जामखेड टाईम्स वृत्तसेवा | Maharashtra Legislative Council Election 2022 | राज्य विधिमंडळाच्या विधान परिषदेच्या रिक्त दहा जागांसाठीची निवडणूक जाहीर झाली आहे. येत्या २० जून रोजी या निवडणुकीचे मतदान पार पडणार आहे. निवडणूक आयोगाकडून अधिसूचना जारी करण्यात आली आहे. (Election of 10 seats Maharashtra Legislative Council announced)
राज्यात सध्या राज्यसभेच्या निवडणुकीमुळे राजकीय वातावरण तापले आहे. त्यातच आता विधान परिषदेचा निवडणूक कार्यक्रम जाहिर झाल्याने राज्याचे राजकीय वातावरण ढवळून निघणार आहे.विधान परिषदेवर आपली वर्णी लागावी यासाठी सर्वच पक्षातील राजकीय नेते जोरदार मोर्चेबांधणी करताना दिसणार आहेत.
असा असेल निवडणूक कार्यक्रम
- नोटिफिकेशन – २ जून २०२२ रोजी
- उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस – ९ जून २०२२
- उमेदवारांच्या अर्जांची छाननी – १० जून २०२२
- उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस – १३ जून २०२२
मतदानाचा दिनांक – २० जून २०२२
- मतदानाची वेळ – सकाळी ९ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत
- मतमोजणीचा दिनांक – २० जून २०२२ (सायंकाळी ५ वाजता)
‘या’ आमदारांचा संपतोय कार्यकाळ
- सदाभाऊ खोत
- सुजीतसिंह ठाकूर
- प्रवीण दरेकर
- सुभाष देसाई
- रामराजे नाईक-निंबाळकर
- संजय दौंड
- विनायक मेटे
- प्रसाद लाड
- दिवाकर रावते
- रामनिवास सिंह
या दहा आमदारांचा कार्यकाळ ७ जुलै रोजी संपत असल्यानं या जागांवर निवडणूक होणार आहे.