Madhukar Ralebhat : प्रा मधुकर राळेभात यांचा रोहित पवारांवर सर्वात मोठा हल्लाबोल, लफंगा, कोंबडा सह आदी विशेषणं वापरून राळेभात यांनी केली रोहित पवारांची जोरदार धुलाई !

जामखेड टाइम्स वृत्तसेवा : सत्तार शेख । राष्ट्रवादीचे विधानसभा प्रमुख प्रा मधुकर (आबा) राळेभात (Madhukar Ralebhat) यांनी भाजपात (BJP) प्रवेश करत मागील आठवड्यात राजकीय खळबळ उडवून दिली. भाजपा प्रवेशानंतर ते रोहित पवारांवर (Rohit Pawar) कोणता हल्ला करणार याची मतदारसंघाला उत्सुकता होती. आमदार प्रा.राम शिंदे (Ram Shinde) यांच्या जनसंवाद पदयात्रेची सांगता सभा प्रा मधुकर (आबा) राळेभात यांच्या आक्रमक आणि खुमासदार भाषणाने गाजली. राळेभात यांच्या हल्ल्याने रोहित पवार समर्थकांच्या बत्या गुल झाल्याची चर्चा मतदारसंघात जोरदारपणे रंगली आहे.

Madhukar Ralebhat biggest attack on Rohit Pawar, karjat jamkhed latest news today, Rohit Pawar was strongly washed by Ralebhat by using adjectives such as Lafanga, Kombda and others,

राज्याच्या राजकारणात सर्वाधिक चर्चेचा मतदारसंघ बनलेल्या कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघात निवडणुकीचा बिगुल वाजण्यापुर्वी राजकीय फटाके जोरदारपणे फुटू लागले आहेत. आमदार शिंदे व पवार ऐकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडताना दिसत नाहीत. आमदार शिंदे यांच्या जनसंवाद पदयात्रेला मतदारसंघात तुफान प्रतिसाद मिळत आहे. देशाचे नेते शरद पवार (Sharad Pawar) यांनी एकाच दिवशी मतदारसंघात अनेक कार्यक्रमांना हजेरी लावली. राजकीय भाष्य केले पण त्यातून जनतेचे समाधान झाले नाही. निवडणूकीआधीच शरद पवारांना मतदारसंघात यावे लागले याचा अर्थ कर्जत-जामखेडची राजकीय हवा रोहित पवारांविरोधात गेल्याचे स्पष्ट झाले आहे, अशी राज्याच्या राजकारणात चर्चा आहे. (Madhukar Ralebhat)

Madhukar Ralebhat : प्रा मधुकर राळेभात यांचा रोहित पवारांवर सर्वात मोठा हल्लाबोल

जेष्ठ नेते प्रा मधुकर (आबा) राळेभात यांनी सहा दिवसांपुर्वी मुंबईत भाजपात प्रवेश केला. भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर प्रा राळेभात हे काय बोलणार ? याकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. शनिवारी सायंकाळी प्रा मधुकर राळेभात यांनी राजकीय दृष्ट्या जागरूक असलेल्या जवळा या गावात पार पडलेल्या जनसंवाद पदयात्रा जामखेड तालुका सांगता सभेत रोहित पवारांवर तुफान हल्ला चढवत प्रचंड धुलाई केली. राळेभात (Madhukar Ralebhat) यांच्या आक्रमक व खुमासदार भाषणाने जवळेकरांची मने जिंकली. यावेळी प्रा राळेभात काय म्हणालेत पाहूयात

रोहित पवारांनी गेल्या पाच वर्षांत जनतेची फसवणूक केली

रोहित पवारांना  जामखेड तालुक्यात कुकडीचे पाणी आणता आले नाही. मागच्या पाच वर्षांत त्यांनी कुकडीच्या पाण्याचं व उद्योग व्यवसायाचं नाव घेतलं नाही, एकाही तरूणाला नोकरी लावता आली नाही. नुसती स्टंटबाजी, भूलवाभूलवी केली. रोहित पवार एमआयडीसीचे दोन नकाशे घेऊन मतदारसंघात फिरायचे, पण त्यांना एमआयडीसी मंजुर करता आली नाही, परंतू भूमिपुत्र आमदार प्रा.राम शिंदे यांनी एमआयडीसी मंजुर करूनच आणली. आपला तो आपलाच असतो हे त्यांनी दाखवून दिले. रोहित पवारांनी गेल्या पाच वर्षांत जनतेची फसवणूक केली आहे, असा हल्लाबोल भाजपचे जेष्ठ नेते प्रा मधुकर (आबा) राळेभात (Madhukar Ralebhat) यांनी केला.

