Karjat Jamkhed News : युवा नेते किरण पावणे शेकडो समर्थकांसह भाजपात दाखल, किरण पावणे यांनी जळकेवाडीत केलेले जंगी शक्तीप्रदर्शन मतदारसंघात चर्चेत !

जामखेड टाइम्स वृत्तसेवा । सत्तार शेख । रोहित पवारांच्या मनमानी व हुकुमशाही कारभाराला कंटाळून अनेक मोठ्या नेत्यांसह अनेक कार्यकर्त्यांनी तसेच गाव कारभार्‍यांनी स्वता:हून भाजपची वाट धरली आहे.अश्यातच कर्जत तालुक्याचा राजकारण आणखीन एक मोठा राजकीय भूकंप झाला आहे. राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून पक्षात कार्यरत असलेले अभ्यासू युवा नेते किरण पावणे यांनी आपल्या शेकडो समर्थकांसह राष्ट्रवादीला रामराम ठोकला आहे. त्यांनी नुकताच भाजपात प्रवेश केला.या राजकीय भुकंपाने कर्जतच्या राजकारणात मोठी खळबळ उडवून दिली आहे. पक्ष प्रवेशावेळी सरपंच किरण पावणे यांनी केलेले जंगी शक्तीप्रदर्शन मतदारसंघात चर्चेत आले आहे.

Karjat Jamkhed News, NCP SP Youth leader Kiran Pavane joins BJP with hundreds of supporters, Kiran Pavane's demonstration of power in Jalakewadi is discussion in Karjat jamkhed constituency,

आमदार प्रा राम शिंदे यांनी शुक्रवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. त्याच दिवशी रात्री रोहित पवारांच्या मजबुत बालेकिल्ल्यात मोठा भूकंप झाला.राष्ट्रवादीचे युवा नेते तथा जळकेवाडी गावचे सरपंच किरण पावणे यांनी आपल्या शेकडो समर्थकांसह आमदार प्रा राम शिंदे यांच्या नेतृत्वाखाली भाजपात जाहीर प्रवेश केला. उमेदवारी अर्ज दाखल करताच आमदार राम शिंदे यांनी रोहित पवारांना जोरदार धक्का दिला.या राजकीय भूकंपामुळे राष्ट्रवादीचा मजबुत बालेकिल्ला उध्वस्त झाला. सरपंच किरण पावणे यांच्या पक्ष प्रवेश सोहळ्यासाठी अख्खं गाव उपस्थित होतं. जनतेत लोकप्रिय असलेलं युवा नेतृत्व भाजपमध्ये दाखल झाल्याने आमदार राम शिंदेंची ताकद वाढली आहे.

Karjat Jamkhed News, NCP SP Youth leader Kiran Pavane joins BJP with hundreds of supporters, Kiran Pavane's demonstration of power in Jalakewadi is discussion in Karjat jamkhed constituency,

कर्जत तालुक्याच्या राजकारणात जळकेवाडी गाव सतत चर्चेत असतं. नेहमी या गावावर राष्ट्रवादीची सत्ता राहिलेली आहे. परंतू आता राष्ट्रवादीचे सरपंच किरण पावणे यांनी आपल्या समर्थकांसह भाजपात प्रवेश करून खळबळ उडवून दिली आहे. जळकेवाडीत पार पडलेल्या पक्ष प्रवेश सोहळ्यात सरपंच किरण पावणे यांनी भव्यदिव्य शक्तीप्रदर्शन केले. यावेळी अख्ख गावचं उपस्थित होतं. मतदारसंघाची हवा पुर्णता बदलली असून भूमिपुत्राच्या पाठीशी जनतेची ताकद एकवटली असल्याचेच चित्र या पक्ष प्रवेश सोहळ्यातून समोर आले आहे, अशी जोरदार चर्चा जनतेत आहे.

