Chief Minister Uddhav Thackeray’s statement | महाराष्ट्रात राजकीय भूकंपाच्या हालचाली गतीमान : मुख्यमंत्र्यांच्या ‘माझे भावी सहकारी’ विधानाने खळबळ
मुख्यमंत्र्यांनी मराठवाड्यासाठी केल्या आठ महत्वाच्या घोषणा
जामखेड टाईम्स वृत्तसेवा : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मराठवाडा मुक्तिसंग्राम कार्यक्रमात काढलेल्या एका विधानावरुन अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यासपीठावर असलेल्या नेत्यांकडे वळून “माझे आजी माजी सहकारी तसेच एकत्र आले तर भावी सहकारी”, असे संबोधून भाषणाला सुरुवात केल्याने राज्यात मोठी खळखळबळ उडाली आहे. भाजप शिवसेना पुन्हा एकत्र येणार चर्चांना आता ऊत आला आहे. (Excitement over Chief Minister Uddhav Thackeray’s statement ‘My future colleague)
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी कालच सारखे “माजी मंत्री – माजी मंत्री” म्हणून काय उल्लेख करता.?? दोन ते तीन दिवसात तुम्हाला कळेलच “माजी की भावी” ते असे उद्गार पुण्यातल्या एका कार्यक्रमात काढले होते. त्यावेळी देखील शिवसेना-भाजप एकत्र येण्याच्या राजकीय तर्कवितर्कांना उधाण आले होते.(Excitement over Chief Minister Uddhav Thackeray’s statement ‘My future colleague)
चंद्रकांतदादांच्या या विधानानंतर खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी औरंगाबादमधील भर व्यासपीठावर भाजपचे दोन केंद्रीय मंत्री उपस्थित असताना “माझे भावी सहकारी” असा आपल्या भाषणाच्या सुरुवातीलाच उल्लेख केल्यामुळे शिवसेना-भाजप एकत्र येण्याच्या तर्कवितर्कांना अधिकच पुष्टी मिळाल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. (Excitement over Chief Minister Uddhav Thackeray’s statement ‘My future colleague)
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे औरंगाबाद दौऱ्यावर आहेत. त्यांनी आज सकाळी मराठवाडा मुक्तीसंग्रामातील हुतात्मांना राज्यातील जनतेच्या वतीने अभिवादन केलं.यानंतर केलेल्या भाषणात त्यांनी मराठवाड्यासाठी आठ मोठ्या घोषणा केल्या आहेत. मात्र या भाषणातील एका विधानामुळे आता राजकीय वर्तुळात फोडणी मिळाली आहे. (Excitement over Chief Minister Uddhav Thackeray’s statement ‘My future colleague)
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मराठवाड्यासाठी संतपीठाची घोषणा केली आहे. तसेच निजामकालीन 150 शाळांचा पुनर्विकास करणार असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
मुख्यमंत्र्यांनी मराठवाड्यासाठी केल्या आठ महत्वाच्या घोषणा (Eight important announcements made by the Chief Minister for Marathwada )
1) मराठवाड्यासाठी संतपीठ
2) निजामकालीन 150 शाळांचा पुनर्विकास करणार
3) औरंगाबाद आणि अहमदनगर रेल्वेने जोडण्याचं रेल्वे राज्यमंत्र्यांना आवाहन
4) औरंगाबाद आणि शिर्डी विमानसेवा सुरु करण्याची संकल्पना
5) मराठवाड्यासाठी 200 मेगावॅट सौरउर्जा प्रकल्प उभारणार
6) घृष्णेश्वर सभामंडप उभारणार
7) औरंगाबादला पर्यटन समृद्ध
8) परभणीत शासकीय महाविद्यालय
