Maharashtra IAS Officer Transfer : जामखेडचे सुपुत्र डाॅ सुधाकर शिंदे यांच्या खांद्यावर सरकारने सोपवली महत्वाची जबाबदारी, राज्यातील 20 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या !
जामखेड टाइम्स वृत्तसेवा : Maharashtra IAS Officer Transfer : राज्यातील 20 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश सरकारकडून नुकतेच जारी करण्यात आले आहेत. बदली झालेल्या अधिकाऱ्यांमध्ये जामखेड तालुक्यातील चोंडी गावचे सुपुत्र डाॅ सुधाकर शिंदे (IRS Dr. Sudhakar Shinde) यांच्यासह तुकाराम मुंढे (IAS Tukaram Mundhe) यांचा समावेश आहे.डाॅ सुधारक शिंदे यांच्याकडे सरकारने महत्वाची जबाबदारी सोपवली आहे. (Transfers of 20 IAS officers in the state)
जामखेड तालुक्यातील चोंडी गावचे सुपुत्र असलेले वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी डॉ. सुधाकर शिंदे यांनी कोरोना महामारी काळात महात्मा फुले जन आरोग्य अभियानाचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून केलेल्या दमदार कामगिरीची राज्यात मोठी चर्चा झाली होती.शिंदे यांच्या कार्यतत्परतेमुळे राज्यातील लाखो रूग्णांना मोठी मदत झाली होती. शिंदे यांनी दिर्घकाळ महात्मा फुले जन आरोग्य अभियानाचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून जबाबदारी पार पाडली. राज्यात सत्तांतर झाल्यानंतर ते नियुक्तीच्या प्रतिक्षेत होते. अखेर राज्य सरकारने त्यांच्या खांद्यावर मुंबई महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदाची जबाबदारी सोपवली आहे. तसा आदेश सरकार जारी केला आहे.
कोविड काळात महात्मा फुले जन आरोग्य अभियानाचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून डाॅ सुधाकर शिंदे यांनी मास्कच्या दर नियंत्रणाबाबत घेतलेला निर्णय महत्त्वपूर्ण ठरला. तसेच खाजगी प्रयोगशाळांमध्ये आरटीपीसीआरचे दर निश्चित करण्याचा निर्णयही त्यांनी घेतला होता.ऑक्टोबर २०२० मध्ये त्यांची मंत्रालयात उपसचिव पदी बदली करण्यात आली होती. मात्र ही बदली लगोलग रद्द करण्यात आली आणि जन आरोग्य अभियानाचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून त्यांची जबाबदारी कायम ठेवण्यात आली. राज्यात सत्ता बदल होऊन शिंदे फडणवीस सरकार आल्यानंतर सुधाकर शिंदे यांच्या जागी दुसऱ्या अधिकाऱ्याची नियुक्ती महात्मा फुले जन आरोग्य अभियानात करण्यात आली.
गेले काही महिन्यांपासून सुधाकर शिंदे नव्या नियुक्तीच्या प्रतीक्षेत होते. आरोग्य क्षेत्रातील त्यांचा अनुभव पाहता महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त म्हणून आरोग्य विभागाची विशेष जबाबदारी त्यांच्याकडे दिली जाण्याची शक्यता आहे.
पुण्याच्या बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयातून वैद्यकीय पदवी मिळाल्यानंतर डॉक्टर सुधाकर शिंदे यांची यूपीएससी मार्फत इंडियन रेवेन्यू सर्विसेस मध्ये निवड झाली होती. रेवेन्यू सर्विसेस मध्ये त्यांनी काही काळ काम केल्यानंतर ते प्रशासकीय अधिकारी म्हणून महाराष्ट्र शासनाच्या सेवेत रुजू झाले.
पनवेल महापालिकेचे आयुक्त म्हणून त्यांनी काम पाहिले. त्यानंतर त्यांच्याकडे महात्मा फुले जन आरोग्य अभियानाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदाची जबाबदारी देण्यात आली.आता त्यांच्याकडे महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त पद हे प्रशासकीय वर्तुळात अत्यंत प्रतिष्ठेचे पद मानले जाते.
