SSC Board Result : विद्यार्थ्यांनो, असा पहा दहावीचा online निकाल या वेबसाईटवर
उद्या १६ जुलै रोजी दुपारी जाहीर होणार दहावीचा निकाल
मुंबई : महाराष्ट्र एसएससी बोर्डचा निकाल टांगणीला लागला होता. दहावीचा निकाल कधी लागतो याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.अखेर निकालाची प्रतीक्षा संपली असून उद्या १६ जुलै रोजी दुपारी दहावी परीक्षेचा निकाल जाहीर होणार आहे.(Maharashtra SSC Board Result) बोर्डाच्या वेबसाईटवर दुपारी०१ वाजता हा निकाल पाहता येईल माहिती अशी राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड (School Education Minister Varsha Gaikwad) यांनी दिली.
राज्य सरकारनं महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाच्यावतीनं घेण्यात येणाऱ्या दहावीच्या परीक्षा यंदा कोरोना विषाणू संसर्गाची दुसरी लाट असल्यानं रद्द करण्याचा निर्णय जाहीर केला होता. शालेय शिक्षण मंत्रालय आणि महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाच्यावतीनं दहावीचा निकाल जाहीर करण्यासाठी सूत्र ठरवण्यात आलं होतं. राज्यातील शाळांना दहावीचे गुण संगणकीय प्रणालीत नोंदवण्याची मुदत उलटून गेली आहे. आता मिळाल्या नवीन माहितीनुसार उद्या दाहवीचा निकाल जाहीर होणार आहे.
खालील वेबसाईटवर (Maharashtra SSC Board Result) निकाल पाहू शकता
www.mahresult.nic.in
www.sscresult.mkcl.org
www.maharashtraeduction.com
असा पहा तुमचा दहावीचा SSC Board Result निकाल
● वर दिलेल्या कोणत्याही वेबसाईटवर जाऊन निकाल पाहू शकता.
● त्यानंतर तुम्हाला SSC BOARD RESULT नावाचा ऑप्शन दिसेल.
●त्या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचा सीट नंबर स्पेसशिवाय टाईप करावा लागेल.
● त्यानंतर खालच्या रकान्यात तुमच्या आईच्या नावाची पहिली तीन अक्षरे टाकावी लागतील. म्हणजेच समजा तुमचा नंबर M१२३४५६ असा असेल आणि तुमच्या आईचे नाव सुवर्णा असेल, तर तुमच्या पहिल्या रकान्यात M१२३४५६ हा सीट नंबर येईल आणि दुसऱ्या रकान्यात आईच्या नावाची पहिली तीन अक्षरे म्हणजेच SUV असे लिहावे लागेल.(Maharashtra SSC Board Result)
● यानंतर लगेचच तुम्हाला निकाल स्क्रीनवर दिसेल. (Maharashtra SSC Board Result)
● निकाल पाहिल्यानंतर तुम्हाला तो डाऊनलोडही करता येणार आहे. तसेच विद्यार्थ्यांना निकालाची प्रिंटआऊटही काढता येणार आहे. (Maharashtra SSC Board Result)