Mansoon Update Today । अखेर मान्सूनच्या आगमनाची प्रतीक्षा संपली, मान्सूनचे कोकणात आगमन, येत्या ४८ तासांत मान्सून महाराष्ट्रात दाखल होणार
जामखेड टाइम्स वृत्तसेवा : महाराष्ट्रात मान्सून कधी दाखल होणार याची प्रतिक्षा अवघ्या महाराष्ट्राला लागली होती. अखेर मान्सूनच्या आगमनाची प्रतीक्षा आता संपली असून हवामान विभागाने मान्सून संबंधी एक महत्त्वाची माहिती जारी केली आहे. ( mansoon update today, wait for arrival of monsoon is over, monsoon arrives in Konkan, monsoon will reach Maharashtra in next 48 hours)
राज्यात मान्सून लांबणीवर पडणार अशी चर्चा गेल्या काही दिवसापासून रंगली होती, या सर्व चर्चांना आता पूर्णविराम मिळाला आहे. कारण आज 10 जून रोजी मान्सूनने तळकोकणात धडक मारत महाराष्ट्रात प्रवेश केला आहे.
मान्सूनचा महाराष्ट्रातील प्रवास तळकोकणातून सुरू झाला आहे. मान्सूनने गोव्यासळ वेंगुर्ल्यापर्यंत धडक मारली आहे यामुळे या भागात पावसाचा जोर वाढणार आहे.अशी माहिती हवामान विभागाने जारी केली आहे.
हवामान विभागाने वर्तवला अंदाजानुसार मान्सून कोणताही विलंब न लावता प्रवास करत आहे, त्यामुळे तो येत्या दोन दिवसात तो संपूर्ण महाराष्ट्रात पोहोचणार आहे. त्यानंतरच्या दोन दिवसात तो संपूर्ण मुंबईचा भाग व्यापेल असेही हवामान खात्याकडून सांगण्यात आले.
राज्यात मान्सून वारे वाहू लागले आहेत, यामुळे मान्सूनला पोषक असलेले ढग तयार होत आहेत. येत्या 48 तासात संपूर्ण महाराष्ट्रात मान्सून दाखल होईल असे वरिष्ठ IMD शास्त्रज्ञ आर के जेनामानी यांनी सांगितले.
दरम्यान आज जामखेड तालुक्यात दुपारपासून पांढऱ्या ढगांची रेलचेल आहे. मान्सूनपूर्व पाऊस तालुक्यात होण्याची शक्यता दिसत आहे. आकाशात ढगांची गर्दी झाल्याने शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण आहे.