Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Date : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक कधी जाहीर होणार ? समोर आली महत्वाची अपडेट
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Date : महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक कधी होणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. या निवडणूकीच्या तयारीत सर्वच राजकीय पक्ष गुंतले आहे. राज्यात निवडणूकपुर्व राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघाले आहे. सत्तारूढ विरूध्द विरोधक यांच्यात आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्या आहेत. अश्यातच विधानसभा निवडणुकीच्या घोषणेबाबत एक महत्वाचे अपडेट समोर आली आहे.
जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीसाठीचे मतदान नुकतेच पार पडले आहे.महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीची घोषणा कोणत्याही जाहीर होण्याची शक्यता आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाचे पथक पुढच्या आठवड्यात महाराष्ट्र दौर्यावर येणार आहे. २७ व २८ निवडणूक आयोगाचे पथक महाराष्ट्र दौऱ्यावर येणार आहे. या पथकाकडून निवडणूक तयारीचा आढावा घेतला जाणार असून त्यानंतर निवडणुकीबाबत ग्रीन सिग्नल दिला जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी १० किंवा १४ ऑक्टोबरला निवडणूक कार्यक्रम घोषित होऊ शकतो किंवा या तारखांना अचारसंहिता लागू शकते.केंद्रीय निवडणूक आयोगाचे पथक महाराष्ट्र दौर्यावर आल्यानंतरच निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार आहे. या पथकाने निवडणूक तयारीचा आढावा घेतल्यानंतर निवडणूकीच्या तारखांची घोषणा होईल. त्यामुळे विधानसभा निवडणूक लवकरच लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
मुख्य निवडणूक आयोगाने काही दिवसांपूर्वी झालेल्या बैठकीत सर्व जिल्हाधिकाऱ्यांकडून जिल्ह्यातील आढावा घेतला. निवडणुकीसाठी सर्व जिल्हातील कायदा आणि सुवस्था त्याच मतदानासाठी किती कर्मचारी आहेत, यांची माहिती घेण्यात आली. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणूक कोणत्याही क्षणी लागू शकतात, अशी चर्चा सुरू झाली आहे.