Krushi mantri maharashtra 2024 : महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाचे खातेवाटप (khate vatap 2024) शनिवारी जाहीर करण्यात आले. नाशिक जिल्ह्यातील जेष्ठ नेते माणिकराव कोकाटे (Manikrao kokate nashik) यांच्या खांद्यावर राज्याचे नवे कृषि मंत्री म्हणून जबाबदारी सोपविण्यात आली आहे. कोकाटे हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (NCP mla) आमदार आहेत. शिंदे सरकारमध्ये हिच जबाबदारी धनंजय मुंडे यांच्याकडे होती. पण आता देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये राज्याचे नवे कृषी मंत्री म्हणून (Agriculture Minister) माणिकराव कोकाटे हे जबाबदारी संभाळणार आहेत. (Krushi Mantri Maharashtra)
माणिकराव कोकाटे हे नाशिक जिल्ह्यातील सिन्नर मतदारसंघाचे आमदार आहेत. ते सलग सहाव्यांदा निवडून आले आहेत. त्यांनी नाशिक जिल्हा परिषद, कृषी व पशुसंवर्धन समितीचे सभापती, सिन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक, नाशिक जिल्हा देखरेख संघाचे चेअरमन, नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष, नाशिक सहकारी साखर कारखान्यावर बँक प्रतिनिधी म्हणून काम केले आहे. सहकार क्षेत्रात त्यांचा चांगला अभ्यास आहे.
सिन्नर भागातील दुष्काळावर मात करण्यासाठी माणिकराव कोकाटे यांनी नदीजोड प्रकल्प मंजुर करून आणण्यात त्यांनी यश मिळवले. या प्रकल्पासाठी साडे तेरा हजार कोटींचा निधी मंजुर करून आणला आहे.
राज्यातील शेतकऱ्यांच्या जीवनात नवी क्रांती आणण्याची जबाबदारी नवे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या खांद्यावर असणार आहे. कोकाटे हे दूरदृष्टी असणारे नेते म्हणून ओळखले जातात. राज्यातील शेती व्यवसाय संकटात आहे. या व्यवसायाला भरारी देण्यासाठी कोकाटे हे कोणते नवे प्रयोग राबवतात याकडे राज्यातील शेतकरी बांधवांचे लक्ष लागले आहे.