Leopard Attack Maharashtra : बिबट्याच्या हल्ल्यात 1 महिला ठार, अहमदनगर जिल्ह्यातील ‘या’ तालुक्यातील घटना
जामखेड टाइम्स वृत्तसेवा : leopard attack maharashtra : गेल्या काही वर्षांपासून बिबट्यांची संख्या वाढली आहे. यामुळे बिबट्या (leopard) आणि मानव यांच्यातील संघर्ष दिवसेंदिवस वाढत चालला आहे.महाराष्ट्रात अत्तापर्यंत शेकडो नागरिक बिबट्याच्या हल्ल्यात ठार झाले आहेत. अशीच एक घटना समोर आली आहे. बिबट्याच्या हल्ल्यात एक महिला ठार झालीय. अहमदनगर (Ahmednagar) जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यात ही घटना घडली आहे. (leopard attack sangamner, Sangeeta Shivaji Varpe Nimgaon Tembi)
घराबाहेर कपडे धुवत बसलेल्या संगीता शिवाजी वर्पे (वय ४३) (Sangeeta Shivaji Varpe) या महिलेवर बिबट्याने अचानक हल्ला केला. यावेळी बिबट्याने या महिलेला तीस ते चाळीस फुट शेतात ओढत नेले.या हल्ल्यात त्या जागीच ठार झाल्या. भर सकाळी घडलेल्या या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली. ही घटना संगमनेर तालुक्यातील निमगाव टेंभी गावात घडली. (Leopard Attack Maharashtra)
निमगाव टेंभी गावातील वर्पे वस्ती येथे संगीता शिवाजी वर्पे (वय ४३) या महिलेवर बिबट्याने हल्ला केला. बिबट्या संगीता वर्पे यांना शेतात ओढत घेऊन चाललाय हे त्यांचा दीर प्रविण वर्पे यांनी पाहिले.संगीता वर्पे यांना बिबट्याच्या तावडीतून वाचवण्यासाठी प्रविण वर्पे यांनी ट्रॅक्टर शेतात नेला परंतू बिबट्याने त्यांना सोडले नाही, पुढे काही अंतरावर गेल्यावर बिबट्याने संगीता वर्पे यांना सोडले. गंभीर जखमी अवस्थेतील वर्पे यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले.परंतू त्यांचा मृत्यू झाला होता. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. (Leopard Attack Maharashtra)
Leopard Attack Maharashtra : वनविभागाने नरभक्षक बिबट्याचा बंदोबस्त करावा
हा घटनेनंतर परिसरात घाबरत पसरली असून ग्रामस्थ संतप्त झाले आहेत. वन विभाग जे बिबटे पन्नास किलोमीटरच्या अंतरावर सोडत आहेत, हे जवळपास 250 किलोमीटरच्या अंतरावर सोडावेत. जेणेकरून ते परत येणार नाहीत. पंचक्रोशी निमगाव टेंभी, देवगाव, शिरपूर, जाकुरी या ठिकाणी कुणालाही हा बिबट्यांचा त्रास होऊ नये. परंतु जवळच्या परिसरात बिबटे सोडले जात असल्याने सर्व सामान्य शेतकऱ्याला शेती करणे सुद्धा मुश्किल झालंय. हा बिबट्या नरभक्षक झाला आहे. वनविभागाने नरभक्षक बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. (Leopard Attack Maharashtra)