Maharashtra IAS Transfer : महाराष्ट्र सरकारने राज्यातील 12 सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्यांना मंजुरी दिली आहे. राज्यातील 12 IAS अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश शासनाने जारी केले आहेत. बदल्या झालेल्या अधिकाऱ्यांमध्ये कौस्तुभ दिवेगावकर, मिलिंद शंभरकर, विजय सिंघल, संजय सेठी, ओ.पी गुप्ता, राजेश कुमार, संजय सेठी सह आदी अधिकाऱ्यांचा समावेश आहे.
आगामी लोकसभा निवडणूकीच्या तोंडावर महाराष्ट्रात प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे सत्र सुरु झाले आहे. महाराष्ट्र सरकारने 12 IAS अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी केल आहेत. बदल्या झालेल्या अधिकाऱ्यांची नावे व नियुक्तीचे ठिकाण खालील प्रमाणे
IAS Kaustubh Divegaonkar : स्मार्टचे प्रकल्प संचालक पुणे असलेल्या कौस्तुभ दिवेगावकर यांची पशुसंवर्धन आयुक्त पुणे या ठिकाणी बदली करण्यात आली आहे.
IAS Kavita Dwivedi : अकोला महापालिकेच्या आयुक्त कविता द्विवेदी यांची अतिरिक्त विभागीय आयुक्त पुणे या पदावर बदली करण्यात आली आहे.
IAS Dr. Hemant Wasekar : पुण्याच्या पशुसंवर्धन विभागाचे आयुक्त डाॅक्टर हेमंत वसेकर यांची नियुक्ती बाळासाहेब ठाकरे कृषि व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट) या ठिकाणी प्रकल्प संचालक म्हणून बदली करण्यात आली आहे.
IAS Kartiki N. S : मुख्य कार्यकारी अधिकारी स्मार्ट सिटी पुणे या पदावर कार्तिकी एन. एस यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
IAS Milind shambharkar : मुंबई इमारत दुरूस्ती व पुनर्रचना मंडळाच्या मुख्य अधिकारी म्हणून मिलिंद शंभरकर यांची नियुक्त करण्यात आली आहे.
IAS M J Pradeep Chandra : अतिरिक्त विकास आयुक्त (उद्योग विभाग) उद्योग संचालनालय, मुंबई या पदावर एम जे प्रदिप चंद्र यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
IAS Smt Kawli Meghna : एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प किनवट येथे प्रकल्प अधिकारी म्हणून श्रीमती कावली मेघना यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
IAS Vijay Single : बेस्टचे महाव्यवस्थापक विजय सिंगल यांची मुंबई सिडकोच्या उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.
IAS Sanjay Sethi : परिवहन व बंदरे या विभागाच्या अप्पर मुख्य सचिव पदावर संजय सेठी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
IAS Parag Jain Nainotia : परिवहन व बंदरे या विभागाचे प्रधान सचिव पराग जैन नैनोटिया यांची बदली सामान्य प्रशासन विभागातील माहिती व तंत्रज्ञान येथे प्रधान सचिव म्हणून करण्यात आली आहे.
IAS O P Gupta : वित्त विभागाचे (व्यय) मुख्य सचिव ओ पी गुप्ता यांची नियुक्ती वित्त विभागात (वित्त) या पदावर अप्पर मुख्य सचिव म्हणून करण्यात आली आहे.
IAS Rajesh Kumar : महसूल व वन विभागातील महसुल विभागाच्या अप्पर मुख्य सचिव पदावर राजेश कुमार यांची नियुक्ती करण्यात आली आहे.