कर्जत : द्राक्ष बाग व्यवस्थापन, डाळिंब लागवड तंत्रज्ञान व रोग नियंत्रण या विषयावर बेनवडीत परिसंवाद संपन्न !

जामखेड टाइम्स वृत्तसेवा : शेतमालाचे उत्पादन वाढवण्यासाठी शेतकरी बांधवांनी कृषि विद्यापीठाचे नवीन तंत्रज्ञान अवगत करावे तसेच कृषिदर्शनी खरेदी असे अवाहन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय कृषि महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. गोरक्ष ससाणे यांनी कर्जत तालुक्यातील बेनवडी येथे आयोजित करण्यात आलेल्या द्राक्ष बाग व्यवस्थापन, डाळिंब लागवड तंत्रज्ञान व रोग नियंत्रण या विषयावर आयोजित परिसंवादात बोलताना केले.

Karjat,Benwadi seminar on vineyard management, pomegranate cultivation technology and disease control was concluded,

कर्जत तालुक्यात प्रामुख्याने द्राक्ष आणि डाळिंब या फळपीकांचे उत्पादन घेतले जाते, त्या अनुषंगाने शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेण्यासाठी द्राक्ष बाग व्यवस्थापन, डाळिंब लागवड तंत्रज्ञान व रोग नियंत्रण या विषयावरील परिसंवादाचे कर्जत तालुक्यातील बेनवडी येथे आयोजन करण्यात आले होते. हळगाव येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय कृषि महाविद्यालय,बँक ऑफ महाराष्ट्र, ग्रामीण विकास केंद्र, भिगवण आणि कृषि विभाग (आत्मा), कर्जत यांच्या संयुक्त विद्यमाने हा परिसंवाद मोठ्या उत्साहात पार पडला.या परिसंवादाच्या अध्यक्षस्थानी हळगाव कृषि महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. गोरक्ष ससाणे हे होते. यावेळी ते बोलत होते.

Karjat,Benwadi seminar on vineyard management, pomegranate cultivation technology and disease control was concluded,

द्राक्ष रोग व्यवस्थापन कसे करावे तसेच विविध जैविक घटकांचा वापर कसा करावा याविषयी डाॅ मनोज गुड यांनी शेतकरी बांधवांना सविस्तर माहिती दिली. तसेच राजेंद्र वाघमोडे यांनी द्राक्ष व डाळिंब लागवड विषयी नवीन तंत्रज्ञानाचा उपयोग करून कमी खर्चात शेती कशी करावी व सुधारित वाणाचा वापर करून पिकाचे उत्पादन कसे वाढवावे या संबंधी मार्गदर्शन केले. मंडल कृषि अधिकारी संजय घालमे यांनी शेतकऱ्यांसाठी उपयुक्त असणाऱ्या विविध शासकीय योजनांची माहिती दिली.या परिसंवादादरम्यान शेतकऱ्यांना पिकासंदर्भात येणाऱ्या अडचणींबद्दल प्रश्न उपस्थित केले आणि विषयतज्ञांनी त्यांच्या शंकांचे निरसन केले.

shital collection jamkhed

यावेळी हळगाव कृषि महाविद्यालयाचे कार्यक्रम समन्वयक, डॉ. सखेचंद अनारसे, विषयतज्ञ डॉ. मनोज गुड, कार्यक्रम अधिकारी प्रा. अर्चना महाजन, मंडळ कृषि अधिकारी संजय घालमे, द्राक्ष पिक तज्ञ राजेंद्र वाघमोडे, बँक ऑफ महाराष्ट्रचे अधिकारी, तसेच गावातील नागरिक व शेतकर, आजी – माजी लोकप्रतिनिधी यावेळी उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कृषिकन्या स्मरणिका पाडळे व कार्यक्रमाची सांगता कृषिकन्या वैष्णवी रानमाळे यांनी केले. या परिसंवादासाठी शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हळगाव कृषि महाविद्यालयाच्या कृषिकन्या कर्जत तालुक्यातील बेनवडी, कोळवडी आणि कोरेगाव येथे गेल्या काही दिवसांपासून कार्यरत आहेत. या भागात त्या विविध उपक्रम राबवून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना दिसत आहेत. शेतकरी बांधव आपल्या समस्यांची सोडवणूक करण्यासाठी कृषिकन्यांशी दिलखुलास संवाद साधताना दिसत आहे.