राज्य सरकारने खालील 20 वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या केल्या बदल्या
सुजाता सौनिक, IAS (1987) ACS (AR&OM), GAD, मंत्रालय, मुंबई यांची अतिरिक्त मुख्य सचिव (गृह), गृह विभाग, मंत्रालय, मुंबई म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.
एमएमआरडीएचे आयुक्त असलेले एस. व्ही.आर. श्रीनिवास IAS (1991) यांच्याकडे धारावी पुनर्वसन प्रकल्पाचे विशेष अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
बेस्ट उपक्रमाचे महाव्यवस्थापक असलेले 1991 च्या बॅचचे आयएएस अधिकारी लोकेश चंद्र यांची महावितरणच्या मुख्य व्यवस्थापकीय अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
1995 च्या बॅचच्या आयएएस अधिकारी राधिका रस्तोगी यांची नियोजन विभागात नियुक्ती करण्यात आली.
आय.ए.कुंदन यांची अल्पसंख्याक विकास विभागात नियुक्ती करण्यात आली आहे.
संजीव जयस्वाल, IAS (1996) PS, पाणी पुरवठा आणि स्वच्छता विभाग, मंत्रालय यांची म्हाडाचे उपाध्यक्ष आणि CEO म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
आशीष शर्मा, IAS (1997) AMC, BMC, मुंबई यांना PS(2), नगर विकास विभाग, मंत्रालय, मुंबई म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.
महावितरणचे मुख्य व्यवस्थापकीय संचलक विजय सिंघल यांची बेस्ट उपक्रमाचे महाव्यवस्थापक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
अंशु सिन्हा, IAS (1999) CEO, M.S.खादी ग्रामोद्योग मंडळ, मुंबई यांची सचिव OBC बहुजन कल्याण विभाग, मंत्रालय, मुंबई म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
अनुप कृ. यादव, IAS (2002) सचिव, अल्पसंख्याक विभाग. विभाग यांची सचिव, महिला आणि बालकल्याण विभाग, मंत्रालय, मुंबई म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
तुकाराम मुंढे, IAS (2005) यांची मराठी भाषा विभाग, मंत्रालय, मुंबई सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
डॉ. अमित सैनी, IAS (2007) CEO, MMB, मुंबई यांची मिशन डायरेक्टर, जल जीवन मिशन, मुंबई म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
चंद्रकांत पुलकुंडवार, आयएएस (2008) आयुक्त नाशिक महापालिका यांची साखर आयुक्त, पुणे म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
डॉ. माणिक गुरसाल, IAS (2009), अतिरिक्त विकास आयुक्त (उद्योग) यांची मेरिटाईम बोर्डचे सीईओ म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
कादंबरी बलकवडे, IAS (2010) आयुक्त कोल्हापूर महापालिका यांची DG, MEDA, पुणे म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
प्रदिपकुमार डांगे, IAS (2011) Jt.Secy.-c-Mission Director, SBM (ग्रामीण), पाणी पुरवठा आणि स्वच्छता विभाग. मंत्रालय, मुंबई यांना संचालक, रेशीम, नागपूर या पदावर नियुक्त केले आहे.
शंतनू गोयल, IAS (2012) आयुक्त, MGNREGS, नागपूर यांची सिडको, नवी मुंबई सह व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
पृथ्वीराज बी.पी., IAS (2014) जिल्हाधिकारी, लातूर यांची संचालक, माहिती तंत्रज्ञान, मुंबई म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
डॉ. हेमंत वसेकर, IAS (2015) CEO, NRLM, मुंबई यांची आयुक्त, पशुसंवर्धन, पुणे म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
डॉ. सुधाकर शिंदे, IRS (1997) यांची मुंबई महापालिकेत अतिरिक्त महापालिका आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.