Maharashtra Vidhan Parishad election results 2022 LIVE : आखिर वो लौट आया, राम शिंदेंचा विधान परिषदेत दणदणीत विजय,
जामखेड टाइम्स वृत्तसेवा । Maharashtra Vidhan Parishad election results 2022 LIVE | “मेरा पानी उतरता देख, किनारे पर घर मत बना लेना, मै समंदर हुँ, लौटकर जरूर आऊंगा” असे म्हणत विधानपरिषद निवडणुकीच्या मैदानात उतरलेल्या माजी मंत्री प्रा. राम शिंदे यांनी आपले शब्द खरे करून दाखवले.त्यांनी विधान परिषद निवडणुकीत दणदणीत विजय मिळवला.’आखिर वो लौट आया’ असे म्हणत कर्जत-जामखेड मतदारसंघातील शिंदे समर्थकांमध्ये उत्साह संचारला आहे. (Aakhir o laut aaya, Ram Shinde’s resounding victory in Legislative Council elections 2022 )
विधान परिषदेच्या दहा जागांसाठी आज निवडणूक पार पडली. या निवडणुकीत भाजपकडून राम शिंदे, प्रविण दरेकर, श्रीकांत भारतीय, उमाताई खापरे आणि प्रसाद लाड तसेच राष्ट्रवादीकडून रामराजे निंबाळकर, एकनाथ खडसे शिवसेनेकडून सचिन अहिर, आमश्या पाडवी, काँग्रेस कडून भाई जगताप आणि चंद्रकांत हंडोरे असे अकरा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. या निवडणुकीचे निकाल आता समोर आले आहेत.
धक्कादायक : वीज खंडीत केली जाणार.. मॅसेजवर विश्वास ठेवला.. दीड लाखाला चुना लागला
विधान परिषद निवडणुकीमध्ये माजी मंत्री राम शिंदे यांच्या निकालाकडे कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघाचे सर्वाधिक लक्ष लागले होते. निवडणुकीच्या सुरुवातीच्या टप्प्यामध्ये माजी मंत्री राम शिंदे यांनी “मेरा पानी उतरता देख, किनारे पर घर मत बना लेना, मै समंदर हुँ, लौटकर जरूर आऊंगा” असे व्हाट्सअप स्टेटस ठेवले होते. त्यामुळे राम शिंदे यांची विधान परिषदेत वर्णी लागणार हे जवळपास स्पष्ट झाले होते, आणि झालेही तसेच, भाजपने राम शिंदे यांच्या एकनिष्ठतेवर विश्वास दाखवत त्यांना विधान परिषदेची उमेदवारी बहाल केली.
खळबळजनक : एकाच कुटुंबातील 9 जणांची आत्महत्या, सांगली जिल्ह्यातील घटनेने महाराष्ट्र हादरला !
विधानपरिषद निवडणूक बिनविरोध होईल अशी अपेक्षा असताना या निवडणुकीत भाजपने पाचवा तर काँग्रेसने दुसरा उमेदवार रिंगणात उतरून रंगत आणली. अतिशय चुरशीच्या आणि अतीतटीच्या वातावरणात पार पडलेल्या या निवडणुकीमध्ये कोण गुलाल उधळणार याकडे राज्याचे लक्ष लागले होते.
आज दिवसभरात अतिशय नाट्यमय घडामोडीनंतर मतदान प्रक्रिया पार पडली. दरम्यान माजी मंत्री राम शिंदे यांचा विजय निश्चित असल्याने भाजपच्या कार्यकर्त्यांनी विजयी जल्लोष दणक्यात साजरा करण्याची तयारी मागील दोन दिवसांपासून सुरू केली होती. निकाल जाहीर होताच गावागावातील शिंदे समर्थक आणि भाजपा कार्यकर्त्यांकडून फटाक्यांची आतिषबाजी करत ढोल ताश्यांच्या गजरात विजयोत्सव साजरा केला जात आहे.
खळबळजनक : अहमदनगर जिल्ह्यात आठ गावठी पिस्तूल, 10 जिवंंत काडतुसांसह तिघांना बेड्या, एलसीबीची धडक कारवाई
कर्जत जामखेडचे माजी आमदार तथा माजी मंत्री माजी राम शिंदे हे पहिल्याच फेरीत विजयी झाले आहेत. राम शिंदे यांना पहिल्या फेरीत मते मिळाली.
विधान परिषदेत विजय झालेले उमेदवार खालीलप्रमाणे
भाजपचे पहिल्या फेरीतील विजयी उमेदवार
- प्रा राम शिंदे
- श्रीकांत भारतीय
- प्रविण दरेकर
- उमाताई खापरे
- प्रसाद लाड (निकाल बाकी)
शिवसेना पहिल्या फेरीतील विजयी उमेदवार
- सचिन आहिर
- आमश्या पाडवी
राष्ट्रवादीचे पहिल्या फेरीतील विजयी उमेदवार
- एकनाथ खडसे
- रामराजे निंबाळकर
काँग्रेस विजयी उमेदवार
- भाई जगताप
कर्जत जामखेडला मिळणार दुसरा आमदार, उत्सुकता शिगेला, विधानपरिषदेचे मतदान सुरू !