जामखेड टाईम्स वृत्तसेवा : beed-news-attack-on-shiv-sena-deputy-district-chief-hanuman-jagtap शिवसेना उपजिल्हाप्रमुखावर जीवघेणा हल्ला झाल्याचा खळबळजनक प्रकार बीडमधून (beed news) समोर आला आहे.बीड- परळी महामार्गावरील घोडका राजुरी परिसरात हा हल्ला झाला आहे.हनुमान जगताप असे जखमी उपजिल्हाप्रमुखाचे नाव आहे. त्यांच्यावर बीड शहरातील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे बीड जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. (Attack on Shiv Sena deputy district chief Hanuman Jagtap)
शिवसेना जिल्हाप्रमुख पैसे कमावण्याच्या नादात पक्षाकडे लक्ष देत नाहीत, अशी तक्रार उपजिल्हाप्रमुख जगताप यांनी थेट मंत्री संदीपान भुमरे यांच्याकडे केली होती. त्यानंतर जगताप यांच्यावर हल्ला झाल्याने हा हल्ला शिवसेनेच्या अंतर्गत वादातून झाला की अन्य कुणी दुसर्याने केला याचा उलगडा मात्र अजुन झालेला नाही.
जखमी उपजिल्हाप्रमुख जगताप म्हणतात
जीवघेण्या हल्ल्याविषयी बोलताना जखमी हनुमान जगताप म्हणाले, की २ दिवसापूर्वी शिवसेना मंत्री संदीपान भुमरे बीडमध्ये (beed news)आले असता, त्यांच्यासमोर मी स्थानिक शिवसेना पदाधिकाऱ्यांसह इतर सत्ताधार्यां विषयी तक्रार केली होती. आणि त्याच्यानंतर मला ही मारहाण करण्यात आली आहे.असा संशय जखमी हनुमान जगताप यांनी व्यक्त केला आहे.
प्रत्यक्षदर्शीचे म्हणणे काय ?
घटनास्थळावर उपस्थित असलेले आणि भांडण सोडणाऱ्या प्रत्यक्षदर्शी सदाशिव किसन सानप यांनी सांगितले की, मारहाण करणारांच्या हातात तलवार होती,सानप हे जखमी हनुमान जगताप यांच्यासोबत गाडीवरती होते.
शिवसेना जिल्हाप्रमुखावर नातेवाईकांचा आरोप
या घटनेनंतर जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल असलेल्या जगताप यांना भेटण्यासाठी आलेल्या (beed news) शिवसेना जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे (Shiv Sena district chief Kundlik Khande) यांना जखमी हनुमान जगताप यांच्या नातेवाईकांच्या रोषास सामोरे जावे लागले. नातेवाईकांनी महाराण प्रकरणात तुम्हीच सहभागी आहात. तुम्हीच हे सगळे काही केले आहे. असा थेट आरोप खांडे यांच्यावर केल्याने रूग्णालय परिसरात मोठा गोंधळ निर्माण झाला होता. जवळपास अर्धा तास हा गोंधळ सुरू होता.
जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडेंनी फेटाळले आरोप
याविषयी शिवसेना जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांनी स्वतःवरील सर्व आरोप फेटाळले आहेत. ते म्हणाले की, यातील आरोपी अद्याप निष्पन्न नाहीत. मात्र, हे सर्व आरोपी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते असून त्यांनीच हनुमान जगताप यांच्यावर हल्ला केला आहे असा आरोप करत त्यांनी राष्ट्रवादीला टार्गेट केले आहे. पुढे बोलताना खांडे म्हणाले आम्ही पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन जगताप यांच्यावर हल्ला करणाऱ्यांविरोधात तात्काळ गुन्हा दाखल करा, आणि आरोपी निष्पन्न करून त्यांना अटक करा. अशी मागणी करणार आहोत. अशी प्रतिक्रिया दिली आहे.