Karjat Jamkhed News, NCP SP Youth leader Kiran Pavane joins BJP with hundreds of supporters, Kiran Pavane's demonstration of power in Jalakewadi is discussion in Karjat jamkhed constituency,

जळकेवाडीत राजकीय भूकंप

जळकेवाडी गावचे सरपंच सरपंच किरण पावणे यांच्यासह माजी उपसरपंच संभाजी पावणे मेजर, चेअरमन संतोष पवार, चेअरमन पप्पु पावणे, ग्रामपंचायत सदस्य दत्तात्रय मोरे, गौतम सातकर, सुरेश मोरे, सुभाष मोरे,दत्ता नरुटे, तुकाराम ढवळे, अजिनाथ सोनवणे, महादेव पावणे, दत्तात्रय भिसे, बबन हजारे, अर्जुन कोकरे, भीमा कोकरे सह आदींनी भाजपात प्रवेश केला.

Karjat Jamkhed News, NCP SP Youth leader Kiran Pavane joins BJP with hundreds of supporters, Kiran Pavane's demonstration of power in Jalakewadi is discussion in Karjat jamkhed constituency,

यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष शेखर खरमरे, जिल्हा परिषद सदस्य अशोक खेडकर, माजी सभापती प्रकाश काका शिंदे, विनोद दळवी, अनिल गदादे, काकासाहेब धांडे, दादा सोनमाळी, बापु शेळके, शहाजीराजे भोसले, राहूल गांगर्डे, पप्पुशेठ दोधाड, उद्योजक दत्ता ढवळे, माजी सरपंच अशोक मुळीक, बापूसाहेब शिंदे, भाऊ काळे, सुखदेव मुळीक, बबन मोरे, तानाजी ढवळे, राजेंद्र पावणे, दत्ता सातकर, बापूराव ढवळे, अंकुश मुळीक, शिवाजी कोकरे, गोट्या झिटे, राजेंद्र पावणे, सुदाम भिसे सिद्धेश्वर, भिसे, राजेंद्र पवार, राहुल पवार,पंडित पवार, ऋषिकेश जगताप, दत्ता लेकुरवाळे यांच्यासह अनेक मान्यवर व ग्रामस्थ मोठ्या संखेने उपस्थित होते.

Karjat Jamkhed News, NCP SP Youth leader Kiran Pavane joins BJP with hundreds of supporters, Kiran Pavane's demonstration of power in Jalakewadi is discussion in Karjat jamkhed constituency,

कोण आहेत किरण पावणे ?

किरण पावणे हे कर्जत तालुक्यातील जळकेवाडी गावचे सरपंच आहेत. राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून त्यांचे कुटूंब राष्ट्रवादीत सक्रीय आहे. सत्ता नसतानाही त्यांनी पक्षाचा विचार आणि झेंडा कायम फडकवत ठेवला. राष्ट्रवादीतील निष्ठावंत म्हणून त्यांची राजकीय वर्तुळात ओळख आहे. जळकेवाडीत गेल्या १५ वर्षांपासून त्यांची सत्ता आहे. यातील १० वर्षांपासून ते सरपंच म्हणून गावचा कारभार पाहत आहेत. किरण पावणे यांनी २०१४ साली राष्ट्रवादीकडून पंचायत समिती निवडणुक लढवली होती. त्यात त्यांचा थोड्या मतांनी पराभव झाला होता. त्याचबरोबर त्यांनी कर्जत बाजार समितीची सुध्दा निवडणुक लढवलेली आहे. किरण पावणे हे उद्योजक आहेत. व्यवसायाच्या माध्यमांतून त्यांचे कर्जत जामखेड मतदारसंघात मोठे नेटवर्क आहे. तरूणांची मोठी फळी त्यांच्याकडे आहे. अभ्यासू, शांत, संयमी नेतृत्व अशी ओळख असलेल्या किरण पावणे हे जनाधार असलेले युवा नेते आहेत. सर्व राजकीय पक्षांमध्ये मित्रत्वाचे संबंध असलेले नेतृत्व म्हणूनही त्यांना मतदारसंघात ओळखले जाते.

राष्ट्रवादीतून बाहेर पडताच सरपंच किरण पावणे काय म्हणाले ?

