Ram Shinde Narendra Modi News : विधान परिषद सभापती प्रा. राम शिंदे यांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सहकुटुंब भेट, प्रा राम शिंदे यांच्याकडून पंतप्रधानांना चोंडी भेटीचे निमंत्रण !

Ram Shinde Narendra Modi News : महाराष्ट्र विधानपरिषदेचे सभापती प्रा राम शिंदे हे गेल्या दोन दिवसांपासून सहकुटुंब राजधानी दिल्लीच्या दौर्‍यावर आहेत. प्रा शिंदे यांनी बुधवारी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सहकुटुंब सदिच्छा भेट घेतली. विधानपरिषदेच्या सभापतीपदी काम करण्याची संधी दिल्याबद्दल प्रा शिंदे यांनी पंतप्रधान मोदी यांचे आभार मानत त्यांचे आशिर्वाद घेतले. या भेटीत प्रा राम शिंदे यांनी पंतप्रधानांना चोंडी भेटीचे निमंत्रण दिले. (pm narendra modi news today) पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जयंती सोहळ्यास उपस्थित राहण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी मान्य केले.

maharashtra Legislative Council Chairman Ram Shinde meet PM Narendra Modi with his family, ram Shinde invited Prime Minister modi to  Punyashlok Ahilyadevi Holkar Jayanti 2025, Ram Shinde Narendra Modi News,

नागपुर हिवाळी अधिवेशनात प्रा राम शिंदे यांची विधानपरिषदेच्या सभापतीपदी बिनविरोध निवड झाली होती. अधिवेशन संपल्यानंतर प्रा राम शिंदे हे पक्ष नेतृत्वाच्या भेटीसाठी प्रथमच दिल्लीच्या दौर्‍यावर गेले होते. सोमवारी रात्री दिल्लीत दाखल झालेल्या प्रा शिंदे यांनी मंगळवारी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा, राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे, माजी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांची भेट घेतली होती. (ram shinde news today)

maharashtra Legislative Council Chairman Ram Shinde meet PM Narendra Modi with his family, ram Shinde invited Prime Minister modi to  Punyashlok Ahilyadevi Holkar Jayanti 2025, Ram Shinde Narendra Modi News,

विधानपरिषद सभापती प्रा राम शिंदे यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची बुधवारी त्यांच्या निवासस्थानी सहकुटुंब भेट घेतली. यावेळी शिंदे यांची विधानपरिषदेच्या सभापती पदी निवड झाल्याबद्दल पंतप्रधानांनी त्यांचे अभिनंदन केले व त्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. पक्षाने सर्वसामान्य शेतकरी कुटूंबातील छोट्या कार्यकर्त्याच्या खांद्यावर महाराष्ट्र विधानपरिषदेच्या सभापतीपदी काम करण्याची संधी दिल्याबद्दल प्रा शिंदे यांनी पंतप्रधानांचे आभार मानले. (ram shinde news)

maharashtra Legislative Council Chairman Ram Shinde meet PM Narendra Modi with his family, ram Shinde invited Prime Minister modi to  Punyashlok Ahilyadevi Holkar Jayanti 2025, Ram Shinde Narendra Modi News,

यावेळी झालेल्या भेटीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिंदे कुटूंबातील सर्व सदस्यांची अतिशय आपुलकीने संवाद साधला. यावेळी मोदी यांनी शिंदे यांच्या मातोश्री भामाबाई शिंदे यांची आस्थेवाईकपणे चौकशी केली. सर्व सदस्यांशी त्यांनी दिलखुलास संवाद साधला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीने शिंदे कुटूंबातील सर्व सदस्य भारावून गेले होते. यावेळी शिंदे कुटुंबियांच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची मूर्ती भेट देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी प्रा राम शिंदे यांच्या पत्नी आशाताई शिंदे, मुलगी डाॅ अन्विता शिंदे, मुलगी डॉ अक्षता शिंदे, जावाई श्रीकांत खांडेकर, मुलगा अजिंक्य शिंदे हे शिंदे कुटूंबातील सदस्य यावेळी उपस्थित होते. (ram shinde live news)

maharashtra Legislative Council Chairman Ram Shinde meet PM Narendra Modi with his family, ram Shinde invited Prime Minister modi to  Punyashlok Ahilyadevi Holkar Jayanti 2025, Ram Shinde Narendra Modi News,

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समवेत पार पडलेल्या या भेटीवेळी प्रा राम शिंदे यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दानिमित्त  पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे जन्मस्थान असलेल्या चोंडी (ता. जामखेड, जि. अहिल्यानगर) या ठिकाणी ३१ मे २०२५ रोजी साजऱ्या होणाऱ्या जयंती सोहळ्यास आवर्जून उपस्थित राहावे असे निमंत्रण दिले. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी शिंदे यांनी दिलेल्या निमंत्रणाचा स्विकार केला.

maharashtra Legislative Council Chairman Ram Shinde meet PM Narendra Modi with his family, ram Shinde invited Prime Minister modi to  Punyashlok Ahilyadevi Holkar Jayanti 2025, Ram Shinde Narendra Modi News,

