Karjat Jamkhed News : मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेंतर्गत कर्जत व जामखेड तालुक्यात ‘या’ दिवशी होणार रोजगार मेळावा !

Karjat Jamkhed News :   मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी अहमदनगर जिल्ह्यात २० ते ३० सप्टेंबर २०२४ दरम्यान सर्व शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत प्रत्येकी दोन रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.जामखेडमध्येही रोजगार मेळावा संपन्न होणार आहे.या योजनेंतर्गत जागेवरच निवड होणाऱ्या संधीचा लाभ अधिकाधिक युवक-युवतींनी घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी आज १२ रोजी केले आहे.

Karjat Jamkhed News, Chief Minister Youth Work Training Scheme, Employment fair will be held in Jamkhed and Karjat taluka on this day, mukhymantri yuva kary prashikshan yojana,

अहमदनगर जिल्हयातील प्रत्येक तालुक्यात रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यातील पहिला रोजगार मेळावा शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, राजूर येथे २० सप्टेंबर रोजी तर २६ सप्टेंबर रोजी दुसरा मेळावा होणार आहे. शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, राहाता येथे २० सप्टेंबर व २७ सप्टेंबर, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, राहुरी येथे २० सप्टेंबर व २५ सप्टेंबर रोजगार मेळावा संपन्न होणार आहे.

शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, नेवासा येथे २० सप्टेंबर व  २४ सप्टेंबर, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, शेवगाव येथे २० सप्टेंबर व २७ सप्टेंबर, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, जामखेड येथे २० सप्टेंबर व २६ सप्टेंबर, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, श्रीगोंदा येथे २० सप्टेंबर व २७ सप्टेंबर, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, कोपरगाव येथे २१ सप्टेंबर व २५ सप्टेंबर, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, पाथर्डी येथे २१ सप्टेंबर व २६ सप्टेंबर रोजी रोजगार मेळावा होणार आहे.

शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, कर्जत येथे २१ सप्टेंबर व २७ सप्टेंबर, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था पारनेर येथे २१ सप्टेंबर व २७ सप्टेंबर, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, संगमनेर येथे २१ सप्टेंबर व २६ सप्टेंबर, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, श्रीरामपूर येथे २३ सप्टेंबर व ३० सप्टेंबर तर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, अहमदनगर येथे पहिला मेळावा २५ सप्टेंबर २०२४ व  दुसरा रोजगार मेळावा ३० सप्टेंबर  २०२४ रोजी होणार आहे.

या रोजगार मेळाव्यासाठी उत्पादक संस्था, कृषी क्षेत्र, बँकींग, अन्न प्रक्रिया, आरोग्य, आदरतिथ्य या क्षेत्रातील नामांकित औद्योगिक आस्थापना सहभागी होऊन प्रत्यक्ष मुलाखतीद्वारे उमेदवारांची निवड करणार आहेत. इच्छुक दहावी, आयटीआय, डिप्लोमा, पदवी, पदव्यूत्तर उमेदवारांनी शैक्षणिक कागदपत्रासहित पात्रतेनूसार प्रत्यक्ष रोजगार मेळाव्यात सहभागी व्हावे व प्रत्यक्ष निवडीचा लाभ घ्यावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.