Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Date : कार्यकर्त्यांनो लागा तयारीला, अचारसंहिता लागण्यास उरले इतके दिवस, महाराष्ट्र विधानसभा निवडणूक या तारखेला जाहीर होणार

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Date :  महाराष्ट्र विधानसभा निवडणूक कधी जाहीर होणार ? याची सर्वांनाच उत्सुकता आहे. विधानसभा निवडणुक कधीही लागु शकते, त्यामुळे राज्यात वेगाने राजकीय घडामोडी घडताना दिसत आहेत. राजकीय पक्षांनी निवडणूक तयारीला वेग दिला आहे. राजकीय पक्षांत जागा वाटपाची अंतिम बोलणी सुरु आहे. महायुती विरोधात महाविकास आघाडी असा सामना रंगणार आहे. मात्र काही पक्षांनी तिसऱ्या आघाडीची मोट बांधण्यास राज्यात सुरुवात केली आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक जाहीर होण्यास अवघे काही दिवस उरले आहेत.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Date, Activists start preparing, so much time left for code of conduct, Maharashtra assembly election will be announced on this date
चर्चेतल्या बातम्या

महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीच्या तयारीत राजकीय पक्षांसह प्रशासनानेही जोरदार तयारी केली आहे. जम्मू काश्मिर आणि हरियाणा राज्यातील निकालानंतर महाराष्ट्र आणि झारखंड या दोन राज्याच्या निवडणुकांची घोषणा होऊ शकते. 10 ऑक्टोबरच्या पुढे कधाही महाराष्ट्रात विधानसभेची अचारसंहिता लागु शकते. केंद्रीय निवडणूक आयोग याबाबतची घोषणा करू शकते, अशी माहिती समोर येत आहे.

विधानसभा निवडणूक जाहीर होण्यास काही दिवस उरले असतानाच सरकारकडून विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे. राज्यात महायुतीला पोषक वातावरण आहे. त्याला छेद देण्यासाठी महाविकास आघाडी सरसावली आहे. कोण बाजी मारणार याकडे देशाचे लक्ष लागले आहे. आमदारकीचे स्वप्न पाहणारे अनेक मोठे नेते पक्षांतर करत आहेत. तर काही नेते मुजोर नेत्यांना धडा शिकवण्यासाठी मैदानात उतरले आहेत.

जम्मू काश्मीर आणि हरियाणा विधानसभा निवडणुकीचा 8 ऑक्टोबर रोजी निकाल आहे. त्यानंतर 15 ऑक्टोबर नंतर कोणत्याही क्षणी महाराष्ट्र आणि झारखंड या दोन राज्यांच्या निवडणूकांची केंद्रीय निवडणूक आयोगाकडून घोषणा होण्याची शक्यता आहे. अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 8 ऑक्टोबरला हरियाणा व जम्मू काश्मीर निवडणुकांचे निकाल लागण्याची शक्यता आहे. तर 10 ऑक्टोबरला हरियाणा- जम्मू काश्मीर निवडणूक कार्यक्रम संपणार आहे. नियमानुसार एक निवडणूक कार्यक्रम संपण्यापूर्वी दुसऱ्या निवडणूक कार्यक्रमाची घोषणा करता येत नाही .13 ऑक्टोबरला रविवार आहे. 14 तारखेनंतर सुरु होणाऱ्या ऑक्टोबर महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात आचारसंहितेची घोषणा होण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्रात नियमानुसार नवी विधानसभा 26 नोव्हेंबर 2024 रोजी अस्तित्त्वात येणार आहे. निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यानंतर साधारण 45 दिवसांनी नवीन विधानसभेची स्थापना होणे अपेक्षित असते. त्यामुळे निवडणूक आयोगाने नोव्हेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात विधानसभा निवडणूक घ्यायचे ठरवले तर त्यासाठी ऑक्टोबरच्या दुसऱ्या पंधरवड्यात आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे. तेव्हापासून राज्यात लगेच आदर्श आचारसंहिता लागू होईल. त्यानंतर 45 दिवसांचा कालावधी गृहित धरला तरी 26 नोव्हेंबरपूर्वी नव्या विधानसभेची स्थापना होणे शक्य आहे.