Beggars | racket exposed | मुलांना भिकारी बनवणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश | aurangabad city news
औरंगाबादमधील दोघा मायलेकींना पोलिसांनी ठोकल्या बेड्या
Beggars, racket exposed, aurangabad city news जामखेड टाईम्स वृत्तसेवा | भीक मागण्यासाठी लहान मुलांचा वापर वाढला आहे. गरिबी व असहाय्यतेचा फायदा घेऊन लहान मुलांना भीक मागण्याच्या काळ्या धंद्यात ओढणाऱ्या टोळ्या राज्यात ठिकठिकाणी सक्रीय आहेत.भिकार्यांच्या टोप्या चालवणारे या धंद्यातून माया कमवत आहेत. गोरगरिब कुटूंबातील मुलांना विकत घेऊन भिकारी बनवणाऱ्या एका रॅकेटचा नुकताच पर्दाफाश झाला आहे. मराठवाड्याची राजधानी औरंगाबादेतून हा खळबळजनक प्रकार समोर आला आहे.
औरंगाबाद शहरातील मुकुंदनगर भागातील रामवाडी परिसरातील दोन मायलेकी लहान चिमुकल्यांना लाकडी लाटण्याने मारहाण करत आहेत अशी माहिती स्थानिक सामाजिक कार्यकर्ते देवराज नाथाजी वीर यांना समजली होती. त्यांनी घटनास्थळ गाठत त्या महिन्यांच्या तावडीतून मुलाची सुटका केली व पोलिसांना कळवले.पोलिस येताच चिमुकल्याने मारहाण करणाऱ्या मायलेकींच्या कुकर्माचा पाढा पोलिसांसमोर वाचला. (Beggars, racket exposed, aurangabad city news)
मुकुंदवाडी पोलिसांनी दोन्ही महिलेसह पीडित पाच वर्षीय मुलाला पोलिस ठाण्यात आणले. तेथे बाल संरक्षण कक्षाच्या अधिकारी अॅड. सुप्रिया इंगळे आणि त्यांच्या सहकार्यांनी मुलाची विचारपूस केली. या महिलेने माझ्या मम्मी-पप्पांकडून विकत आणले. भीक मागायला न गेल्यास ती मारते, घरातील कामे सांगते, लाथा-बुक्क्यांनी मारहाण करते, रोज भिक मागायला पाठवायच्या. त्यांना जेवणदेखील दिले जात नव्हते. त्यामुळे पाच वर्षीय मुलगा बाहेर पडायचा आणि कचर्यातील पोळ्या बाजूला काढून खायचा. हा प्रकार गल्लीतील अनेक महिलांनी पाहिला होता. त्याहून काळीज पिळवटून टाकणारा प्रकार म्हणजे, या दोघी आरोपी महिला मुलांना बाथरूमच्या दारात मच्छरांमध्ये झोपायला लावायच्या. त्यांच्याकडून टॉयलेट साफ करून घ्यायच्या माणुसकीला काळिमा फासणारा हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला.(Beggars, racket exposed, aurangabad city news)
मुकुंदवाडी, संजयनगर येथे राहणारे देवराज नाथाजी वीर यांच्या फिर्यादीवरून मुकुंदवाडी पोलिसांनी आरोपी माय-लेकींना अटक केली आहे. मात्र, त्यांनी मुले दत्तक घेतल्याचा दावा केला आहे. जनाबाई उत्तम जाधव आणि सविता संतोष पगारे (दोघी रा. रामनगर, मुकुंदवाडी) अशी आरोपी महिलांची नावे आहेत.
आरोपी महिलांना गुरुवारी न्यायालयात हजर करण्यात आले असता, प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एस. एस. मांजरेकर यांनी दोन्ही महिला आरोपींना पोलिस कोठडी सुनावली आहे. बिंग फुटल्यावर पोलिस निरीक्षक मनोज पगारे आणि समितीने आरोपी सविता पगारे हिची चौकशी केली. तिने सांगितले की, पीडित मुलाला त्याच्या आई-वडिलांकडून ५५ हजारांना विकत घेतले आहे.(Beggars, racket exposed, aurangabad city news)
तसेच जालन्यातील एका दोन वर्षीय मुलाला देखील त्याच्या आई वडिलांकडून एक लाख रुपयांत दत्तक म्हणून विकत घेतले आहे. तसा शंभर रुपयांच्या बाँड पेपर व लेखी करारनामा देखील केला असल्याचे सविताने सांगितले. तर दोन्ही पीडित बालकांना बाल निरीक्षणगृहात दाखल केले आहे.
web title: Beggars racket exposed aurangabad city news