bjp news | अखेर सुटका : केंद्रीयमंत्री नारायण राणे यांना मिळाला जामीन !

रात्री उशिरा राणे यांना महाड कोर्टाने जामिन दिला.

 

जामखेड टाईम्स वृत्तसेवा : bjp news | राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधात अक्षेपार्य वक्तव्य केल्याप्रकरणी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर मंगळवारी अटकेची कारवाई करण्यात आली होती. रात्री उशिरा राणे यांना महाड कोर्टाने जामिन दिला. (Union Minister Narayan Rane gets bail)

महाड न्यायदंडाधिकाऱ्यांनी सशर्त जामीन मंजूर केला आहे. 15 हजार जातमुचलक्यांवर जामीन मंजूर करण्यात आला आहे. तसंच, नारायण राणे यांनी भविष्यात पुन्हा असे वक्तव्य करणार नाही, अशी ग्वाही देण्यात आली आहे.दिवसभर राज्याच्या राजकारणात रंगलेल्या अटक नाट्यावर अखेर पडदा पडला आहे परंतु आता नारायण राणे काय भूमिका घेणार याकडे राज्याचे लक्ष लागले  आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर भागातील गोळवली येथून ताब्यात घेत पोलिसांनी अटक केली होती.(Golvali in Sangameshwar area of ​​Ratnagiri district) दिवसभर यावरून मोठा राजकीय गदारोळ निर्माण झाला होता. आक्रमक झालेल्या भाजपने राज्यात ठिकठिकाणी अंदोलने करून कारवाईचा निषेध नोंदवला होता. केंद्रातील भाजपच्या (bjp news) नेत्यांनी व मंत्र्यांनी या कारवाईवरून राज्य सरकारवर टीकास्त्र सोडले होते.

Union Minister Narayan Rane gets bail | केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना अटक केल्यानंतर रायगडमधील महाड येथील कोर्टात (Mahad Court) रात्री उशिरा हजर करण्यात आले. ॲड अनिकेत निकम (Ad Aniket Nikam) यांनी राणे यांच्यावतीने युक्तिवाद केला. राणे यांच्या तब्येतीचं कारणही यावेळी देण्यात आलं.

Union Minister Narayan Rane gets bail |  तर पोलिसांकडून ७ दिवसांच्या कोठडीची मागणी करण्यात आली होती. ही मागणी करताना राणे यांना जामीन दिल्यास पुन्हा कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो असा युक्तिवाद सरकारी वकिलांकडून करण्यात आला.

Union Minister Narayan Rane gets bail |  राणे यांनी मुख्यमंत्र्यांची बदनामी करण्यासाठी जाणीवपूर्वक आक्षेपार्ह विधान केले. त्यामागे कटाचा भाग असू शकतो. त्याचा तपास करायचा असल्याने त्यांना कोठडी देण्यात यावी, अशी विनंतीही करण्यात आली. कोर्टाने दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकून राणे यांना जामीन मंजूर केला आहे.महिन्यातून दोन वेळा पोलीस स्टेशनमध्ये दाखल होण्याचे आदेश कोर्टाने नारायण राणे यांना दिले आहेत. (bjp news)

दरम्यान दुपारपासून रंगलेल्या शिवसेना विरूध्द नारायण राणे (Narayan Rane against Shiv Sena) या सामन्याचा पहिला अंक जामिनानंतर संपला आहे. आता राणे काय भूमिका घेतील याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.(bjp news)

 

नारायण राणे यांना जामिन मिळाल्यानंतर राणेंचा बालेकिल्ला असलेल्या सिंधुदुर्गातील कुडाळ आणि कणकवलीमध्ये (In Kudal and Kankavali in Sindhudurg) भाजप कार्यकर्ते आणि राणे समर्थकांनी जल्लोष साजरा केला. ठिकठिकाणी फटाक्यांची आतषबाजी करीत कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला. तसेच नारायण राणेंच्या समर्थनार्थ घोषणाही दिल्या. (bjp news)