Mahendra More Chalisgaon : चाळीसगाव गोळीबार प्रकरणातील जखमी माजी नगरसेवक महेंद्र मोरे यांचा उपचारादरम्यान मृत्यू !
जामखेड टाइम्स वृत्तसेवा : Mahendra More Chalisgaon : महाराष्ट्रात सरता पंधरवडा गोळीबाराच्या घटनांनी गाजला. या काळात मुंबई, ठाणे, चाळीसगाव येथे तीन मोठ्या राजकीय नेत्यांवर गोळीबार (Shooting at 3 political leaders in maharashtra) करण्यात आले. या घटनांमध्ये दोन राजकीय नेत्यांचा बळी गेला आहे. मृतांमध्ये ठाकरे गटासह भाजपच्या एका-एका माजी नगरसेवकांचा समावेश आहे.तर कल्याण मधील शिवसेना शिंदे गटाचा शहर प्रमुख जखमी असून तो उपचार घेत आहे. महाराष्ट्रात राजकीय नेत्यांवर गोळीबार करण्याच्या घटना वाढल्याचे राज्याचे राजकारण चांगलेच तापले आहे. विरोधकांकडून सत्ताधारी गटाविरोधात टीकेची झोड उठवली जात आहे.
भाजप आमदार गणपत गायकवाड (Ganpat Gaikwad mla) यांनी शिवसेना शहर प्रमुख महेश गायकवाड (Mahesh Gaikwad) यांच्यावर पोलिस ठाण्यात गोळीबार केल्याची घटना ताजी असतानाच चाळीसगावमध्ये भाजपचे माजी नगरसेवक महेंद्र मोरे (Mahendra More) यांच्यावर अज्ञात टोळक्याने अंदाधुंद गोळीबार केला होता. ही घटना घडून 24 तास उलटत नाही तोच मुंबईतील दहिसर भागात शिवसेना ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर (Abhishek ghosalkar) यांच्यावर गोळीबार करण्यात आला. या घटनेत घोसाळकर यांचा मृत्यू झाला. गोळीबारानंतर उपचार घेत अलेले जखमी महेंद्र मोरे यांच्या प्रकृती विषयी आता मोठी बातमी समोर आली आहे. (Mahendra More health update)
चाळीसगाव येथील भाजपचे नगरसेवक महेंद्र मोरे (Mahendra More death news) यांचा उपचारादरम्यान शुक्रवारी मध्यरात्री मृत्यू झाला आहे. त्यांच्यावर नाशिक येथील अशोक हाॅस्पीटलमध्ये (Ashok Hospital Nashik) उपचार सुरु होते. गोळीबारात ते गंभीररित्या जखमी झाले होते. ते उपचारांना साथ देत नव्हते, अखेर उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्यावर 7 फेब्रुवारी रोजी प्राणघातक हल्ला झाला होता.
चाळीसगाव शहरातील हनुमानवाडी (Hanumanwadi Chalisgaon) येथे माजी नगरसेवक महेंद्र गायकवाड यांच्यावर गोळीबार झाला होता. गायकवाड हे कार्यालयात बसलेले असतानाच त्यांच्यावर अंदाधुंद गोळीबार करण्यात आला होता.या घटनेत पोलिसांनी 7 जणांविरोधात गुन्हे दाखल केले आहेत.आरोपींनी वापरलेली गाडी पोलिसांनी जप्त केली आहे, मात्र अद्याप आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश आले नाही.
राज्यात गोळीबाराच्या घटनांमध्ये वाढ झाल्याने जनतेत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. महाराष्ट्राची वाटचाल यूपी- बिहार च्या दिशेने तर झाली नाही ना? अशी चिंता आता व्यक्त केली जात आहे.
कोण होते महेंद्र मोरे ?
महेंद्र मोरे हे चाळीसगाव शहरातील भाजपचे माजी नगरसेवक आहेत. त्यांच्यावर 7 फेब्रुवारी रोजी गोळीबार करण्यात आला होता. उपचारादरम्यान शुक्रवारी मध्यरात्री त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूच्या बातमीने जळगाव जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे