Maharashtra Legislative Council Speaker Election 2024 : अखेर ठरलं ! कर्जत जामखेडचे ‘रामराजे’ होणार  विधानपरिषदेचे सभापती, आमदार प्रा.राम शिंदे यांच्या नावाची भाजपकडून अधिकृत घोषणा !

Maharashtra Legislative Council Speaker Election 2024 : नागपुर हिवाळी अधिवेशनात विधानपरिषद सभापतीपदाचा निवडणूक कार्यक्रम घोषित झाला आहे.(Nagpur winter Session 2024) मागील दोन अडीच वर्षांपासून रिक्त असलेल्या विधानपरिषद सभापतीपदासाठी (vidhan parishad sabhapati maharashtra) भाजपकडून कर्जत-जामखेडच्या ‘रामराजेंचे’ अर्थात आमदार प्रा.राम शिंदे (Ram Shinde bjp) यांच्या उमेदवारीची घोषणा करण्यात आली आहे. जामखेड टाइम्सने विधानपरिषद सभापतीपदी राम शिंदे यांची निवड होणार हा अंदाज दीड वर्षापुर्वी वर्तवला होता. जामखेड टाइम्सने वर्तवलेला तो अंदाज अखेर तंतोतंत खरा ठरला आहे. (Maharashtra Vidhan Parishad speaker Ram Shinde latest news)

Maharashtra Legislative Council Speaker Election 2024, Finally decided, Karjat Jamkhed's 'Ram Raje' will be the Speaker of the Legislative Council, name of MLA Prof. Ram Shinde will be officially announced by BJP

राज्यात नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीने प्रचंड बहुमत मिळवत राज्यात एकहाती सत्ता स्थापन केली आहे. सर्वाधिक जागा जिंकलेल्या भाजपने आपल्याकडे मुख्यमंत्रीपद, विधानसभा अध्यक्ष त्याचबरोबर आता विधानपरिषदेचे सभापतिपद घेतले आहे. महाराष्ट्राचे २१ वे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस हे विराजमान झाले आहेत. तर विधानसभा अध्यक्षपदी भाजपचे आमदार ॲड राहूल नार्वेकर हे विराजमान झाले आहेत. तर एकनाथ शिंदे सरकारमध्ये लांबणीवर पडलेली विधानपरिषद सभापती पदाची निवडणूक फडणवीस सरकार सत्तेवर येताच निवडणूक होण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. नागपुरमध्ये सुरु असलेल्या हिवाळी अधिवेशनात विधानपरिषदेच्या सभापतीपदाची निवड केली जाणार आहे.

Maharashtra Legislative Council Speaker Election 2024, Finally decided, Karjat Jamkhed's 'Ram Raje' will be the Speaker of the Legislative Council, name of MLA Prof. Ram Shinde will be officially announced by BJP

राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांच्या आदेशानुसार विधानपरिषद सभापतीपदाचा निवडणूक कार्यक्रम उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी आज १७ रोजी विधानपरिषदेत जाहीर केला. या पदासाठी १९ डिसेंबर २०२४ रोजी मतदान होणार १८ डिसेंबर २०२४ रोजी दुपारी १२ वाजेपर्यंत सभापती पदासाठी अर्ज करता येणार आहे. त्यानंतर त्या अर्जांची छाननी होणार आहे.रामराजे निंबाळकर यांचा सभापतीपदाचा कार्यकाळ संपल्यापासून विधानपरिषदेचे सभापतीपद रिक्त होते. परंतू आता या पदाची निवडणूक १९ रोजी नागपूरात पार पडणार आहे. भाजपकडून या पदासाठी आमदार प्रा.राम शिंदे यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. (Tajya Marathi Batmya)

विधानपरिषद सभागृहाच्या कामकाजावरील आपली पकड अधिक घट्ट करण्यासाठी भाजपने सभापतीपद आपल्याकडे ठेवले आहे.सर्वांना सोबत घेऊन चालणारं, समन्वय राखणारं, निष्कलंक, वादग्रस्त नसलेलं, राजकीय नेतृत्व सभापतीपदी असावं यासाठी भाजपकडून आमदार प्रा.राम शिंदे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या माहेरचे नववे वंशज असलेले प्रा राम शिंदे हे राज्यातील धनगर समाजातील महत्त्वाचे मोठे नेते आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू सहकारी म्हणून त्यांची राज्याच्या राजकारणात ओळख आहे. शिंदे यांनी तत्कालीन फडणवीस सरकारमध्ये कॅबिनेटमंत्री म्हणून काम पाहिले आहे.त्यांच्याकडे विधिमंडळीय कामकाजाचा दांडगा अनुभव आहे. पक्ष संघटनेत झोकुन देऊन प्रामाणिकपणे काम करणारा, पक्ष देईल ती जबाबदारी यशस्वीपणे पार पाडणारा, शांत, संयमी, निष्कलंक, विकासाभिमूख, अभ्यासू, सर्वांना सोबत घेऊन जाणारा निष्ठावंत नेता म्हणून राम शिंदेंना राज्याच्या राजकीय वर्तुळात ओळखले जाते.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या गुड बुकमध्ये राज्यातील ज्या मोजक्या नेत्यांचा समावेश आहे त्यात शिंदे यांचा समावेश होतो.

भाजपने विधानपरिषदेच्या सभापतीपदासाठी कर्जत-जामखेडच्या रामराजेंची अर्थात आमदार प्रा.राम शिंदे यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले आहे.आमदार प्रा.राम शिंदे याची विधानपरिषद सभापतीपदाची निवड जवळपास निश्चित मानली जात आहे. यामुळे मतदारसंघासह राज्यातील शिंदे समर्थकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. ओबीसी नेतृत्व असलेल्या आमदार राम शिंदे यांची विधानपरिषदेच्या सभापतीपदी वर्णी लागणार असल्यामुळे राज्यातील धनगर आणि ओबीसी समाजात चांगला संदेश गेला आहे.

नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत आमदार प्रा.राम शिंदे यांचा निसटता पराभव झाला होता. सर्वाधिक मते घेऊन सर्वात कमी फरकाने पराभूत होणारे आमदार प्रा राम शिंदे हे राज्यातील क्रमांक एकचे उमेदवार ठरले होते. त्यांनी या निवडणुकीत त्यांनी १ लाख २६ हजार ४३३ इतके मते घेतली होती. राज्यात सर्वाधिक मते घेऊन चौथ्या क्रमांकाचे पराजित झालेले तसेच सर्वाधिक मते घेऊन सर्वात कमी फरकाने पराजित झालेले राम शिंदे हे क्रमांक एकचे उमेदवार ठरले होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत विश्वासू सहकारी अशी ओळख असलेल्या आमदार प्रा.राम शिंदे यांना मंत्रीपद, प्रदेशाध्यक्ष किंवा विधानपरिषद सभापतीपद या तिन्हीपैकी एका ठिकाणची जबाबदारी भाजपकडून दिली जाणार असल्याची चर्चा सातत्याने सुरु होती. भाजपने आमदार राम शिंदेंना मंत्रिपदा ऐवजी विधानपरिषदेच्या सभापतीपदीची संधी देण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. उद्या १८ रोजी आमदार शिंदे हे सभापतीपदासाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. शिंदे यांना भाजपने सभापतीपदाची उमेदवारी जाहीर करताच फटाक्यांची आतिषबाजी करत शिंदे समर्थकांनी एकच जल्लोष केला आहे.