अरे पठ्ठ्या आधी निवडून तर ये, डिपॉझिट वाचवून तर दाखव

पुढे बोलताना प्रा मधुकर राळेभात म्हणाले की, कर्जत एमआयडीसीवरून रोहित पवारांनी जनतेची फसवणूक केली. काही वेळा ते म्हणायचे एमआयडीसीच्या फाईलवर सही राहिलीय सही राहिलीय, पण नंतर त्यांनी सुरु केलं, तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने पुढच्या वेळेस माझीच सही त्या फाईलवर असेल, म्हणजे हा पठ्ठ्या आता उद्योग मंत्री व्हायला निघालाय, खर्ड्याच्या कार्यक्रमाच्या वेळी अनेक ठिकाणी बॅनर लागले होते, भावी उद्योगमंत्री, शिक्षणमंत्री, गृहमंत्री, मुख्यमंत्री, अरे पठ्ठ्या आधी निवडून तर ये, मग बघु काय व्हायचं ते, डिपॉझिट वाचवून तर दाखव, असे म्हणत राळेभात यांनी रोहित पवारांचा जोरदार समाचार घेतला. (Madhukar Ralebhat)

कर्जत-जामखेडमध्ये भूमिपुत्र विरूध्द लफंगा असा सामना

ज्या अजितदादांनी रोहित पवारांना मोठं केलं त्यांच्याप्रति त्यांची भावना द्वेषाची आहे. माझ्या सारख्या जेष्ठ माणसाला तो चंगुमंगु म्हणतो, मग तुम्ही आम्ही कोण ? असा सवाल करत रोहित पवार हा लफंगा असून यंदा कर्जत-जामखेडमध्ये भूमिपुत्र विरूध्द लफंगा असा सामना होणार आहे. या लंफग्याला आता बारामतीला पाठवण्यासाठी जनतेने सज्ज व्हावे असे अवाहन यावेळी प्रा मधुकर राळेभात यांनी केले. (Madhukar Ralebhat)

भिडायचंच आहे ना ? तर मग बारामतीत जा आणि चुलत्याशी भिडून दाखव

परवा कुसडगावला भाषण केलं मी कुणाला बी भिडतो, आज तो काय म्हणतोय राम शिंदेंकडे गुंडांच्या टोळ्या आहेत, ह्यांच्याकडं गुंडचं वाढलेतं,  कुणाला बी भिडतो तर मग असा हि××××× का बोलतो, बोल ना मर्दासारखा, भिडायचंच आहे ना ? तर मग बारामतीत जा आणि चुलत्याशी भिडून दाखव, असे अव्हान यावेळी राळेभात यांनी रोहित पवारांना दिले. (Madhukar Ralebhat)

रोहित पवारांचा विकास म्हणजे चॉकलेट, पॅड, सीएसआरमधून सायकली वाटणं, मोकळ्या कंपासी देणं

गेल्या पाच दिवसांपासून मी जनसंवाद पदयात्रेनिमित्त जामखेड तालुक्यातील ८५ गावांत गेलो. दोन्ही आमदारांनी केलेली कामं मी लोकांना विचारली. आमदार राम शिंदेंपेक्षा रोहित पवारांनी मोठ्या प्रमाणात निधी दिला असं एकही गाव मला या दौऱ्यात भेटलं नाही. उलट अनेक गावांत रोहित पवारांचा निधीच पोहचला नसल्याचे निदर्शनास आले. आमदार शिंदे यांनी पाणलोट, रस्ते विकास, सह आदी प्रचंड कामे केली. रोहित पवारांचा विकास म्हणजे चॉकलेट, पॅड, सीएसआरमधून सायकली वाटणं, मोकळ्या कंपासी देणं हाच होय, याचीच जाहिरातबाजी करून ते खूप काही केल्याचा दावा करतात, जनतेची दिशाभूल करतात, अशी जोरदार टीका यावेळी राळेभात यांनी रोहित पवारांवर केली. (Madhukar Ralebhat)

माझं चुकलं रं बबा

रोहित पवार हा लफंगा आहे, हा लफंगा तिकडून येऊन आपल्याला मतं मागत फिरतोय, पण आता आपल्याला भूमिपुत्राला साथ द्यायची आहे. हा आणलेला कोंबडा सगळ्यांना मतं मागतोय, काहीही सांगतोय, पण त्याला आता घरचा रस्ता दाखवायचाय, यंदाची लढाई भूमिपुत्र विरूध्द लफंगा अशी आहे, लफंग्याची जात खूप अवघड असते, ही जात मीच आणली इकडं, माझं चुकलं रं बबा असे म्हणत प्रा राळेभात यांनी जनतेची माफी मागितली. (Madhukar Ralebhat)

एकजुटीने भूमिपुत्राच्या पाठीशी उभे रहा

मागच्या वेळी रोहित पवारांच्या भूलवा भूलवीला आपण सर्वजण बळी पडलो, पण यंदा नाही, झालेली चुक दुरूस्त करायची आहे. तो म्हणतो मी मंत्री होणार आहे, पण मी म्हणतो तु तुझं डिपॉझिट वाचवून दाखवं पठ्ठ्या आता, तुझं डिपार्टमेंट वाचलं तर तुझी पाठ थापटूत आणि तुझा सत्कार करून तुला हाकलून लावून तुला, असे अव्हान देत आपल्या मतदारसंघावर जे परदेशी आक्रमण झाले आहे ते आता परतवून लावायचे आहे. त्यासाठी सर्वांनी एकजुटीने भूमिपुत्राच्या पाठीशी आपला आशिर्वाद द्यावा असे अवाहन यावेळी प्रा राळेभात यांनी केले. (Madhukar Ralebhat)