Maharashtra Cabinet portfolio Allocation 2024 : पहिल्यांदाच मंत्री झालेल्या नेत्यांना वजनदार खात्यांची लाॅटरी, तर दिग्गज नेत्यांना मोठा झटका
Mahayuti Sarkar Khate Vatap 2024 : देवेंद्र फडणवीस (devendra fadnvis cm) यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारच्या मंत्रिमंडळातील ३३ कॅबिनेट व ६ राज्यमंत्र्यांना खातेवाटप (Maharashtra Cabinet portfolio Allocation 2024) जाहीर करण्यात आले. नागपुर हिवाळी अधिवेशनाच्या (winter Session 2024) शेवटच्या दिवशी खातेवाटपास राज्यपालांनी मंजुरी दिली.पहिल्यांदाच मंत्री झालेल्या नेत्यांना खातेवाटपात मोठी लाॅटरी लागली आहे. तर अनेक दिग्गज नेत्यांना मोठा फटका बसला आहे. नवख्या मंत्र्यांना मोठे बजेट असलेले वजनदार खाते मिळाल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. (Maharashtra Manti Mandal list 2024)
महाराष्ट्र सरकारच्या मंत्रिमंडळाचे खातेवाटप शनिवारी जाहीर झाले. सातत्याने वजनदार खाते सांभाळणाऱ्या मंत्र्यांना या खातेवाटपात तगडा झटका बसला आहे. त्यांच्याकडील वजनदार खाते नवख्या मंत्र्यांना सोपवण्यात आले आहे. यामुळे पहिल्यांदाच मंत्री बनलेल्या जयकुमार गोरे, माणिकराव कोकाटे, शिवेंद्रसिंह भोसले, अकाश फुंडकर, नितेश राणे, माधुरी मिसाळ, पंकज भोयर, योगेश कदम, नरहरी झिरवाळ, मेघना बोर्डीकर सह आदींची चांगलीच लाॅटरी लागली आहे.मंत्रिमंडळ खातेवाटप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वरचष्मा असल्याचेच दिसून आले आहे.फडणवीस यांच्या मर्जीतील नवख्या मंत्र्यांकडे वजनदार खाती सोपवण्यात आली आहेत.
शिंदे सरकारमध्ये महसुल मंत्री राहिलेल्या राधाकृष्ण विखे-पाटील यांच्याकडील महसूल खाते भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना देण्यात आले आहे.फडणवीस सरकारमध्ये राधाकृष्ण विखे-पाटील यांच्याकडे जलसंपदा (गोदावरी व कृष्णा खोरे) खात्याची जबाबदारी देण्यात आली आहे.मागील सरकारमध्ये सार्वजनिक बांधकाम खाते रविंद्र चव्हाण यांच्याकडे होते. चव्हाण यांचा मंत्रिमंडळात समावेश झाला नाही. त्यांचे हे खाते शिवेंद्रराजे भोसले यांच्याकडे देण्यात आले आहे.गिरीश महाजन यांच्याकडील ग्रामविकास खाते पहिल्यांदाच मंत्री बनलेल्या जयकुमार गोरे यांना देण्यात आले. गिरीश महाजन व विखे-पाटील यांना जलसंपदा खाते विभागून देण्यात आले आहे.
अजित पवार गटाचे आमदार दत्तात्रय भरणे यांना क्रीडा आणि अल्पसंख्याक विभाग देण्यात आला आहे. शिंदे गटाचे भरत गोगावले यांना रोजगार हमी, प्रताप सरनाईक यांना वाहतूक आणि संजय शिरसाट यांना सामाजिक न्याय ही खाती दिली आहेत. मागील सरकारमध्ये शंभूराज देसाई यांच्याकडे उत्पादन शुल्क विभाग होता. या विभागाद्वारे राज्य सरकारला मोठ्या प्रमाणात महसूल मिळतो. आता या खात्याचा कारभार अजित पवार यांना मिळाला आहे.
मंत्रिमंडळात प्रथमच समावेश झालेल्या शिवेंद्रनराजे भोसले यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम, जयकुमार गोरे (ग्रामविकास), माणिकराव कोकाटे (कृषी), बाबासाहेब पाटील (सहकार), मकरंद पाटील (मदत पुनर्वसन) अशी महत्त्वाची खाती सोपवून नवीन चेहऱ्यांना संधी दिली आहे.
भाजपचे ज्येष्ठ नेते गणेश नाईक मागील मंत्रिमंडळात नव्हते.आता मात्र त्यांना वनखात्याची जबाबदारी मिळाली आहे. सुधीर मुनगंटीवार यांचा पत्ता कट करून हे खातं अनुभवी नेत्याच्या हाती देण्यात आलं आहे. भाजपचे आमदार नितेश राणे यांना याआधी मंत्रिपदाचा अनुभव नव्हता. परंतु पक्षाने यंदा त्यांना थेट कॅबिनेट मंत्रिपदाची संधी दिली. नितेश राणे यांना मत्स्य आणि बंदरे विभागाची जबाबदारी देण्यात आली आहे.
अशोक उईके यांना आदिवासी विकास खाते मिळाले आहे. तर अजित पवार गटाचे माणिकराव कोकाटे यांना कृषी खात्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. याआधी हे खातं धनंजय मुंडे यांच्याकडे होतं. भारतीय जनता पार्टीचे आमदार आशिष शेलार यांना मात्र माहिती आणि तंत्रज्ञान या खात्याचे मंत्री करण्यात आलं आहे. आशिष शेलार यांना मोठं खातं मिळेल असे अपेक्षित होते मात्र त्यांना कमी महत्वाचं खातं देण्यात आल्याचं आता स्पष्ट झालं आहे.