दरम्यान, विधानपरिषद सभापती प्रा.राम शिंदे यांनी बुधवारी देशाचे गृहमंत्री अमित शहा यांची सहकुटुंब भेट घेतली. यावेळी शिंदे कुटुंबियांच्या वतीने प्रा शिंदे यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची मुर्ती देऊन त्यांचा सन्मान केला. सर्वसामान्य कार्यकर्त्यांवर पक्षाने विश्वास दाखवून विधानपरिषद सभापतीपदी काम करण्याची संधी दिल्याबद्दल यावेळी शिंदे यांनी गृहमंत्री अमित शहा यांचे आभार मानले. यावेळी अमित शहा यांनी शिंदे कुटूंबातील सदस्यांशी आपुलकीने संवाद साधला. त्यानंतर अमित शहा व प्रा शिंदे या दोन्ही नेत्यांमध्ये प्रदीर्घ चर्चा झाली.येत्या १२ जानेवारी रोजी शिर्डी येथे होत असलेल्या महाराष्ट्र भाजपच्या महाअधिवेशनासंदर्भात यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये सविस्तर चर्चा पार पडली.

maharashtra Legislative Council Chairman Ram Shinde meet PM Narendra Modi with his family, ram Shinde invited Prime Minister modi to  Punyashlok Ahilyadevi Holkar Jayanti 2025, Ram Shinde Narendra Modi News,

पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांच्या भेटी आधी सभापती प्रा राम शिंदे यांनी देशाचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांची सहकुटुंब भेट घेतली. यावेळी धनखड यांनी शिंदे कुटुंबाचे उत्साहात स्वागत केले. यावेळी शिंदे यांच्या मातोश्री भामाबाई शिंदे यांच्याशी धनखड कुटूंबाने आपुलकीने संवाद साधला. यावेळी प्रा राम शिंदे यांच्या पत्नी आशाताई शिंदे, मुलगी डाॅ अन्विता शिंदे, मुलगी डॉ अक्षता शिंदे, जावाई श्रीकांत खांडेकर, मुलगा अजिंक्य शिंदे हे शिंदे कुटूंबातील सदस्य यावेळी उपस्थित होते. यावेळी धनखड कुटुंबाने शिंदे कुटूंबातील सर्वांशी आस्थेवाईकपणे संवाद साधला.

maharashtra Legislative Council Chairman Ram Shinde meet PM Narendra Modi with his family, ram Shinde invited Prime Minister modi to  Punyashlok Ahilyadevi Holkar Jayanti 2025, Ram Shinde Narendra Modi News,

दरम्यान, या भेटीबाबत प्रा राम शिंदे यांनी फेसबुक पोस्ट लिहीली आहे, त्यात म्हटले आहे की, उपराष्ट्रपती श्री.जगदीप धनखड जी यांची त्यांच्या दिल्ली येथील निवासस्थानी सहकुटुंब सदिच्छा भेट घेतली. त्यांच्या प्रदीर्घ राजकीय, सामाजिक आणि प्रशासकीय अनुभवातून या भेटीत खूप काही शिकण्यासारखे होते.देशाच्या संस्कृतीशी त्यांचा खोलवर संबंध आहे. तर त्यांच्या प्रदीर्घ अनुभवात पर्यटन क्षेत्राचा खास समावेश आहे. अशी भावना शिंदे यांनी व्यक्त केली.

maharashtra Legislative Council Chairman Ram Shinde meet PM Narendra Modi with his family, ram Shinde invited Prime Minister modi to  Punyashlok Ahilyadevi Holkar Jayanti 2025, Ram Shinde Narendra Modi News,

विधानपरिषदेचे नवनिर्वाचित सभापती प्रा.राम शिंदे हे सहकुटुंब दिल्ली दौर्‍यावर आहेत. सोमवारी शिंदे यांनी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांची सहकुटुंब सदिच्छा भेट घेतली. पक्षाने दाखवलेल्या विश्वासाबद्दल त्यांनी पक्षाचे आभार मानले. महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी व सामान्य जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी सभापतीपदाचा उपयोग केला जाईल असा शब्द शिंदे यांनी यावेळी पक्ष नेतृत्वाला दिला.

maharashtra Legislative Council Chairman Ram Shinde meet PM Narendra Modi with his family, ram Shinde invited Prime Minister modi to  Punyashlok Ahilyadevi Holkar Jayanti 2025, Ram Shinde Narendra Modi News,

विधानपरिषद सभापती प्रा राम शिंदे हे रविवारपासून दिल्ली दौर्‍यावर आहेत. रविवारी रात्री उशिर शिंदे हे सहकुटुंब दिल्लीत दाखल झाले. आज सोमवारी प्रा राम शिंदे यांनी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांची सहकुटुंब भेट घेतली.यावेळी त्यांच्यासमवेत मातोश्री भामाबाई शिंदे, पत्नी आशाताई शिंदे, कन्या डाॅ अन्विता शिंदे, चिरंजीव अजिंक्य शिंदे उपस्थित होते.

