Manmohan Singh Gopinath Munde : मनमोहन सिंग यांच्या त्या भूमिकेमुळे महाराष्ट्रात होणारा मोठा राजकीय भूकंप टळला, पण कसा ? वाचा

Manmohan Singh Gopinath Munde : सत्ता हस्तगत करणे असो की, सत्ता टिकवून ठेवणे, यासाठी पक्ष फोडाफोडी, पक्षांतर, आयाराम गयाराम ही राजकीय संस्कृती अलिकडच्या काळात प्रचंड वाढली आहे. रात्रीतून पक्ष बदलण्याचा नवा ट्रेंड निर्माण झाला आहे. याला कुठलाच पक्ष अपवाद नाही. पण महाराष्ट्राच्या राजकारणात घडू पाहणारा एक मोठा भूकंप तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी घेतलेल्या एका भूमिकेमुळे टळला होता. जाणून घेऊयात याच घटनेबद्दल!

Manmohan Singh Gopinath Munde, Due to Manmohan Singh's role the political earthquake in Maharashtra was avoided but how? Read on,

सलग १० वर्षे देशाचे पंतप्रधानपद भूषवणारे, महान अर्थतज्ञ, माजी पंतप्रधान डाॅ मनमोहन सिंग यांचे २६ डिसेंबर २०२४ रोजी रात्री ९ .५१ वाजता निधन झाले. मुल्य आधारित राजकारण व्हावे यासाठी डाॅ मनमोहन सिंग हे नेहमी आग्रही असायचे. याच भूमिकेमुळे भाजपातील मोठ्या नेत्याचा काँग्रेस प्रवेश त्यांनी रोखला होता.

महाराष्ट्र भाजपचा मुख्य चेहरा असलेले तथा लोकसभेचे तत्कालीन उपनेते स्वर्गीय गोपीनाथ मुंडे हे भाजपात नाराज आणि अस्वस्थ होते. मुंडे हे काँग्रेसच्या वाटेवर होते. काँग्रेसच्या नेत्यांनी मुंडे यांच्या पक्ष प्रवेशाची संपूर्ण तयारी केली होती. गोपीनाथ मुंडे हे महाराष्ट्र भाजपात मोठा राजकीय भूकंप घडवण्याच्या तयारीत होते.मुंडे यांच्यासोबत महाराष्ट्रातील अनेक आमदार काँग्रेसमध्ये प्रवेश करणार होते.

गोपीनाथ मुंडे यांच्या पक्षप्रवेशाची कल्पना काँग्रेसने पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी दिली होती. भाजपचा उपनेता आपल्या पक्षात प्रवेश करतोय हे समजताच सिंग यांनी या प्रवेशाला कडाडून विरोध दर्शवला.मी पंतप्रधान लोकसभेमधील भाजपच्या उपनेत्याला पक्षप्रवेश दिलेला मला चालणार नाही. अशा पद्धतीने पक्ष फोडायचा नसतो, असे ठणकावून सांगून गोपीनाथ मुंडेंचा पक्षप्रवेश रोखला.

पंतप्रधान मनमोहन सिंग हे शांत संयमी मितभाषी म्हणून ओळखले जात होते. मुल्य आधारित राजकारण ही त्यांची खास ओळख होती. लोकसभेतील उपनेत्याला आपल्या पक्षात घेतल्यास यातून चुकीचा पायंडा पडेल. देशात आणि जगात चुकीचा संदेश जाईल, हे होऊ नये याकरिता मनमोहन सिंग यांनी मुंडे यांचा पक्ष प्रवेश रोखला.राजकीय फायद्यासाठी विरोधी पक्ष कमजोर, खिळखिळा करण्याची संधी असतानाही सिंग यांनी याकडे दुर्लक्ष केले. विरोधी पक्षाचा अवमान होऊ नये याची काळजी घेतली. याच कारणामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात होऊ घातलेला मोठा राजकीय भूकंप टळला.