered protest against the killing of lady doctor

महीला डॉक्टरवर पाशवी बलात्कार आणि निर्घृण हत्येची सखोल चौकशी व्हावी तसेच आरोग्य कर्मचाऱ्यांवर होणारे हे सततचे हल्ले रोखण्यासाठी राष्ट्रीय स्तरावर विशेष कायदा केला जावा, या मागण्यांसह विविध मागण्या यावेळी आयएमएचे वतीने करण्यात आली.

यावेळी डॉक्टर प्रॅक्टिशनर्स असोशिएशनचे अध्यक्ष डॉ. संजय राऊत, उपाध्यक्षा डॉ. मनीषा राळेभात, सचिव डॉ. पांडुरंग सानप, डॉ. विद्या काशीद, आयएमएचे अध्यक्ष डॉ. गणेश झगडे, डॉ. आनंद लोंढे, डॉ. कल्याणराव काशीद, डॉ. महेश घोडके, डॉ. कुंडलिक अवसरे, डॉ. प्रदीप कुडके,डॉ चंद्रकांत मोरे, डॉ फारुख आझम, डॉ. तानाजी राळेभात, डॉ. सुरेश काशीद, डॉ. अशोक बांगर, डॉ. बाबासाहेब कुमटकर, डॉ. प्रताप चौरे, डॉ मनोज शिंदे, डॉ. विकास शिंदे, डॉ. जतीन काजळे, डॉ. सचिन काकडे, डॉ. सागर शिंदे, डॉ. स्वाती चकोर, डॉ. भारती मोरे, डॉ. सुजाता घोडके, डॉ. मनीषा अवसरे, डॉ. शितल कुडके, डॉ. भक्ती लोंढे, डॉ. राणी भोसले, डॉ. अर्चना झगडे, डॉ. स्वाती वराट, डॉ. रेडे मॅडम, डॉ. पल्लवी सूर्यवंशी,डॉ. मनीषा पवार, डॉ. चारुदत्त पवार, डॉ. सुहास सूर्यवंशी, डॉ. रोहिदास पवार, डॉ. वैभव तांदळे, डॉ. संतोष सांगळे, डॉ. बेलेकर संदीप, डॉ. संतोष सोनार, डॉ. विवेक दळवी, डॉ. अनिल गायकवाड, डॉ. बापू वराट,सह तालुक्यातील अनेक डॉक्टर यावेळी उपस्थित होते.