यावेळी पक्ष प्रवेश सोहळ्यात बोलताना किरण पावणे म्हणाले की, राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून आम्ही सर्वजण पक्षाचे काम करत होतो, आम्हाला नेहमी वाटायचे आपल्या पक्षाचा आमदार व्हावा, त्यानुसार मागच्या निवडणुकीत रोहित पवारांच्या विजयासाठी आम्ही प्रचंड मेहनत घेतली. आता आपला आमदार झाल्यावर चित्र बदलेल असं आम्हाला वाटलं होतं, पण पाच वर्षांत त्यांनी पार निराशा केली. विकास काम तर सोडाच रोहित पवारांनी कार्यकर्त्यांचा कधीच मान सन्मान राखला नाही, पाच वर्षांत त्यांचा फक्त दोनदा फोन आला. जळकेवाडीचा सरपंच म्हणून मला साडेतीन वर्षे ओळखलेच नाही. मार्केट कमिटीच्या निवडणूकीत मी तिकीट मागायला गेलो तेव्हा रोहित पवारला कळलं मी जळकेवाडीचा सरपंचय,असा अनुभव यावेळी किरण पावणे यांनी सांगितला.

Karjat Jamkhed News, NCP SP Youth leader Kiran Pavane joins BJP with hundreds of supporters, Kiran Pavane's demonstration of power in Jalakewadi is discussion in Karjat jamkhed constituency,

राम शिंदे साहेब पालकमंत्री असताना दुष्काळ पडला होता, तेव्हा छावणीची गरज होती. मी विरोधात असतानाही शिंदे साहेबांनी मोठं मन दाखवत माझ्या मागणीनुसार गावाला छावणी दिली. पशुधन वाचवण्याचे काम त्यांनी त्यावेळी केले होते, असे सांगत किरण पावणे पुढे म्हणाले की, महाविकास आघाडीचे सरकार असताना रोहित पवारांकडे मी दोन चार पत्र घेऊन गेलो, म्हणलं एव्हढे एव्हढे कामं द्या, असं असं करा, पत्र घ्यायचे टाकायचे.. पत्र घ्यायचे टाकायचे.. त्याचा रिप्लाय नाही.. विषय नाही.. काहीच होत नव्हतं, रोहित पवारांनी पाच वर्षांत गावाला एक काम दिलं, त्याला ठेकेदार बारामतीचा दिला. त्याने काम नीट केलं नाही.

Karjat Jamkhed News, NCP SP Youth leader Kiran Pavane joins BJP with hundreds of supporters, Kiran Pavane's demonstration of power in Jalakewadi is discussion in Karjat jamkhed constituency,

मी भाजपात यावे यासाठी अनेकदा आमदार प्रा राम शिंदे यांच्याकडून मला निमंत्रण यायचे, परंतू मी नेहमी पक्षाशी एकनिष्ठ राहिलो, सत्तेत जावं, सत्तेचा लाभ घ्यावा, असा विचार तेव्हा कधीच माझ्या मनात आला नाही, त्यामुळे मी यापुर्वी भाजपात गेलो नाही. आपला आमदार झालाय म्हणल्यावर आता दिवस बदलतील ही अपेक्षा होती. रोहित पवारांनी पाच वर्षांत पार निराशा केली. ज्यांनी मागच्या निवडणुकीत विजयासाठी जीवाचं रान केलं त्या कार्यकर्त्यांचा मान सन्मान वाढवण्याऐवजी रोहित पवारांनी खच्चीकरण करण्याचे काम केले, असा हल्लाबोल पावणे यांनी यावेळी केला. 

Karjat Jamkhed News, NCP SP Youth leader Kiran Pavane joins BJP with hundreds of supporters, Kiran Pavane's demonstration of power in Jalakewadi is discussion in Karjat jamkhed constituency,

किरण पावणे म्हणाले की, यंदाच्या निवडणुकीत बाहेरचा नको तर आपला भूमिपुत्र आमदार हवा आहे, त्यासाठी भाजपात प्रवेश केला आहे. सर्वांनी आमदार प्रा.राम शिंदे यांच्या विजयासाठी जोमाने कामाला लागावे असे अवाहन यावेळी त्यांनी केले.