Jitendra Awhad daughter Natasha Awhad marriage | एकच नंबर ! लेक मंत्र्याची पण लगीन साधेपणाने; जितेंद्र आव्हाडांच्या लेकीच्या लग्नाची चर्चा अवघ्या महाराष्ट्रात
जामखेड टाईम्स वृत्तसेवा : Jitendra Awhad daughter Natasha Awhad marriage | राष्ट्रवादीचे नेते तथा राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (Minister Jitendra Awhad) यांच्या मुलीचे मंगळवारी अत्यंत साधेपणाने विवाह पार पडला. कोणताही गाजावाजा न करता जितेंद्र आव्हाड यांनी आपली कन्या नताशा हिचे लग्न रजिस्टर पध्दतीने लावून दिले. (Minister Jitendra Awhad daughter Natasha Awhad marriage)
आजकाल लग्न म्हटलं की ती मोठी खर्चिक आणि प्रतिष्ठा पणाला लावण्याची बाब झाली आहे. या सर्व गोष्टींना फाटा देत आव्हाडांनी आपल्या लाडक्या लेकीचा विवाह अतिशय साधेपणा लावून दिला. या लग्नाची संपुर्ण महाराष्ट्रात चर्चा सुरू आहे.
जितेंद्र आव्हाडांची एकुलती एक कन्या नताशा आव्हाड (Natasha Awhad) हिचा विवाह एलन पटेल (Alan Patel) यांच्याशी रजिस्टर पध्दतीने पार पडला. यावेळी दोन्ही कुटूंबातील मोजकेच पाहुणे उपस्थित होते.
लग्न म्हटलं की लेकीच्या बापावर प्रचंड दडपण असतं, लेकीच्या लग्नात कोणतीच गोष्ट कमी पडू नये यासाठी बाप कोणतीच कसर सोडत नाही. वेळप्रसंगी जमीन जुमला विकून, कर्ज काढून लाखोंचा खर्च करताना, होताना आपण आजही पाहतो.
त्यातच लेकीचा बाप जर राजकीय नेता, मंत्री, आमदार, खासदार असेल तर मग त्या लग्नाची बातच न्यारी असते. शाही पध्दतीने राजकारण्यांच्या कुटूंबात लग्न सोहळे पार पडतात परंतू या सर्व गोष्टींना फाटा देत अत्यंत साधेपणाने आपल्या लेकीचा विवाह करून देण्याचा आदर्श राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी संपुर्ण देशाला घालून दिला.आव्हाडांच्या या पुरोगामी कृतीने संपुर्ण महाराष्ट्राची मने जिंकली आहेत.
जा मुली तू जा दिल्या घरी तू सुखी रहा ……
बाबुल कि दुआये लेती जा
जा तुझको सुखी संसार मिले …..#NATASHA#Alan pic.twitter.com/jxn61OOUAA— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) December 7, 2021
खंडोबाचा गोंधळ… यळकोट यळकोट जय मल्हार!! pic.twitter.com/RoxUsItXjT
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) December 6, 2021
माझ्या लाडक्या नताशाच्या लग्नानिमित्त पारंपारीक श्री खंडोबा देवाच्या नावाने गोंधळ घातला. तीची सासरी जाण्याची तयारी सुरु झाली.#अस्वस्थ_क्षण pic.twitter.com/78btuum6a2
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) December 5, 2021