सोलापूर : ST Bus Employee Hunger Strike | राज्यातील महाराष्ट्र परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी अंदोलन हाती घेतले आहे. या अंदोलनामुळे गुरूवारी राज्यातील एसटी बसच्या सेवेवर मोठा परिणाम झाला. लालपरीचे चाके थबकल्याने राज्यातील प्रवाश्यांना याचा मोठा फटका बसला.
एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी संयुक्त कृती समितीच्यावतीने 27 ऑक्टोबरपासून राज्यस्तरीय बेमुदत उपोषण ( ST Bus Employee Hunger Strike) सुरू करण्यात आले आहे.या उपोषणास पाठिंबा म्हणून एसटी कामगारांनी गुरुवारपासून उपोषण सुरू केले आहे. एसटीचे सर्व कर्मचारी संपात सहभागी झाल्याने राज्यातील अनेक आगारातून एकही बस सुटू शकली नाही. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय झाली आहे.
एस टी कर्मचाऱ्यांच्या मागण्या
1) वार्षिक वेतन वाढीचा दर तीन टक्के करावा.
2) राज्य सरकारप्रमाणे देय महागाई भत्ता अदा करावा.
3) राज्य सरकारप्रमाणे देय घर भाडे अदा करावे,
4) सण उचल म्हणून बारा हजार पाचशे रुपये दिवाळीपूर्वी अदा करावी
5) दिवाळीपूर्वी पंधरा हजार रुपये बोनस मिळावा
या मागण्यांसाठी संयुक्त कृती समितीच्या वतीने मुंबई येथे बेमुदत उपोषण सुरू करण्यात आले आहे. या अंदोलनास राज्यातील अनेक बस आगारातील कर्मचाऱ्यांनी पाठिंबा देत उपोषण केले.
सोलापुरातही उपोषणाचे अंदोलन
संयुक्त कृती समितीच्या वतीने एसटी कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी हाती घेण्यात आलेल्या उपोषणाच्या अंदोलनास सोलापुरातही मोठा प्रतिसाद मिळाला. एसटी कर्मचाऱ्यांची वेळेवर पगार नसल्याने उपासमार होत आहे शासन दरबारी वेळोवेळी विविध मागण्यासाठी निवेदन देऊन सुध्दा न्याय मिळत नसल्याने एसटी कर्मचारी संतापलेला आहे. एसटी कर्मचारी म्हणजे लालपरीचा सेवक हा नेहमीच अडचणीत दिवस काढत आहे.वेळेवर पगार मिळावा. याशिवाय विविध प्रश्न मार्गी लागावे यासाठी शासनदरबारी न्याय मागत आहे.दिवाळीच्या तोंडावर लालपरीचा सेवक संपावर गेल्याने प्रवाश्यांची तारांबळ उडाली आहे.
या काम बंद आंदोलनात कृती समिती प्रमुख सल्लागार राज्य उपाध्यक्ष महाराष्ट्र एसटी कामगार सेना प्रकाश अवस्थी, प्रादेशिक सहसचिव शशिकांत झुंजार , विभागीय सचिव शिवाजी काशीद , विभागीय कोषाध्यक्ष सोमनाथ बिज्जरगी यांच्या सह अनेक पदाधिकारी व कर्मचारी या अंदोलनात सहभागी झाले होते.
जामखेडमध्येही अंदोलन
अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड बस आगारातही काम बंद अंदोलन करण्यात आले. याचा मोठा फटका प्रवाश्यांना बसला.