मुख्यमंत्र्यांचं विधान आलं चर्चेत
दरम्यान याच कार्यक्रमात मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी केलेलं एक विधान चांगलचं चर्चेत आलं आहे.व्यासपीठावरील आजी-माजी आणि एकत्र आले तर भावी सहकारी… असे म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाषणाची सुरवात केली. यावरून राज्यात नव्या चर्चांना उधान आले आहे.(Excitement over Chief Minister Uddhav Thackeray’s statement ‘My future colleague)
मुख्यमंत्र्यांनी मला कानात सांगितले काँग्रेसवाले मला त्रास देतात – रावसाहेब दानवे
यावेळी केंद्रीय रावसाहेब दानवे यांनी मुख्यमंत्र्याबाबत मोठे विधान केले आहे.(Raosaheb danve) मुख्यमंत्री ठाकरे यांनी भर सभेत मला म्हणाले, काँग्रेसवाले मला त्रास देतात..तुम्ही एकत्र या आपण बसून बोलू आणि हे सांगताना व्यासपीठावर बाळासाहेब थोरात देखील उपस्थित होते. त्यांनीही हे ऐकलं आणि तेही हसले, अशी प्रतिक्रिया रावसाहेब दानवे (Raosaheb danve) यांनी दिली आहे.भाजपा आणि शिवसेना हे पूर्वीचे मित्र होते. पण शिवसेना राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत यांची आघाडी झाली. असे जरी झाले असले तरी शिवसेनेने तयारी दाखवल्यास भाजप शिवसेनेच्या कायम सोबत असणार असे केंद्रिय मंत्री दानवे म्हणाले.
मुंबई- नागपुर बुलेट ट्रेन व्हावी – उध्दव ठाकरे
मुंबई-नागपूर बुलेट ट्रेनच्या कामासाठी हे सरकार सोबत असल्याचे सांगत, रेल्वेचा मार्ग आधीच ठरलेला असतो. रूळ सोडून इंजीन इकडे-तिकडे कुठेही जावू शकत नाही. म्हणून मला रेल्वे आवडते, मध्ये डायव्हरशन पाहिजे तर आमच्या स्टेशनवर येवू शकता. अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी आपल्या जुन्या मित्राला साद घातली. शुक्रवारी (दि.17) झालेल्या जिल्हा परिषदच्या नूतन इमारत बांधकामाच्या भूमिपूजन कार्यक्रमात ते बोलत होते.
केंद्रीयमंत्री रावसाहेब दानवे यांनी बुलेट ट्रेनच्या कामाचा उल्लेख केला. हा धागा पकडून मुख्यमंत्र्यांनीही त्यांना साथ देण्याचे आश्वासन दिले. रावसाहेब, तुम्ही मुंबई-नागपूर बुलेट ट्रेनसाठी तुम्ही पुढाकार घेत असाल, तर हे सरकार तुमच्या सोबत प्रत्येक पावलावर उभे राहील. (Excitement over Chief Minister Uddhav Thackeray’s statement ‘My future colleague)
देशातील बुलेट ट्रेनचा पहिला मार्ग हा अहमदाबाद-मुंबई होत आहे, पण त्यापेक्षा माझ्या राज्याची राजधानी (मुंबई) आणि उपराजधानी (नागपूर) जोडणारा लोहमार्ग व्हावा, अशी आमची इच्छा होती.
हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाच्या बरोबरीने मुंबई-नागपूर बुलेट ट्रेन होणार असेल, तर मी तुमच्या सोबत आहे. हिच कामाची एक पद्धत असली पाहिजे. राजकारणाच्या ठिकाणी राजकारण असले पाहीजे असे मुख्यमंत्री म्हणाले.
शिवेसनेचे बोट धरूनच भाजप महाराष्ट्रात वाढली, सत्तेच्या ध्येयाकडे जाणाऱ्या मार्गावरील शिवसेना ही रूळ आहे, असे संकेतच त्यांनी यातून दिल्याचे बोलले जात आहे.
web taital : Excitement over Chief Minister Uddhav Thackeray’s statement My future colleague