Mahindra Thorve latest news : नेरळ मारहाण घटनेवर आमदार महेंद्र थोरवेंची पहिली प्रतिक्रिया आली समोर, थोरवे यांनी ठाकरे गटावर केले गंभीर आरोप
Mahindra Thorve latest news : शिवसेना ठाकरे गटाने नेरळ येथे झालेल्या मारहाणीच्या घटनेबाबात जारी केलेल्या व्हिडीओमध्ये कारमध्ये बसलेल्या एका व्यक्तीला राॅडच्या सहाय्याने एक व्यक्ती बेदम करत असल्याचे दिसत आहे. मारहाण करणारा हा व्यक्ती आमदार महेंद्र थोरवे यांचा अंगरक्षक असल्याचा दावा ठाकरे गटाने केला आहे. ठाकरे गटाकडून हा व्हिडीओ जारी होताच राज्याच्या राजकारणात आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्या आहेत. या घटनेवर आमदार महेंद्र थोरवे यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.
ठाकरे गटाने पोस्ट केलेल्या व्हिडीओमध्ये भर रस्त्यात एका व्यक्तीला लोखंडी रॉडने मारहाण करण्यात आल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. एक तरुण चारचाकी गाडीत बसलेल्या व्यक्तीला अतिशय अमानुषपणे मारहाण करत आहे. मारहाण होत असलेल्या व्यक्तीची लहान मुलं, पत्नी मारु नका अशा याचना करत होत्या. मात्र हल्लेखोराने कोणाचेच ऐकलं नाही आणि मारहाण सुरु ठेवली. मारहाण करणारी व्यक्ती आमदारा महेंद्र थोरवे यांचा सुरक्षारक्षक शिवा असल्याचा आरोप ठाकरे गटाने केला आहे. आता या सगळ्या प्रकरणावर आमदार महेंद्र थोरवे यांनी भाष्य केलं आहे. (Mahindra Thorve latest news)
“नेरळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत जी काही मारहाणीची घटना झाली त्या घटनेचे आम्ही कधीच समर्थन करणार नाही. त्याच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईलच. ठाकरे गटाकडून वारंवार सांगितलं जात आहे की, मारहाण करणारा महेंद्र थोरवेंचा बॉडीगार्ड आहे. मारहाण करणारी व्यक्ती माझा बॉडीगार्ड नाही. त्याच्याशी माझा काहीही संबंध नाही. दोन्ही कार्यकर्ते माझेच आहेत. उलट ज्या व्यक्तीला मारहाण झाली तो माझा नातेवाईक आहे. तो ठाकरे गटाचा नाही. मला जाणीवपूर्वक बदनाम करण्यासाठी ठाकरे गटाने हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल केला आहे,” असं महेंद्र थोरवे यांनी म्हटलं आहे. (Mahindra Thorve latest news)
मारहाण करणाऱ्याशी माझा काही संबंध नाही – महेंद्र थोरवे (Mahindra Thorve latest news)
मारहाण करणारा आणि मार खाणारा दोघंही आपल्या पक्षाचे कार्यकर्ते असल्याची कबुली थोरवे यांनी दिली आहे. “दोघांमध्ये काय मतभेद झाले याची मला कल्पना नाही. याची माहिती मी घेत आहे. मारहाण करणाऱ्याशी माझा काही संबंध नाही. मी पोलीस ठाण्यात त्याला कारवाई करुन अटक करण्यास सांगितले आहे,” असेही महेंद्र थोरवे यांनी म्हटलं. (Mahindra Thorve latest news)