जामखेड टाईम्स वृत्तसेवा । 9 जानेवारी । Maharashtra Corona Update | राज्यात पुन्हा कोरोनाचा मोठा उद्रेक झाला आहे. रविवारी दिवसभरात 44 हजार 388 नवे कोरोना रुग्ण राज्यात आढळून आले आहेत. तर 15 हजार 351 रुग्ण पूर्णपणे बरे झाले आहेत. दरम्यान, कोरोनाचा नवा प्रकार असलेल्या ओमिक्रॉनची लागण झालेले दोनशेहून अधिक रुग्ण आज आढळून आले आहेत.
राज्यात सर्वाधिक कोरोना रूग्ण असलेल्या मुंबईत आज कोरोना रुग्णांच्या संख्येत हलकी घट झाली असली तर राज्यातील रुग्णसंख्या मात्र 45 हजाराच्या घरात पोहोचली आहे. त्यामुळे राज्यात कोरोनाचा कहर (Corona Outbreak) सुरुच असल्याचं पाहायला मिळत आहे.
आरोग्य विभागानं (Health Department) दिलेल्या माहितीनुसार राज्यात आज 44 हजार 388 नवे कोरोना रुग्ण (Corona Patients) आढळून आले आहेत. तर 15 हजदार 351 रुग्ण पूर्णपणे बरे झाले आहेत. दरम्यान, कोरोनाचा नवा प्रकार असलेल्या ओमिक्रॉनची लागण झालेले दोनशेहून अधिक रुग्ण आज आढळून आले आहेत.
आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार राज्यात आज 44 हजार 388 नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. तर 15 हजार 351 रुग्ण पूर्णपणे बरे झाले आहेत. राज्यात आज 12 कोरोना रुग्णांचा मृत्यू झालाय. त्यामुळे राज्यातील मृत्यू दर 2.4 टक्क्यांवर पोहोचलाय. तर राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 94.98 टक्के इतकं आहे.
सध्या राज्यात 10 लाख 76 हजार 996 लोक होम क्वारंटाईन आहेत. तर 2 हजार 614 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज रोजी 2 लाख 2 हजार 259 सक्रिय रुग्ण आहेत.
राज्यात आज 207 ओमिक्रॉन संसर्ग असणारे रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी 155 रुग्णांचा अहवाल बी जे वैद्यकीय महाविद्यालय, तर 52 रुग्णांचा अहवाल राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेनं दिलाय. महत्वाची बाब म्हणजे राज्यात आज सर्वाधिक ओमिक्रॉनबाधित रुग्ण हे सांगली जिल्ह्यात आढळून आले आहेत.
राज्यात रविवार आढळून आलेल्या नव्या ओमिक्रॉन बद्दल सांगली – 57, मुंबई – 40, पुणे मनपा – 22, नागपूर – 21, पिंपरी चिंचवड – 15, ठाणे मनपा – 12, कोल्हापूर – 8, अमरावती – 6, उस्मानाबाद – 5, बुलडाणा – 4, अकोला – 4, गोंदिया – 3, नंदुरबार – 2, सातारा – 2, गडचिरोली – 2, औरंगाबाद – 1, जालना – 1, लातूर – 1, मीरा भाईंदर – 1