VIDEO | विधानभवनाच्या बाहेर तुफान राडा, सत्ताधारी -विरोधक भिडले, घोषणाबाजी, आमदारांची धक्काबुक्की !

जामखेड टाइम्स वृत्तसेवा । आज विधानभवनाच्या पायऱ्यांवर अभूतपूर्व असा प्रसंग घडला.सत्ताधारी आणि विरोधी आमदार आमने – सामने येताच तुफान राडा झाला, घोषणाबाजी आणि धक्काबुक्कीच्या आज दिवस वादळी ठरला. सत्ताधारी आणि विरोधी आमदार एकमेकांवर धावून गेल्याच्या घटना घडली. यामुळे विधानभवनात मोठा गोंधळ निर्माण झाला होता. (Maharashtra Legislative Assembly Monsoon Session, storm raged outside maharashtra Vidhan Bhavan, ruling-opponents clashed, sloganeering, MLAs jostled)

Maharashtra Legislative Assembly Monsoon Session,  storm raged outside maharashtra Vidhan Bhavan, ruling-opponents clashed, sloganeering, MLAs jostled

पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवसापासूनच विरोधक आक्रमक झाले होते. 50 खोके, एकदम ओक्के ” “आले रे आले रे, गद्दार आले” ‘खाऊन खाऊन पन्नास खोके, माजलेत बोके माजलेत बोके…‘, तसेच, ‘पन्नास खोके, एकदम ओके… गद्दारांचं सरकार हाय हाय!!!… आले रे आले गद्दार आले…‘, ‘ईडी ज्याच्या घरी तो भाजपच्या दारी… स्थगिती सरकार हाय हाय…‘, अशा घोषणा विरोधकांकडून पहिल्या दिवसापासूनच दिल्या जात होत्या.

विरोधकांच्या घोषणाबाजीला  भाजप आणि एकनाथ शिंदे गटातील आमदारांनी प्रत्युत्तर दिले. सत्ताधारी गटाने विधानभवनाबाहेर “दाऊदचे खोके मातोश्री ओके!, बेस्टचे खोके मातोश्री ओके!, अनिल देशमुखचे खोके सिल्व्हर ओक ओके!, वाझेचे खोके मातोश्री ओके!, लवासाचे खोके सिल्व्हर ओक ओके! सत्ताधाऱ्यांनी या घोषणा आज द्यायला सुरुवात केल्या होत्या.

त्यानंतर विरोधकही घोषणा द्यायला विधान भवनाच्या पायर्‍यांवर आले. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी आणि एकनाथ शिंदे गटातील आमदार महेश शिंदे यांच्यामध्ये बाचाबाची झाली.परिस्थितीत गांभीर्य पाहता विधानसभेचे विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी विरोधी आमदारांना विधानभवनाच्या आत मध्ये घेऊन गेले आणि हाणामारीपर्यंत पोहोचणारा हा प्रसंग तिथेच थांबला.

आम्हीच धक्काबुक्की केली पावसाळी अधिवेशन सुरू झाल्यापासून खोके आणि ओके अशा घोषणा विरोधकांकडून सत्ताधार्यांसाठी दिल्या जात आहेत. या घोषणा देत असताना सत्ताधारी पक्षातील आमदार निमुटपणे जात होते, मात्र आज सत्ताधारी आमदारांकडून दिल्या जाणाऱ्या घोषणेमुळे विरोधकांची चलबिचल का झाली? आम्ही विधान भवनाच्या पायर्‍यांवर येऊन आंदोलन करत असताना विरोधी पक्ष तेथे का आला ? त्यांनी घोषणाबाजी का सुरू केली ? असा सवाल एकनाथ शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावले यांनी उपस्थित केला.

तसेच विरोधकांनी आम्हाला धक्काबुक्की केली नाही तर आम्हीच त्यांना धक्काबुक्की केली अशी ग्वाही ही भरत गोगावले यांनी दिली आहे. तसेच आम्ही कोणालाही घाबरत नाही जर विरोधक आमच्या अंगावर आले तर आम्ही त्यांना शिंगावर घेऊ असा इशारा भरत गोगावले यांनी या प्रसंगानंतर विधान भवनात प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना दिला.