Manoj Jarange Patil : 14 वर्षांचा संघर्ष आणि ऐतिहासिक विजय, असा होता मनोज जरांगे पाटील यांचा 14 वर्षांचा संघर्षाचा प्रवास, जाणून घ्या सविस्तर !

मुंबई : Manoj Jarange Patil : मराठा समाजाला आरक्षण मिळावे (Maratha Reservation) या मागणीसाठी मराठा संघर्षयोध्दा मनोज जरांगे पाटील हे गेल्या 14 वर्षांपासून रस्त्यावरची लढाई लढत आले आहेत. विविध अंदोलने, उपोषणे या माध्यमांतून त्यांनी आरक्षणाचा मुद्दा महाराष्ट्रात (Maharashtra) तेवत ठेवला. विशेषता: गोदाकाठच्या गावांमध्ये आणि संपूर्ण मराठवाड्यात त्यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर संघटन बांधणी करत जनजागृती हाती घेतली होती. 14 वर्षांचा आरक्षणाच्या लढाईच्या संघर्षाचा वनवास संपवून मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी आज 27 जानेवारी 2024 रोजी ऐतिहासिक विजय मिळवला आणि मराठा समाजाच्या पदरात आरक्षण पाडून घेतले. सरकारने अध्यादेश जारी करताच मराठा समाजाने गुलालाची उधळण करत जल्लोष साजरा केला.

Manoj Jarange Patil achieved historic victory by ending exile of 14 years of struggle, how was  journey of 14 years manoj jarange patil? Know in detail

मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांचा प्रदीर्घ लढा आज संपला. मराठा आरक्षण आंदोलनाचा 14 वर्षांचा वनवास संपला. समाजासाठी सर्वस्व देणारे मनोज जरांगे पाटील यांच्या पदरात आरक्षण मिळाले. मराठा समाजासाठी 2011 पासून सुरु केलेल्या आंदोलनाला अखेर 2024 मध्ये यश आले. समाजातील सर्वसामान्य व्यक्ती ते मराठा आरक्षणाचे नेते असा मनोज जरांगे पाटील यांचा प्रवास संघर्षमय होता. या प्रवासातील शेवटचे आंदोलन करताना मनोज जरांगे पाटील कमालीचे भावूक झाले होते. 20 जानेवारी रोजी अंतरवली सराटी (Antarvali Sarati) येथून निघताना त्यांना आपले आश्रू रोखता आले नव्हते.

मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी 2011 पासून मराठा समाजासाठी काम करण्यास सुरुवात केली. आरक्षणाच्या चळवळीत ते 2011 मध्ये सक्रिय झाले. अवघ्या तीन वर्षांत ते आरक्षण आंदोलनाचे नेतृत्व करु लागले. त्यांनी 2014 मध्ये छत्रपती संभाजीनगर येथे विभागीय आयुक्तालयावर मोर्चा काढला. हा मोर्चा लक्षवेधक ठरला. त्यानंतर 2015 ते 2024 या काळात त्यांनी 30 हून अधिक आंदोलने केली.

मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) बीड जिल्ह्यातील मोतोरी या गावातील रहिवाशी आहेत. त्यांनी बीडमधून जालनाकडे आपला मुक्कम हलवला. त्यांच्या घराची परिस्थिती सामान्य होती. यामुळे उपजिविकेसाठी त्यांनी हॉटेलमध्ये काम सुरु केले. परंतु समाजासाठी काम करायचे त्यांनी ठरवले आणि कुटुंबकडे दुर्लक्ष करत मराठा आंदोलनात सहभागी झाले. मराठा आंदोलन उभारण्यासाठी त्यांनी स्वत:च्या जमीन विकली. मराठा समाजाच्या आरक्षणासाठी अनेक मोर्चे काढले. आमरण उपोषणे केली. रास्ता रोको आंदोलन केले. त्यामुळे मनोज जरांगे पाटील हे नाव संपूर्ण मराठवाड्यात पसरले.

Manoj Jarange Patil : शिवबा संघटनेची स्थापना

मनोज जरांगे यांनी शिवबा संघटनेची स्थापना केली. जालनामधील साष्ट पिंपळगाव येथे तब्बल 90 दिवस ठिय्या आंदोलन केले होते. त्यावेळी सहा दिवस उपोषणही केले. मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी काँग्रेसचे काम केले होते. परंतु राजकीय वातावरणात ते रमले नाहीत. त्यानंतर त्यांनी सामाजिक चळवळीत काम करण्यास सुरुवात केली. मराठा आरक्षणावर त्यांनी शिवबा संघटनेच्या माध्यमांतून काम हाती घेतले होते.

