Karuna Sharma in Parli police custody for questioning | खळबळजनक | पोलिसांनी उधळला धनंजय मुंडेंच्या घातपाताचा डाव ; बंदुकीसह करूणा शर्मा पोलिसांच्या ताब्यात
शर्मा यांच्या अटकेसाठी परळीतील महिला उतरल्या रस्त्यावर
परळी : सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्याशी संबंधित एक धक्कादायक बातमी रविवारी समोर आली आहे. मंत्री धनंजय मुंडे व त्यांच्या कुटुंबीयांच्या घातपाताचा डाव पोलिसांनी उधळून लावला आहे. याप्रकरणी करूणा शर्मा या महिलेला परळी पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. शर्मा यांच्या अटकेसाठी परळीतील महिला रस्त्यावर उतरल्या आहेत. (Karuna Sharma in Parli police custody for questioning)
सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांची पत्नी असल्याचा दावा करत मुंडे यांच्यावर सातत्याने बेछूट आरोप करणाऱ्या करुणा शर्मा रविवारी परळीत आल्या असता त्यांच्या गाडीत पोलिसांना पिस्तुल आढळून (A gun was found in Karuna Sharma’s car) आल्याने एकच खळबळ उडाली आहे. परळी पोलिसांनी शर्मा यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले असून चौकशी चालू असल्याचे समजते.
मागील दोन तीन दिवसांपुर्वी करूणा शर्मा यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमांतून धनंजय मुंडे यांच्याविरोधात गंभीर आरोप केले होते. या व्हिडीओमध्ये त्यांनी अगामी निवडणुकीत पंकजाताईंना पाठिंबा देण्याचेही जाहिर केले होते. याशिवाय वैद्यनाथ मंदिरात दर्शन घेणार, पत्रकार परिषद घेणार व त्यानंतर मुंडेंच्या घरी जाणार असे स्वतः करुणा यांनीच जाहीर केले होते.परंतु त्याआधीच त्यांच्या गाडीत बेकायदेशीर पिस्तुल आढळून आल्याने परळीसह राज्यात मोठी खळबळ उडाली आहे. धनंजय मुंडे व त्यांच्या कुटुंबीयांचा घातपात करण्याचा तर हा करूणा शर्मा यांचा डाव नव्हता ना असा संशय आता व्यक्त केला जात आहे. (Karuna Sharma in Parli police custody for questioning)
दरम्यान परळीत दाखल झालेल्या करूणा शर्मा यांच्या गाडीत बेकायदेशीर पिस्तुल आढळून आल्याची वार्ता वाऱ्यासारखी परळी शहरात पसरली. धनंजय मुंडे व त्यांच्या कुटूंबातील सदस्यांचा शर्मा यांना घातपात करायचा नव्हता ना अशीच चर्चा शहरात सुरू होताच शेकडो महिला रस्त्यावर उतरल्या. करुणा शर्मा यांनी धनंजय मुंडे यांची बदनामी तर केलीच पण आज थेट धनंजय मुंडे यांना संपवण्यासाठी डाव आखला असल्याचा आरोप करत करुणा शर्मा यांना अटक करण्याची जोरदार मागणी केली आहे. यावर परळी पोलीस काय भूमिका घेतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. (Karuna Sharma in Parli police custody for questioning