मागील सरकारमध्ये मंत्री राहिलेल्या धनंजय मुंडे यांच्याकडील कृषि खाते माणिकराव कोकाटे यांना देण्यात आले आहे. तर मुंडे यांना छगन भुजबळ यांच्याकडील अन्न व नागरी पुरवठा तसेच ग्राहक संरक्षण खाते देण्यात आले आहे.पहिल्यांदा मंत्री बनलेल्या माणिकराव कोकटे यांना कृषिमंत्री पदाची लाॅटरी लागली आहे.
भाजपा आमदार आकाश फुंडकर हे पहिल्यांदाच मंत्री बनले आहेत. त्यांच्याकडे कामगार मंत्रालय सोपवण्यात आले आहे. तर प्रताप सरनाईक यांना परिवहन मंत्री करण्यात आले आहे. भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांना मोठे खाते मिळेल अशी चर्चा होती परंतू त्यांना पर्यावरण व पशुसंवर्धन खाते देण्यात आले आहे.
पहिल्यांदा मंत्री बनलेल्या पंकज भोयर यांना गृह ग्रामीण राज्यमंत्री तसेच गृहनिर्माण महत्त्वाचे खाते दिली आहेत.योगेश कदम यांना शहर गृहराज्यमंत्री महसूल ग्रामविकास राज्यमंत्री अशी महत्त्वाची खाते दिली आहेत. तसेच राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांना नगरविकास परिवहन वैद्यकीय शिक्षण सामाजिक न्याय अशी महत्त्वाची खाती देण्यात आली आहेत.
देवेंद्र फडणवीस यांनी गृह, ऊर्जा, न्याय व विधी, सामान्य प्रशासन, माहिती व प्रसारण व खातेवाटप न झालेल सर्वच खाते स्वत:कडे ठेवले आहेत. तर नगरविकास मंत्रालय एकनाथ शिंदे यांच्याकडे आहे. अर्थमंत्रालय आणि राज्य उत्पादन शुल्क ही खाती अजित पवार यांच्याकडेच राहिलं आहे.
महाराष्ट्र सरकार कॅबिनेट मंत्री यादी 2024 (Maharashtra cabinet minister list 2024)
- चंद्रशेखर बावनकुळे – महसूल
- राधाकृष्ण विखे पाटील – जलसंपदा ( गोदावरी व कृष्णा खोरे विकास)
- हसन मुश्रीफ – वैद्यकीय शिक्षण
- चंद्रकांत पाटील – उच्च व तंत्रशिक्षण, संसदीय कामकाजमंत्री
- गिरीश महाजन – आपत्ती व्यवस्थापन (विदर्भ, तापी, कोकण विकास), आपत्ती व्यवस्थापन
- गुलाबराव पाटील – पाणीपुरवठा
- गणेश नाईक – वन
- दादाजी भुसे – शालेय शिक्षण
- संजय राठोड – माती व पाणी परीक्षण
- धनंजय मुंडे – अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण
- मंगलप्रभात लोढा – कौशल्य विकास, रोजगार, उद्योग व संशोधन
- उदय सामंत – उद्योग व मराठी भाषा
- जयकुमार रावल – विपणन, प्रोटोकॉल
- पंकजा मुंडे – पर्यावरण व वातावरण बदल, पशुसंवर्धन
- अतुल सावे – ओबीसी विकास, दुग्धविकास मंत्रालय, ऊर्जा नुतनीकर
- अशोक उईके – आदिवासी विकास मंत्रालय
- शंभूराज देसाई – पर्यटन, खाण व स्वातंत्र्य सैनिक कल्याण मंत्रालय
- आशिष शेलार – माहिती व तंत्रज्ञान
- दत्तात्रय भरणे – क्रीडा व अल्पसंख्याक विकास व औकाफ मंत्रालय
- अदिती तटकरे – महिला व बालविकास
- शिवेंद्रराजे भोसले – सार्वजनिक बांधकाम
- माणिकराव कोकाटे – कृषी
- जयकुमार गोरे – ग्रामविकास, पंचायत राज
- नरहरी झिरवाळ – अन्न व औषध प्रशासन
- संजय सावकारे – कापड
- संजय शिरसाट – सामाजिक न्याय
- प्रताप सरनाईक – वाहतूक
- भरत गोगावले – रोजगार हमी,फलोत्पादन
- मकरंद पाटील – मदत व पुनर्वसन
- नितेश राणे – मत्स्य आणि बंदरे
- आकाश फुंडकर – कामगार
- बाबासाहेब पाटील – सहकार
- प्रकाश आबिटकर – सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण
महाराष्ट्र सरकार राज्यमंत्री यादी (State Ministers)
- माधुरी मिसाळ – सामाजिक न्याय, अल्पसंख्याक विकास व औकाफ मंत्रालय, वैद्यकीय शिक्षण
- आशिष जयस्वाल – अर्थ आणि नियोजन, विधी व न्याय
- मेघना बोर्डीकर – सार्वजनिक आरोग्य, कुटुंब कल्याण, पाणी पुरवठा
- इंद्रनील नाईक – उच्च आणि तंत्र शिक्षण , आदिवासी विकास आणि पर्यटन
- योगेश कदम – गृहराज्य शहर
- पंकज भोयर – गृहनिर्माण,