Politics heated up after the arrest of Narayan Rane | उध्दव ठाकरेंच्या हाबाड्याने भाजप झाली घायाळ,आक्रमक भाजपकडून राज्यभरात अंदोलने

पोलिसांनी राणे यांना घेतले जेवत्या ताटावरून ताब्यात

 

जामखेड टाईम्स वृत्तसेवा : Politics heated up after the arrest of Narayan Rane | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधात सातत्याने खालच्या पातळीवर जाऊन टिका करणे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना चांगलेच महागात पडले आहे. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी दिलेल्या हाबाड्याने मंत्री नारायण राणे व भाजपा पुरती घायाळ झाल्याचे चित्र गल्ली ते दिल्ली दिसु लागले आहे. राणे यांच्यावरील कारवाईनंतर केंद्रीय नेत्यांपासून सर्व जण महाविकास आघाडी सरकार विरोधात आक्रमक झाल्याचे दिसु लागले आहे. राज्यात ठिकठिकाणी भाजपाने अंदोलन हाती घेतली आहेत.

Politics heated up after the arrest of Narayan Rane | मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या विरोधात प्रक्षोभक वक्तव्य केल्याप्रकरणी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला होता. त्यांच्या अटकेसाठी नाशिक पोलिसांनी कारवाई सुरू केली होती. दरम्यान रत्नागिरी पोलिसांनी राणे यांना जेवत्या ताटावरून ताब्यात घेतल्याने राज्याच्या राजकारणासह देशाच्या राजकारणात मोठा गदारोळ निर्माण झाला होता. दरम्यान राणे विरूध्द शिवसेना या वादाचे पडसाद आज दिवसभर राज्यात उमटले. शिवसेनेने आक्रमकपणे राणे यांच्याविरोधात अंदोलने केली. पुण्यातील राणे यांच्या माॅलचीही शिवसेनेकडून तोडफोड करण्यात आली.

Politics heated up after the arrest of Narayan Rane | दरम्यान राणे यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर जामिनासाठी राणे यांनी कोर्टात धाव घेतली होती. नारायण राणे यांना कोर्टाने मोठा धक्का दिला आहे. या प्रकरणात नारायण राणे यांनी अटकपूर्व जामिनासाठी रत्नागिरी कोर्टात दाखल केलेला अर्ज कोर्टाने फेटाळून लावला आहेत. त्यामुळे नारायण राणे यांच्यावरील अटकेची कारवाई अटळ आहे. मात्र नारायण राणे यांनी रत्नागिरी कोर्टाच्या निकालाविरोधात मुंबई हायकोर्टात धाव घेतली आहे अशीही माहिती समोर येत आहे. दरम्यान राणे यांच्यावरील कारवाईनंतर राज्यात वेगवान घडामोडी घडत आहेत.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी देशाच्या स्वातंत्र्य दिनाबद्दल बोलताना केलेल्या विधानाचा संदर्भ देत नारायण राणेंनी काल एक वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. रायगडमध्ये नारायण राणेंनी हे चिथावणीखोर विधान केल्यानंतर महाड, नाशिकमध्ये गुन्ह्याची नोंद झाली होती. उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री आहेत. ते घटनात्मक पदावर आहेत. त्यामुळे त्यांच्याबद्दल केलेलं विधान हे संपूर्ण राज्याचा अपमान करणारं आहे, अशी तक्रार नाशिकचे शिवसेनेचे पदाधिकारी सुधाकर बडगुजर यांनी दाखल केली होती.

नारायण राणेंच्या विरोधात कलम ५००, ५०२, ५०५, १५३ (अ) अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. राणेंच्या विधानानं समाजात द्वेष, तेढ निर्माण होऊ शकतो, कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, अशी आशयाची तक्रार दाखल करण्यात आली. त्यानंतर नाशिक पोलिसांनी राणेंच्या अटकेचे आदेश काढले होते.

दरम्यान राणे यांच्यावरील कारवाईनंतर वेगवेगळ्या प्रतिक्रिया आता समोर येऊ लागल्या आहेत. (Politics heated up after the arrest of Narayan Rane )