Mahindra Thorve Latest News : आमदार महेंद्र थोरवे यांच्या अंगरक्षकाचा भर रस्त्यात तुफान राडा, राज्याचं राजकारण तापले
Mahindra Thorve latest news : शिवसेना ठाकरे गटाने शेअर केलेल्या एका व्हिडिओमुळे राज्याचं राजकारण चांगलं तापलं आहे. शिवसेनेने जारी केलेला हा व्हिडिओ कर्जतमधील नेरळ येथील आहे. या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती कारमध्ये बसलेल्या एका व्यक्तीला राॅडच्या सहाय्याने बेदम करत असल्याचे दिसत आहे. मारहाण करणारा हा व्यक्ती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाचे आमदार महेंद्र थोरवे यांचा अंगरक्षक असल्याचे बोलले जात आहे. सत्ताधारी पक्षाच्या आमदाराचा अंगरक्षक एका व्यक्तीला बेदम करत असल्याचे समोर आल्याने राज्याचं राजकारण चांगलेच तापले आहे.
शिवसेना उध्दव ठाकरे गटाने सोशल मीडियावर जारी केलेल्या या व्हिडीओला कॅप्शन लिहिताना म्हटले आहे की, महाराष्ट्रात गुंडाराज! मिंधेंच्या आमदाराच्या, महेंद्र थोरवे ह्यांच्या ‘शिवा’ नावाच्या बॉडीगार्डने नेरळ येथे भर दिवसा, भर रस्त्यात एका व्यक्तीला मारहाण केली. त्या व्यक्तीची बायका मुलं रडत होती, पण कोणी मदतीला यायची हिम्मत केली नाही.
कायद्याच्या चिंधड्या, लोकांचे हाल! ही फक्त कर्जतची अवस्था नाही, राज्यभरात गुंडगिरी वाढलीये! कायदा-सुव्यवस्थेची वाट लागलीये! कारण, गुंडांचा म्होरक्याच बेकायदेशीरपणे मुख्यमंत्रीपदावर बसलाय, असे या ट्विटमध्ये म्हटले आहे.