कर्जत जामखेड मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांसह आमदार प्रा.राम शिंदे यांनी घेतली मनोज जरांगे पाटील यांची भेट !

जामखेड : 10 सप्टेंबर 2023 : तुमच्या आमच्या हक्कासाठी, न्यायासाठी आणि भविष्यासाठी मनोज जरांगे पाटलांनी लोकशाही पध्दतीनं उपोषणाचे अंदोलन हाती घेतलं आहे. या अंदोलनातून त्यांनी शासनाचं प्रशासनाचं, राज्यकर्त्यांचं लक्ष वेधलयं, म्हणूनच सरकार त्यांच्या म्हणण्याला वारंवार दाद देतयं, झुकतयं म्हणलं तरी वावगं ठरणार नाही. मनोज जरांगे पाटील हे आपल्या मागण्यांवर ठाम आहेत. त्यांनी हाती घेतलेल्या लढ्याला पाठिंबा देण्यासाठी मी व माझ्या कर्जत-जामखेड मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांनी आज (9 रोजी) त्यांची भेट घेतली आणि त्यांच्या अंदोलनाला पाठिंबा दिला, असे प्रतिपादन आमदार प्रा.राम शिंदे यांनी केले.

Manoj Jarange Patil has raised fight for your and our rights, for justice, for future, MLA Ram Shinde met Manoj Jarange Patil along with office bearers of Karjat-Jamkhed Constituency,

मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी जालन्यामधील आंतरवाली सराटी गावात मनोज जरांगे पाटील यांचे उपोषणाचे अंदोलन सुरु आहे.आमदार प्रा.राम शिंदे यांनी कर्जत-जामखेड मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांसह 9 सप्टेंबर 2023 रोजी रात्री उशिरा आंतरवाली सराटी गावाला भेट दिली. या भेटीत आमदार प्रा राम शिंदे व पदाधिकाऱ्यांनी मनोज जरांगे पाटील यांच्याशी संवाद साधत त्यांच्या अंदोलनास पाठिंबा दिला. यावेळी आमदार प्रा.राम शिंदे यांनी उपस्थितांशी संवाद साधला.

Manoj Jarange Patil has raised fight for your and our rights, for justice, for future, MLA Ram Shinde met Manoj Jarange Patil along with office bearers of Karjat-Jamkhed Constituency,

आमदार राम शिंदे म्हणाले की, श्रीमंताचे श्रीमंत झाले, गरिबांचे गरिब झाले आणि म्हणून गरिबांच्या हक्कासाठी, न्यायासाठी मनोज जरांगे पाटील यांनी जो लढा उभारलाय त्याकडे संपुर्ण महाराष्ट्राचं नव्हे तर देशाचे लक्ष लागलं आहे. आपल्या सर्वांचा त्यांना जो पाठिंबा मिळतोय त्याच्यातूनच त्यांना ऊर्जा मिळत आहे.मराठा समाजातील होतकरू मुलांना देखील आरक्षणाच्या सवलतीचा फायदा मिळाला पाहिजे. मनोज जरांगे पाटील यांची जी मागणी आहे ती रास्त आहे. रास्त मागणीला जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत ते आपल्या मागणीवर ठाम आहेत. मी आणि सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांनी सांगितलं त्यांच्या अंदोलनाला पाठिंबा दिला पाहिजे. त्यानुसार त्यांची भेट घेतली आणि त्यांच्या अंदोलनास पाठिंबा दिला, असे आमदार प्रा.राम शिंदे म्हणाले.

Manoj Jarange Patil has raised fight for your and our rights, for justice, for future, MLA Ram Shinde met Manoj Jarange Patil along with office bearers of Karjat-Jamkhed Constituency,

मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील हे गेल्या 12 दिवसांपासून उपोषण करत आहेत. त्यांनी हाती घेतलेल्या अंदोलनास कर्जत-जामखेड मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसह आमदार प्रा.राम शिंदे यांनी 9 सप्टेंबर 2023 रोजी रात्री मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली आणि पाठिंबा दिला.

Manoj Jarange Patil has raised fight for your and our rights, for justice, for future, MLA Ram Shinde met Manoj Jarange Patil along with office bearers of Karjat-Jamkhed Constituency,

यावेळी माजी सभापती डाॅ भगवान मुरुमकर, बाजार समितीचे सभापती शरद कार्ले, माजी जिल्हा परिषद सदस्य सोमनाथ पाचरणे, भाजपाचे जिल्हा सरचिटणीस पांडूरंग उबाळे, भाजपा शहराध्यक्ष बिभीषण धनवडे, तालुका सरचिटणीस लहू शिंदे, बापुराव ढवळे, बाजार समितीचे संचालक सचिन घुमरे, वैजीनाथ पाटील, नगरसेवक अमित चिंतामणी, ॲड प्रविण सानप, चेअरमन अशोक महारनवर, राहूल चोरगे, सह आदी उपस्थित होते.

मनोज जरांगे पाटील काय म्हणाले ?

दरम्यान, आमदार प्रा.राम शिंदे यांनी उपस्थितांशी संवाद साधल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनीही उपस्थितांशी संवाद साधला. यावेळी बोलताना जरांगे पाटील म्हणाले की, राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचे वंशज आमदार प्रा.राम शिंदे यांनी आपल्या आमरण उपोषणाला पाठिंबा दिलाय. आज तुम्ही आशिर्वाद दिला आणि आम्हाला पाठबळ दिलं. त्यामुळे आम्ही शंभर टक्के आरक्षण मिळवल्याशिवाय राहणार नाही, असे उद्गार यावेळी जरांगे पाटील यांनी काढले.

सामान्य मराठा समाज असेल किंवा सामान्य धनगर समाज असेल, आरक्षणचं हा आमच्या दोघांचाही मुळ प्रश्न आहे. श्रीमंत धनगर बांधवाचा नाही आणि श्रीमंत मराठ्यांचाही नाही. आम्हा गोरगरिबांना तुम्ही श्रीमंतांनी जर पाठिंबा दिला तर आमच्या दोन्ही जमाती नक्कीच गोरगरीबीतून श्रीमंत होतील, अशी भूमिका यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी मांडली.