जामखेड टाईम्स वृत्तसेवा । Maharashtra HSC Result 2022 । बारावीचा निकाल पुढच्या आठवड्यात जाहीर होणार असे वक्तव्य शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी केले होते, मात्र आता बारावीचा निकाल उद्या जाहीर होणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे उद्या ८ जुन रोजी दुपारी एक वाजता बारावीचा निकाल जाहीर होणार आहे. (Maharashtra HSC Result 2022, Big News, HSC result will be announced tomorrow 8 june)
बारावीचा निकाल कधी जाहीर होणार ? याची उत्सुकता राज्यातील लाखो विद्यार्थ्यांना लागून राहिली होती, निकाल कधी जाहीर होणार याबाबत अनेकदा वेगळ्या तारखा आणि दावे-प्रतिदावे केले जात होते, अखेर आठ जून रोजी बारावीचा निकाल जाहीर होणार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. यामुळे आता राज्यातील लाखो विद्यार्थ्यांना निकालाची उत्सुकता आहे. हा निकाल उद्या दुपारी एक वाजल्यापासून बोर्डाच्या वेबसाईटवर विद्यार्थ्यांना ऑनलाईन पाहता येणार आहे.
बारावीचे निकाल जाहीर करताना यंदा दहावी, अकरावी आणि बारावी या तिन्ही वर्गाचे गुण ग्राह्य धरले जाणार आहेत. त्यासाठी ३०:३०:४० असा निकष राज्य मंडळाने जाहीर केला आहे. यामध्ये इयत्ता दहावीच्या परीक्षेतील सर्वाधिक गुण मिळालेल्या तीन विषयांचे सरासरी गुण (३०%), अकरावीच्या वार्षिक मूल्यमापनातील विषयनिहाय गुण (३०%) आणि इयत्ता बारावीच्या अंतर्गत मूल्यमापनातील प्रथम सत्र परीक्षा, सराव परीक्षा, सराव चाचण्या, तत्सम मूल्यमापन गुण (४० %) अशा प्रकारचे गुण एकत्र करून बारावीचे निकाल जाहीर केले जाणार आहे.
असा चेक करा निकाल
1) विद्यार्थ्यांनी प्रथम महाराष्ट्र मंडळाच्या अधिकृत वेबसाइट www.mahahsscboard.in भेट द्यावी
2) त्यानंतर होम पेजवर दिलेल्या “इयत्ता 12वी निकाल 2022” या लिंकवर क्लिक करा
3) आता तुमच्यासमोर एक नवीन पेज ओपन होईल, इथे तुम्ही तुमचा रजिस्ट्रेशन नंबर आणि जन्मतारीख टाकून सबमिट करा
4) तुमचा 12वी निकाल तुमच्या स्क्रीनवर दिसेल
तुमच्या निकालाची प्रत प्रिंट काढून तुमच्याकडेच ठेवा.
या वेबसाईटवर पाहा निकाल