Maharashtra Forest Service Examination Results Announced | महाराष्ट्र वन सेवा मुख्य परीक्षेचा निकाल जाहिर ; अहमदनगरचा वैभव दिघे राज्यात प्रथम
जामखेड टाईम्स वृत्तसेवा : Maharashtra Forest Service Examination Results Announced | मंगळवारी राज्य सेवा मुख्य परीक्षेचा निकाल जाहीर केल्यानंतर लोकसेवा आयोगाने बुधवारी महाराष्ट्र वन सेवा मुख्य परीक्षेचा निकाल जाहिर केला आहे. या परीक्षेत अहमदनगर जिह्यातील वैभव दिघे हा राज्यातून पहिला आला आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (MPSC) महसूल आणि वन विभागातील सहायक वन संरक्षक, गट अ (Assistant Conservative of Forest) तसेच वनक्षेत्रपाल गट ब (Range Forest Officer) या संवर्गातील एकूण 100 पदांच्या भरतीसाठी 15 सप्टेंबर 2019 रोजी महाराष्ट्र वन सेवा मुख्य परीक्षा 2019 घेण्यात आली होती.
महाराष्ट्र वन सेवा मुख्य परीक्षा 2019 चा अंतिम निकाल बुधवारी जाहीर झाला आहे. या परीक्षेत अहमदनगर जिह्यातील वैभव दिघे हा राज्यातून तसेच मागासवर्गीयातून प्रथम क्रमांक मिळवला आहे. पुणे जिल्ह्यातील पुजा भाऊसाहेब पानसरे ही मुलींमधून राज्यात प्रथम आली आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात आलेल्या एकूण 100 पदांपैकी 29 पदं ही सहायक वन संरक्षक, गट अ या प्रकारातील असून 63 पदं ही वनक्षेत्रपाल गट या प्रकारातील आहेत. उर्वरित पदांचा निकाल राखून ठेवण्यात आला आहे. राज्यसेवा परीक्षेप्रमाणेच महाराष्ट्र वनसेवा परीक्षा ही महत्वाची मानली जाते.
वनक्षेत्रपाल पदाकरीता खेळाडूंसाठी आरक्षित 4 पदं आणि अन्य 3 पदांचा निकाल प्रशासकीय कारणास्तव तसेच अन्य एका विद्यार्थ्याच्या निकाल उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार राखून ठेवण्यात आला आहे.
web titel : Maharashtra Forest Service Examination Results Announced Vaibhav Dighe first from state