Krushi Sevak bharti 2023 : खुशखबर! कृषी सेवक भरतीची घोषणा, 2109 कृषि सेवक पदांची भरती सुरू, पटकन करा ऑनलाईन अर्ज !
जामखेड टाइम्स वृत्तसेवा : गेल्या साडे तीन वर्षांपासून रखडलेल्या कृषि सेवक (krushi sevak bharti 2023) भरतीला अखेर मुहूर्त लागला आहे. महाराष्ट्र सरकारने कृषि विभागात (Agriculture Department) तब्बल 2109 कृषि सेवक पदांची भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्याच्या आठही महसूल विभागात ही भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे.
कृषि विभागामार्फत राबवल्या जाणाऱ्या कृषि सेवक भरती बाबत समोर आलेल्या माहितीनुसार दुय्यम सेवा निवड मंडळाच्या कक्षेतील गट क संवर्गातील कृषि सहाय्यकांची रिक्त पदे कृषि सेवक म्हणून सरळसेवेने भरली जाणार आहेत. राज्यात कृषि सेवकांचे 2 हजार 638 पदे रिक्त आहेत त्यापैकी 2 हजार 109 पदांची भरती केली जाणार आहे.
कृषि सेवक भरती बाबत येत्या आठ ते दहा दिवसांत अर्ज प्रक्रियेची माहिती कृषि विभागाच्या वेबसाईटवर जारी केली जाणार आहे. त्यानंतर कृषि सेवक पदासाठी पात्र असलेल्या उमेदवारांनी www.krushi.maharashtra.gov.in या वेबसाईटवर ऑनलाईन अर्ज सादर करायचे आहेत.
कोणत्या विभागात किती जागा भरणार
नाशिक – 336
ठाणे – 294
पुणे – 188
कोल्हापूर- 250
अमरावती – 227
औरंगाबाद- 196
लातुर – 170
नागपुर – 448
कृषि सेवक पदासाठी होणार 200 गुणांची परीक्षा
अनुसूचित क्षेत्राबाहेरील आणि क्षेत्रातील अशा दोन्ही प्रवर्गातील ही भरती होईल. कृषी सेवक पदासाठी खुल्या प्रवर्गासाठी कमाल मर्यादा ३८ वर्षे, तर मागासवर्गीय उमेदवारांसाठी ४३ वर्षे आहे. या पदासाठी प्रतिमाह १६ हजार रुपये वेतन राहील. कृषी विषयामधील पदविका, पदवी आवश्यक राहील. परिक्षेचे स्वरूप हे २०० गुणांचे १४० वस्तुनिष्ठ आधारित प्रश्न असे आहे. यामध्ये मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, बौद्धिक चाचणी, कृषी विषय यावर आधारित प्रश्न असतील. भरतीसाठी मागासवर्गीय उमेदवारांना ९०० रुपये, तर अमागासवर्गीय उमेदवारांसाठी १ हजार रुपये परिक्षा शुल्क आहे.