जामखेड टाईम्स वृत्तसेवा । Big Breaking | संतोष परब हल्ला प्रकरणात फरार असलेले भाजपा आमदार नितेश राणेंना कणकवली दिवाणी न्यायालयाने मोठा दणका दिला आहे. नितेश राणेंना जामीन मिळेल असे वाटत असतानाच कोर्टाने राणे यांना पोलिस कोठडी सुनावली आहे. कोर्टाच्या या निर्णयामुळे राणे कुटूंबियांना मोठा हादरा बसला आहे. (BJP MLA Nitesh Rane remanded in police custody in Santosh Parab attack case)
भाजप आमदार नितेश राणेंना (Nitesh Rane) काल सिंधुदूर्ग कोर्टाने जामीन फेटाळून लावत मोठा दणका दिला होता. त्यानंतर राणे यांनी हायकोर्टात धाव घेतली होती परंतू तिथेही राणेंना दिलासा मिळाला नव्हता. अखेर गेल्या अनेक दिवसांपासून अटकेपासून वाचणाऱ्या नितेश राणे स्वता:हून कोर्टासमोर शरण आले होते. (Big Breaking, BJP MLA Nitesh Rane remanded in police custody in Santosh Parab attack case)
त्यानंतर कोर्टाने त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली होती परंतू सरकारी वकील प्रदीप घरत यांनी पोलिस कोठडीची मागणी केली. त्यानंतर न्यायालयाने पोलिसांना आपले म्हणणे मांडण्यास सांगितले. पोलिसांचा अहवाल आल्यानंतर न्यायालयाने नितेश राणे यांना पोलिस कोठडी सुनावली.
नितेश राणेंना कोर्टाने सुनावली 2 दिवसांची पोलिस कोठडी
कणकवली दिवाणी कोर्टाने आमदार नितेश राणे यांना 4 फेब्रुवारी पर्यंत अर्थात दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. राणे यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. (Big Breaking, BJP MLA Nitesh Rane remanded in police custody in Santosh Parab attack case)
संतोष परब हल्ला प्रकरणात नितेश राणे अडचणीत
संतोष परब हल्ला (Santosh Parab Attack Case) प्रकरण नितेश राणे यांना चांगलच भोवलं आहे. सर्वच कोर्टातून राणे यांचा जामीन अर्ज फेटाळून लावण्यात आला होता. परंतू सुप्रीम कोर्टानेही राणेंचा जामीन अर्ज फेटाळताना राणेंना दहा दिवस अटकेपासून संरक्षण दिले होते. त्यानुसार राणे यांनी सिंधुदूर्ग कोर्टात जामीनासाठी अर्ज केला होता. परंतू कालच कोर्टाने तो अर्ज फेटाळून लावला होता. तसेच मुंबई हायकोर्टातही राणेंना दिलासा मिळाला नव्हता. (Big Breaking, BJP MLA Nitesh Rane remanded in police custody in Santosh Parab attack case)
कोर्टासमोर हायव्होल्टेज ड्रामा
नितेश राणेंचा जामीन कोर्टाने फेटाळल्यानंतर सिंधुदुर्ग कोर्टासमोर हायव्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला. कारण राणेंंना जामीन फेटाळल्यानंतर भाजप कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाल्याचे दिसून आले. यावेळी माजी खासदार निलेश राणे हेही आक्रमक पवित्रा घेताना दिसून आले होते.