मनोज जरांगे पाटील यांनी 29 ऑगस्ट 2023 पासून जालना जिल्ह्यातील अंतरवली सराटी गावात मराठा आरक्षणासाठी उपोषण सुरु केले होते. 1 सप्टेंबर रोजी त्यांचे उपोषण सोडण्यासाठी बळाचा वापर झाला. यावेळी प्रचंड गोंधळ झाला. पोलिसांनी लाठीचार्ज केला. त्यात अनेक जण जखमी झाले. त्यानंतर राज्याचे नव्हे तर देशाचे लक्ष मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्याकडे लागले. तेव्हापासून मनोज जरांगे पाटील आणि अंतरवली सराटी हे गाव मराठा आरक्षणाचे केंद्रबिंदू बनले.

अंतरवली सराटी गावातील अंदोलनामुळे देशभर प्रकाशझोतात आलेल्या मनोज जरांगे पाटील यांनी दाखवलेला प्रामाणिकपणा, पारदर्शकता तसेच समाजाप्रति असलेली तळमळ पाहून महाराष्ट्रातील मराठा समाज जरांगे यांच्या बाजूने एकवटला. त्यानंतर राज्यातील गरजवंत मराठ्यांचे सामाजिक नेतृत्व मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्याकडे आले.

अंतरवली सराटी गावातील उपोषण सुटल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी महाराष्ट्रात दौरा काढला. त्यांच्या दौर्‍याला महाराष्ट्रातील जनतेने अभूतपूर्व असा तुफान प्रतिसाद दिला. त्यांच्या सभेसाठी जनता उत्स्फूर्तपणे सहभागी होत होती. विशेष म्हणजे जरांगे पाटील यांच्या सभा पहाटे पर्यंत चालल्या. जरांगे पाटील यांचे विचार ऐकण्यासाठी तहान भूक, वेळ काळ विसरून जनता त्यांच्या आगमनाची वाट पाहत असल्याचे दृश्य संपुर्ण देशाने पाहिले. या सर्व घडामोडीतून मराठा आरक्षणाच्या अंदोलनाला धार आली. या दौर्‍यानंतर जरांगे पाटलांनी अंतरवली सराटी गावात बोलवलेली सभा देशाच्या इतिहासातील गर्दीचे सर्व रेकॉर्ड मोडणारी ठरली. या सभेत त्यांनी केलेल्या मागण्या मान्य झाल्यामुळे त्यांनी मुंबईत अंदोलन करण्याची घोषणा केली होती. (Manoj Jarange Patil)

त्यानुसार, 20 जानेवारी 2024 रोजी लाखो समाजबांधवांसह त्यांनी अंतरवली सराटी येथून मुंबईच्या दिशेने कुच केली होती. लाखोंचा जनसागर सोबतीला घेऊन मराठा योध्दा मुंबईच्या दिशेने निघालेला दिसताच राज्य सरकार खडबडून जागे झाले. सरकारने जरांगे पाटलांची मुंबईत धडकू नये यासाठी चर्चेच्या फेरी सुरु केल्या. शुक्रवारी मध्यरात्री नवी मुंबईतील वाशीत मनोज जरांगे पाटील आणि सरकारच्या शिष्टमंडळ यांच्यात यशस्वी बोलणी झाली. जरांगे पाटील यांनी केलेल्या सर्व मागण्या सरकारने मान्य केल्या. आज 27 जानेवारीला मुख्यमंत्रि एकनाथ शिंदे व मंत्रिमंडळातील इतर सहकाऱ्यांनी वाशी येथे मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. मराठा आरक्षणासंबंधीचा अध्यादेश जरांगे पाटील यांना सोपवला. (Manoj Jarange Patil)

सन 2011 पासून मराठा आरक्षणासाठी वेगवेगळ्या मार्गाने अंदोलन करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांना 2024 ला मराठा आरक्षणाचा लढा जिंकण्यात यश आले. मनोज जरांगे पाटील यांचा गेल्या 14 वर्षांपासून सुरु असलेला संघर्षाचा वनवास अखेर संपला. सरकारने मराठा आरक्षणासंदर्भात महत्वपूर्ण पाऊल उचलले आहे. यामुळे महाराष्ट्रातील मराठा समाजाने जल्लोष केला आहे. गावागावात विजयी जल्लोष साजरा केला जात आहे. (Manoj Jarange Patil)

शितल कलेक्शन जामखेड