land scam case in ashti | आष्टीतील 100 एकर जमीन अपहार प्रकरणातील मास्टरमाईंड ‘मुन्ना’ला बेड्या, पीआय सलिम चाऊस यांची धडाकेबाज कारवाई
जामखेड टाईम्स वृत्तसेवा :Mastermind Munna arrested Ruinalcol land scam case in ashti taluka | आष्टी तालुक्यात इनाम जमिनींचे बनावट दस्तावेज तयार करून त्या जमिनींची परस्पर विक्री करण्याचे रॅकेट उघडकीस आले आहे.या प्रकरणात सहा जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. जमीन अपहार प्रकरणातील मास्टरमाईंडला बेड्या ठोकण्याची धडाकेबाज कारवाई आष्टीचे पोलिस निरीक्षक सलिम चाऊस (Ashti police inspector Salim Chaus) यांनी पार पाडली आहे. मास्टरमाईंड गजाआड झाल्याने या प्रकरणात आता आणखी कोणती मोठी नावे समोर येतात याकडे आष्टीकरांचे लक्ष लागले आहे.
चर्चेतल्या बातम्या
याबाबत सविस्तर असे की, आष्टी तालुक्यातील रुईनालकोल येथे संत शेख महमंद बाबांची दर्गाह आहे. या दर्गाहची शंभर एकर जमिन आहे. हीच जमिन बनावट समंतीपत्राआधारे बळकावल्याचा धक्कादायक प्रकार नुकताच उघडकीस आला होता. (Mastermind Munna arrested Ruinalcol land scam case in ashti taluka)
2020 मध्ये उघड झाला जमिन विक्री घोटाळा
2020 मध्ये या जमिनीची काही भामटय़ांनी बनावट दस्तावेज तयार करून त्या जमिनींचे परस्पर विक्री केल्याचे दर्ग्याचे सेवेकरी असलेल्या शेख कुटुंबाच्या निदर्शनास आले होते. त्यानंतर या प्रकरणातील सर्व बनावट दस्ताऐवज मिळवण्यात आले होते.बनावट व खोटे दस्तावेज निदर्शनास येताच ३ सप्टेंबर रोजी आष्टी पोलिस ठाण्यात सहा जणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. यात तीन प्राध्यापक, एक मुख्याध्यापक, एक विद्यमान सरपंच व अन्य एकाचा समावेश होता.(Mastermind Munna arrested Ruinalcol land scam case in ashti taluka)
ते आरोपी जामिनावर
गुन्हा दाखल होता आष्टी पोलिसांनी आरोपींना बेड्या ठोकत गजाआड केले होते. या प्रकरणाचे पाळेमुळे खणून काढण्यासाठी आष्टी पोलिसांनी कंबर कसली होती. या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार कोण याचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी वेगाने मोहिम उघडली होती. अटकेतील आरोपींकडून काही धागेदोरे हाती आल्यानंतर पोलिसांनी त्या दृष्टीने तपासावर होते. दरम्यान अटकेतील आरोपी जामिनावर बाहेर आले तरी मुख्य सूत्रधार हा मोकाटच होता. यामुळे मास्टर माईंडला बेड्या ठोकण्याचे मोठे अव्हान आष्टी पोलिसांसमोर होते.(Mastermind Munna arrested Ruinalcol land scam case in ashti taluka)
अखेर तो दिवस उजाडला
आष्टी तालुक्यातील रूईनालकोल येथील दर्ग्याच्या जमिनीची बनावट कागदपत्रांच्या आधारे जमिन विक्री करण्याच्या रॅकेटमधील मुख्य सूत्रधाराचा सुगावा आष्टी पोलिसांना लागला आणि आष्टी पोलिसांनी आष्टी तालुक्यातून मुख्य सूत्रधार असलेल्या मुन्नाच्या मुसक्या आवळल्या. (Mastermind Munna arrested Ruinalcol land scam case in ashti taluka)
कोण आहे हा मुन्ना ?
रूईनालकोल जमिन व्यवहार प्रकरणात आष्टी पोलिसांनी मनोज रत्नपारखे याला नुकतीच अटक केली आहे. मनोज हा मुन्ना या नावाने आष्टीत परिचित आहे. या प्रकरणात मुन्ना हाच मुख्यसुत्रधार असल्याचे आष्टी पोलिसांच्या तपासात समोर आले आहे.
पीआय सलिम चाऊस यांची धडाकेबाज कारवाई
आष्टी तालुक्यात शेकडो एकर इनामी जमिनी आहेत. या जमिनींचे बेकायदेशीर विक्री करण्याचे अनेक प्रकरणे आष्टी तालुक्यात घडले आहेत. चिंचपुरचेही एक प्रकरण मध्यंतरी गाजले होते. आता रूईनालकोल येथील प्रकरण चव्हाटय़ावर आलेले आहे. या प्रकरणात गुन्हे दाखल झाले आहेत. मुख्यसुत्रधारालाही आष्टी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. ही धडाकेबाज कारवाई पोलिस निरीक्षक सलिम चाऊस यांनी केली आहे. कारवाईच्या पथकात सचिन कोळेकर, रियाज पठाण, वाहनचालक अरूण कांबळे यांचा समावेश होता. (Mastermind Munna arrested Ruinalcol land scam case in ashti taluka)
रूईनालकोल प्रकरणात ‘कुणाचा’ आशिर्वाद ?
शंभर एकर जागेची बनावट दस्तावेज तयार परस्पर विक्री करण्यासाठी मोठ्या राजकीय, प्रशासकीय आशीर्वादाची आवश्यकता आहे. आष्टी, बीड की राज्यातील अन्य कुठल्या भागातून आरोपींना हा आशिर्वाद मिळाला होता ? यावरही प्रकाश पडणे आवश्यक आहे.
मुन्नाच्या तपासातून काय बाहेर निघणार ?
रूईनालकोल प्रकरणात आणखी कोणाचा समावेश आहे ? आरोपींनी कोणाची मदत घेतली ? हे मुन्नाच्या तपासातून पुढे येईल अशी माहिती पोलिस निरीक्षक सलिम चाऊस यांनी सांगितले.
संत शेख महमंद महाराज दर्ग्याची जमीन या कुटूंबाकडे सेवेसाठी
संत शेख महमंद बाबाच्या दर्गाहची जमीन शेख दस्तगीर महंमद यांच्या कुटुंबीयांकडे सेवेसाठी आहे. ही जमीन वडिलोपार्जित शेख कुटूंबाकडे आहे. या कुटुंबातील शेख बाबूलाल, शेख महंमद, शेख हजरत, शेख रशीद, शेख निजाम, शेख दस्तगीर, शेख गुलाब असे मिळून जमिनीची देखभाल करतात.
web taital : Mastermind Munna arrested Ruinalcol land scam case in ashti taluka