Malaika Arora Father news : अभिनेत्री मलायका अरोराच्या वडिलांनी उचलले टोकाचे पाऊल, इमारतीवरून उडी मारून केली आत्महत्या

Malaika Arora Father news : बॉलीवूड अभिनेत्री मलायका आरोराच्या वडिलांनी (Anil Arora) इमारतीवरून उडी मारून आत्महत्या (suicide) केल्याची घटना घडली आहे. वांद्रे येथे ही घटना घडली आहे. या घटनेने बाॅलीवूडमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.

Anil arora malaika father, Malaika arora father, anil arora Sucied, malaika arora father news, malaika arora father latest news, anil arora, anil arora news today,  Malaika Arora Father news, Actress Malaika Arora's father committed suicide by jumping from a building, Anil Arora latest news,

मलायकाचे वडिल अनिल आरोरा यांनी बुधवारी सकाळी ९ च्या सुमारास वांद्रे येथील आलमेडा पार्क इथल्या इमारतीच्या ६ व्या मजल्यावरून उडी मारत आत्महत्या केली. आत्महत्येचे कारण अद्याप समोर आलेलं नाही. घटनेची माहिती मिळताच बांद्रा पोलिस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी या घटनेचा वेगाने तपास सुरू केला आहे. (Malaika Arora Father news)

मलायकाचे वडील अनिल अरोरा यांनी बुधवारी सकाळी आत्महत्या केली.आत्महत्येमागचं कारण अद्याप समोर आलेलं नाही.अनिल अरोरा यांच्या आत्महत्येच्या घटनेनंतर मलायकाचा घटस्फोटीत पती अरबाज खान कुटुंबियांसह बांद्र्यातील मलायकाच्या घरी पोहोचला आहे. अनिल अरोरा यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. (Malaika Arora Father news)

अरबाज खान घटनास्थळी पोहोचला

अनिल अरोरा यांच्या आत्महत्येच्या घटनेनंतरच अरबाज खान वांद्र्यातील त्यांच्या घरी दाखल झाला होता. अरबाज खान सकाळी मलायका अरोराच्या घरी गेल्यानं चर्चा उलटसुलट चर्चा सुरू होत्या. अनिल अरोरा यांच्या आत्महत्येची माहिती मिळताच तो कुटुंबियांसह तिथं दाखल झाला. (Malaika Arora Father news)

मलायका पुण्याहून मुंबईला रवाना (Malaika Arora Father news)

मलायका अरोरा सध्या मुंबईत नसून ती कामानिमित्त पुण्याला गेली होती. ती पुण्याहून मुंबईला रवाना झाली आहे. अनिल अरोरा यांचा मृतदेह बांद्र्यातील बाबा रुग्णालयात ठेवण्यात आला आहे. अनिल अरोरा आणि जॉयस पॉलीकार्प यांचा जवळपास चाळीस वर्षांपूर्वी घटस्फोट झाला होता. त्यावेळी मलायका अवघ्या ११ वर्षांची होती. घटस्फोटानंतर मलायका आणि तिची लहान बहीण अमृता या दोघीही आईसोबत राहत होत्या. (Malaika Arora Father news)

एका मुलाखतीत मलायका अरोराने वडिलांबद्दल बोलताना सांगितलं होतं की, माझे आई-बाबा मी ११ वर्षांचे असताना वेगळे झाले. माझं बालपण खूप सुंदर होतं पण ते सोपं नव्हतं. ते दोघे वेगळे झाल्यानं आईकडे पाहण्याचा वेगळा आणि नवा दृष्टिकोन मिळाला. (Malaika Arora Father news)