विधानपरिषद सभापतपदी निवड झाल्यानंतर प्रा राम शिंदे यांनी आज प्रथमच जे.पी. नड्डा यांची भेट घेतली.यावेळी नड्डा यांनी प्रा शिंदे यांचे अभिनंदन करत मोलाचे मार्गदर्शन केले. त्याचबरोबर त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी जे.पी. नड्डा यांनी शिंदे कुटुंबियांचे मनोभावे स्वागत करत आस्थेवाईकपणे चौकशी करत आपुलकीने संवाद साधला.

maharashtra Legislative Council Chairman Ram Shinde meet PM Narendra Modi with his family, ram Shinde invited Prime Minister modi to  Punyashlok Ahilyadevi Holkar Jayanti 2025, Ram Shinde Narendra Modi News,

या भेटीबाबत सभापती प्रा शिंदे यांनी सोशल मीडियावर माहिती जारी केली आहे. त्यात म्हटले आहे की, भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय मंत्री जे.पी.नड्डा जी यांची आज सहकुटुंब सदिच्छा भेट घेतली. विधानपरिषद सभापती पदी निवड झाल्यानंतरची ही प्रथमच भेट असल्या कारणाने त्यांनी माझे अभिनंदन करून मला मोलाचे मार्गदर्शन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. माझ्यावर विश्वास दाखवून पक्षाने मला सभापती पदाची महत्त्वाची जबाबदारी दिल्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त केले. या पदाचा उपयोग महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी व सामान्य जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी होईल असा शब्द त्यांना दिला. असे म्हटले आहे.

कर्जत-जामखेडचे भाग्यविधाते प्रा राम शिंदे यांनी सरपंच ते विधानपरिषदेचे सभापतीपद मोठ्या संघर्षातून मिळवले आहे. पक्षाशी एकनिष्ठ राहून प्रामाणिकपणे काम करत राहिल्यास पक्ष सामान्य कार्यकर्त्यालाही मोठ्या उंचीवर घेऊन जातो याचेच मुर्तीमंत उदाहरण म्हणजे प्रा राम शिंदे हे होय. शिंदे यांना पक्षाने विधिमंडळाच्या सर्वोच्च पदावर काम करण्याची संधी दिली आहे.पक्षाने दाखवलेल्या विश्वासाबद्दल प्रा शिंदे यांनी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांची भेट घेऊन आभार मानले.

जे.पी नड्डा यांच्या भेटीनंतर प्रा शिंदे यांनी भाजपाच्या जेष्ठ नेत्या तथा माजी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांची भेट घेतली. या भेटीत स्मृती इराणी यांनी प्रा राम शिंदे यांच्या मातोश्रींचे आशीर्वाद घेत आपुलकीने संवाद साधला.२००९ च्या विधानसभा निवडणुकीपासून त्यांच्या विशेष मार्गदर्शनाची साथ मला नेहमी मिळत आलेली आहे. ही आपुलकी आणि आजची भेट सदैव स्मरणात राहील.त्यांच्या सोबत घालवलेला प्रत्येक क्षण हा नेहमीप्रमाणे प्रेरणादायी ठरला.या भेटीसाठी आणि शुभेच्छासाठी स्मृती इराणी जी यांचे मनःपूर्वक आभार अशी भावना प्रा शिंदे यांनी व्यक्त केली.

maharashtra Legislative Council Chairman Ram Shinde meet PM Narendra Modi with his family, ram Shinde invited Prime Minister modi to  Punyashlok Ahilyadevi Holkar Jayanti 2025,

स्मृति इराणी यांच्या भेटीनंतर प्रा शिंदे यांनी भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांची भेट घेतली. या भेटीत तावडे यांनी प्रा शिंदे यांची विधानपरिषद सभापतीपदी निवड झाल्याबद्दल अभिनंदन करत सत्कार केला. तावडे यांनी शिंदे यांना मोदी यांच्या जीवनावरील पुस्तक भेट दिले.या भेटीत दोन्ही नेत्यांमध्ये महाराष्ट्रातील विविध विषयांवर तसेच संघटनात्मक बांधणी सकारात्मक चर्चा झाली.

maharashtra Legislative Council Chairman Ram Shinde meet PM Narendra Modi with his family, ram Shinde invited Prime Minister modi to  Punyashlok Ahilyadevi Holkar Jayanti 2025,

राजधानी दिल्लीच्या दौऱ्यावर असताना बीबीसी मराठीच्या कार्यालयाला प्रा राम शिंदे यांनी भेट दिली. मुळचे कर्जतचे असलेले बीबीसी मराठीचे संपादक अभिजीत कांबळे यांच्या टीमशी त्यांनी मनमोकळा संवाद साधला. यावेळी अभिजीत कांबळे यांनी त्यांच्या आई रत्नाताई कांबळे यांनी लिहिलेलं “पारंबी आरोग्याच्या वटवृक्षाची” हे पुस्तक शिंदे यांना भेट दिलं. रत्नाताई कांबळे यांचं आरोग्य क्षेत्रातील काम सर्वांना प्रेरणादायी आणि आदर्शवत आहे, असे शिंदे यांनी म्हटले.