Maharashtra Crime News Today, Thirty Thirty Scam | 500 कोटींचा थर्टी 30 घोटाळा ; 60 ते 70 कोटी कमवल्याची मुख्य सूत्रधार संतोष राठोडची कबुली, संपूर्ण घोटाळा कुठे आणि कसा झाला जाणून घ्या सविस्तर !
जामखेड टाईम्स वृत्तसेवा, औरंगाबाद। Maharashtra Crime News Today । Thirty Thirty Scam । बार्शीच्या विशाल फटे स्कॅमनंतर (Barshi Vishal Fate Scam) आणखी एक मोठा आर्थिक फसवणूकीचा घोटाळा समोर आला आहे. औरंगाबाद (Autangabad) जिल्ह्यातून समोर आलेला हा घोटाळा डोळे दिपवणारा अन सामान्यांच्या पायाखालची जमीन सरकवणारा आहे. 500 कोटींच्या फसवणुकीच्या या प्रकरणामुळे गुंतवणूकदारांचे धाबे दणाणले आहेत. 30 : 30 गुंतवणूकीचा हा घोटाळा राज्यात आता गाजत आहे.
औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील बोकूड जळगाव, बोकूड जळगाव तांडे, पाटोदे वडगाव, चिंचोली, जांभळी, निलसगाव, जांभळी तांडा, यासह इतर गावांतील शेकडो शेतकऱ्यांना जादा परताव्याचे आमिष दाखवून कोट्यवधींची फसवणूक केल्याचे उघड झाले आहे.राज्यात हा घोटाळा ३० : ३० गुंतवणूक नावाने ओळखला जात आहे.
दरम्यान या घोटाळ्याचा मास्टरमाईंड संतोष उर्फ सचिन नामदेव राठोड आणि त्याचा नातेवाईक यांच्याकडे या गुंतवणुकीचे कोट्यवधी रुपये त्यांच्याकडे जमा झाले असून ५०० कोटीहून अधिक मोठा हा घोटाळा असल्याचे तपासात समोर आले आहे. इतकंच नाही तर यामधून आरोपीने ६० ते ७० कोटी कमावल्याची कबुलीही दिली असल्याचे तपासी अधिकाऱ्यांनी सांगितले. (Maharashtra Crime News today)
मुंडवाडी (ता कन्नड) येथील संतोष राठोड याने ३० एप्रिल २०१३ मध्ये शेतकऱ्यांसाठी लाख रुपयांच्या गुंतवणुकीवर ५ ते ७ हजार रुपये प्रतिमहिना परतावा देण्याची योजना सुरू केली. सुरुवातीला या योजनेत गुंतवणूक केल्यास पहिले तीन महिने परतावा मिळत नसे. पण चौथ्या महिन्यापासून ठरलेली रक्कम देण्यात येत होती.
या योजनेत मोठ्या प्रमाणात गुंतवणूक होऊ लागली. त्यामुळे संतोषने गाडीचा नंबर ३०३०, मोबाइलच्या क्रमांकाचे शेवटचे अंक ३०३० असेच घेतले. त्याच्या एजंटांनीही स्वत:च्या गाड्या, मोबाइल क्रमांकाच्या शेवटी ३०३० नंबर घेण्यास सुरुवात केल्याने सर्वत्र ही योजना ३० : ३० नावानेच ओळखली जाऊ लागली.
लोकांच्या परताव्याचे पैसे देण्यासाठी संतोष आपल्या आलिशान गाड्यांचा ताफा घेऊन जात होता त्यामुळे लोकांचा त्याच्यावर विश्वास बसू लागला. दरम्यानच्या काळात शेतकऱ्यांना डीएमआयसी प्रकल्पाच्या भूसंपादनापोटी लाखो रुपये मिळाले. ते पैसे या योजनेत शेतकऱ्यांनी गुंतवले. त्यामुळे कोट्यवधीपर्यंत याची व्याप्ती गेली. (Maharashtra Crime News Today)
अनेक शेतकऱ्यांनी यामध्ये लाखो रुपये गुंतवले. मार्च एप्रिल २०२१ मध्ये थकीत परतावा देण्यात आला. महत्त्वाचे म्हणजे ज्यांनी १० लाख गुंतवले त्यांना अडीच लाख रुपये मिळाले. त्यामुळे लोकांचा अधिकच या योजनेवर विश्वास बसला त्यामुळे शेतकऱ्यांनी मिळणारा परतावा पुन्हा गुंतवण्यास सुरुवात केली त्यामुळे १० लाखाचा अडीच लाख परतावा मूळ रकमेत जमा केल्यास साडेबारा लाख रुपये झाले अशा प्रकारे हा घोटाळा ५०० कोटींपेक्षा अधिक झाला असल्याचे समोर आले आहे.
योजनेतील परतावा न दिल्याने घोटाळ्याविषयी फेब्रुवारी २०२१ मध्ये वृत्त आले. मात्र संतोषने मार्च-एप्रिल २०२१ मध्ये परतावा दिला. अन यावर पडदा पडला. परतावा इतक्या मोठ्या प्रमाणात दिल्याने पुन्हा पहिल्या पेक्षा जास्त प्रमाणात गुंतवणूक होऊ लागली. पण, यावेळी परतावा काही मिळाला नाही.
त्यामुळे परतावा मिळत नसल्याने १६ नोव्हेंबर २०२१ ला बिडकीन पोलीस ठाण्यात ज्योती ढोबळे या महिलेने तक्रार केली. मात्र तक्रार मागे घेतल्याने संतोषला जामीन मिळाला. पण २१ जानेवारी २०२२ दौलत राठोड यांनी ३३ लाख ५० हजार रुपयांना फसविल्याची दुसरी तक्रार झाली अन संतोषच्या यशाची चक्रे उलटी फिरली पोलिसांनी गुन्हा दाखल करून संतोषला बेड्या ठोकल्या.
बार्शीच्या विशाल फटेनेही ज्यादा परताव्याचे आमिष दाखवून सोलापूर जिल्ह्यासह राज्यातील अनेकांकडून गुंतवणूक करून घेतली होती. कोट्यावधी रूपयांच्या गुंतवणूकीचा हा घोटाळा नुकताच उजेडात आला आहे. या प्रकरणात बार्शी पोलिसांत अनेक गुन्हे दाखल झाले आहेत. मुख्य सूत्रधार विशाल फटे याला अटक करण्यात आली आहे. सध्या तो पोलिस कोठडीत आहे.
गुंतवणूकदारांना ज्यादा परताव्याच्या आमिषाला बाई पडून कष्टाची कमाई वाया घालू नका, सध्या आर्थिक फसवणूकीचे प्रकार मोठ्या प्रमाणात उघडकीस येत आहे. त्यामुळे सावधानता बाळगणे आवश्यक असल्याचे तज्ञ सांगत आहेत.
Maharashtra Crime News Today, Thirty Thirty Scam, 30-30 scam in Aurangabad district, chief facilitator Santosh Rathod arrested, Rs 500 crore scam, Aurangabad Paithan