Maharashtra Vidhan Sabha Nivadnuk 2024 : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची आज होणार घोषणा, केंद्रीय निवडणूक आयोगाची आज पत्रकार परिषद

Maharashtra Vidhan Sabha Nivadnuk 2024 : महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक कधी होणार ही प्रतिक्षा आता आज संपणार आहे. यासंबधी निवडणूक आयोगाची आज दुपारी पत्रकार परिषद आहे. महाराष्ट्र आणि झारखंड या दोन राज्यांच्या निवडणूकांची आज घोषणा होणार आहे.

Maharashtra Vidhan Sabha Nivadnuk 2024, Maharashtra Vidhan Sabha Elections will be announced today, Central Election Commission press conference today

विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. सरकारनेही निवडणुकीची जोरदार तयारी केली आहे. विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता कधी लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. निवडणूक आयोगाची आज दुपारी पत्रकार परिषद होणार असून त्या पत्रकार परिषदेत विधानसभा निवडणुकीच्या निवडणूक कार्यक्रमाची घोषणा होणार आहे. आजपासूनच राज्यात आचारसंहिता लागू होऊ शकते.