LIVE : महाराष्ट्रातील सर्वात उंच रावण दहन सोहळ्यास सुरूवात, पहा खर्डा किल्ला मैदानावरील संपूर्ण लाईव्ह सोहळा
जामखेड टाइम्स वृत्तसेवा । सत्तार शेख । आमदार रोहित पवार यांच्या पुढाकारातून जामखेड तालुक्यातील ऐतिहासिक खर्डा (शिवपट्टन) किल्ल्याच्या मैदानात महाराष्ट्रातील सर्वात उंच आणि मोठ्या रावण दहन सोहळ्यास थोड्याच वेळात प्रारंभ होणार आहे. या सोहळ्याचे संपूर्ण LIVE प्रेक्षपण पहा फक्त Jamkhed Times वर.
स्वराज्य ध्वजाच्या साक्षीने महाराष्ट्रातील सर्वात उंच रावण दहन कार्यक्रमाचे खर्डा येथील शिवपट्टन किल्यासमोर आयोजन करण्यात आले आहे. 75 फुट उंच रावणाचे दहन होणार आहे. या सोहळ्यासाठी छत्रपती संभाजी महाराजांसह रामायण मालिकेतील कलाकार तसेच प्रसिद्ध क्रिकेटपट्टू केदार जाधव उपस्थित राहणार आहेत. हा भव्य-दिव्य सोहळ्यास थोड्याच वेळात सुरूवात होणार आहे.
महागाई, भ्रष्टाचार, बेरोजगारी, स्त्री असुरक्षा, जाती-धर्म भेद, बालमजुरी, शेतकरी आत्महत्या, पर्यावरण नाश, अवैज्ञानिकता, दारिद्रय या दहा महत्त्वाच्या समस्येतून नागरिकांची सुटका व्हावी यासाठी दहा तोंड असलेल्या रावणाच्या प्रतिकृतीचे खर्डा किल्ल्याच्या मैदानात दहन केले जाणार आहे.
जामखेड तालुक्यात पहिल्यांदाच भव्य-दिव्य स्वरूपात रावण दहन सोहळा पार पडत आहे. या सोहळ्याचे प्रमुख आकर्षण रामायण मालिकेतील राम, सीता, लक्ष्मणाची भूमिका साकारणारे कलाकार असणार आहेत. या कलाकारांना प्रत्यक्ष पाहण्यासाठी नागरिकांची उत्सुकता शिगेला पोहचली आहे.