जामखेड टाईम्स वृत्तसेवा । Heatstroke in Maharashtra । राज्यात उष्णतेने हाहाकार माजवण्यास सुरूवात केली आहे. अनेक भागातील तापमान 41 अंश सेल्सियसवर जाऊन पोहचले आहे. उष्णतेची लाट अनेकांच्या जीवावर उठली आहे. उस्मानाबादमध्ये एका शेतकऱ्याचा उष्माघातामुळे मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. राज्यात उष्माघाताने मृत्यू झालेल्यांची संख्या आता तीन झाली आहे. (3 Farmer Dies due to Heatstroke in Maharashtra)
उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब तालुक्यात उष्माघातामुळे एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला आहे. लिंबराज सुकाळे असं या मृत शेतकऱ्याचं नाव असून ते 50 वर्षांचे होते. लिंबराज सुकाळे हे शेतातील कडबा बांधून झाल्यावर तहान लागल्याने गडबडीत पाणी पिले, पाणी पित असतानाच उष्माघातामुळे शेतातच त्यांचा मृत्यू झाला. (farmer dies of heatstroke in Osmanabad district,)
उपचारासाठी त्यांना कळंबमधील शासकीय रुग्णालयात घेऊन जाण्यात आले मात्र त्यांना मृत घोषित करण्यात आलं. उष्माघातामुळे त्यांचा मृत्यू झाला असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. ही घटना कळंब तालुक्यातील हसेगाव येथील आहे. उष्माघातामुळे मृत्यू झाल्याची ही उस्मानाबादमधील यंदाची पहिलीच घटना आहे (third victim of heatstroke in Maharashtra)
उष्माघामुळे मृत्यू झाल्याची पहिली घटना
जळगावमध्ये एका शेतकऱ्याचा उष्णाघाताने मृत्यू झाला होता. जितेंद्र संजय माळी असं उष्माघाताने मृत्यू झालेल्या 33 वर्षीय शेतकऱ्याचं नाव आहे. ते जळगाव जिल्ह्याच्या अमळनेर तालुक्यातील मांडळ येथील रहिवासी होते. घटनेच्या दिवशी माळी यांनी दुपारपर्यंत रस्त्यावर खमंग विकले होते. त्यानंतर भर उन्हात शेतातील काम केलं होतं. शेतातून काम करून घरी येत असताना उष्माघातामुळे त्यांचा मृत्यू झाला.
अकोला जिल्ह्याच्या बार्शीटाकळी तालुक्यात सारकिन्ही येथील एका शेतकऱ्याचा उष्माघाताने मृत्यू झाला. समाधान शामराव शिंदे असं मृत पावलेल्या 50 वर्षीय शेतकऱ्याचं नाव आहे. जळगाव पाठोपाठ राज्यात उष्माघाताचा हा दुसरा बळी होता. त्यानंतर उस्मानाबादमध्ये उष्माघाताचा तिसरा बळी गेला आहे.
अशी घ्या काळजी
राज्यात उष्णतेची लाट सक्रीय आहे. उष्णतेपासून बचावासाठी खबरदारी घेण्याची आवश्यकता आहे. घराबाहेर पडताना गाॅगल, डोक्यावर टोपी, छत्री याचा वापर करणे आवश्यक आहे. शक्यतो दुपारी बारा ते चार या कालावधीत विनाकारण घराबाहेर पडू नये.