लातूर – जुळ्या भावांमध्ये कमालीचे साम्य असल्याचा गैरफायदा घेत नवीन लग्न होवून घरी आलेल्या भावाच्या पत्नीवर सहा महिने दोघांनीही अत्याचार केल्याचा विचित्र प्रकार लातुरातूू समोर आला आहे.हा प्रकार तब्बल सहा महिन्यानंतर विवाहितेच्या लक्षात आल्यानंतर जुळ्या भावांसह सासू सासऱ्या विरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ही विचित्र घटना शहरातील रिंग रोड परिसरात घडली आहे.
गतवर्षी एका २० वर्षीय तरुणीचा लातुरातील एका तरुणाशी विवाह झाला. त्यानंतर जुळे असल्याचा गैरफायदा घेत पती आणि दिराने तिच्यावर अत्याचार केला. भाऊ असून दोघांमध्ये कमालीचे साम्य आहे. त्यामुळे आपला पती कोणता हे ओळखणे पीडित विवाहितेला जमले नाही. हा प्रकार विवाहितेच्या लक्षात येताच तिने पतीला याची कल्पना दिली असता जे सुरू आहे तु सुरू राहू दे असा सल्ला दिला.
या प्रकाराने वैतागलेल्या विवाहितेने संबंधित प्रकार सासू-सासऱ्यांच्या कानावर घातला असता, हे असेच चालणार आहे. तुला नांदायचे आहे की नाही, असे म्हणत तिलाच दम देण्यात आला. काही दिवसानंतर सदर विवाहिता माहेरी गेली. तिला बोलावण्यासाठी तिचा दीर तिच्याकडे माहेरी गेला. यावेळी तिने सासरी येण्यास नकार दिला.
माहेरच्या लोकांनी तिला सासरी न जाण्याचे कारण विचारल्यानंतर तिने सासरी सुरू असलेला हा प्रकार सांगितला त्यानंतर पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीवरून लातूर येथील शिवाजीनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी दोन्ही जुळ्या भावांना अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू असल्याची माहिती तपास अधिकारी पोलीस उपनिरिक्षक निलकांते यांनी दिली.